रक्तदान,
रोगनिदान शिबीरासारख्या लोकोपयोगी कार्यक्रमातून
स्व. इंदिराबाई
कडू यांना श्रद्धांजली
आईच्या तेरवीतही जपले वेगळेपणा
अमरावती दि 25 (विमाका) :जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मातोश्री
स्व. इंदिराबाई कडू यांच्या तेरवी निमित्त अचलपुर तालुक्यातील घाटलाडकी, आसेगाव
पुर्णा, कुऱ्हा, चमक खुर्द, शिरजगाव कसबा येथे रक्तदान शिबीर, रोगनिदान शिबीर व
शववेटी वाटप करण्यात आली. यावेळी मोठया प्रमाणात युवकांनी रक्तदान करुन स्व.
इंदिराबाई कडू यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गेले तेरा दिवस विविध लोकोपयोगी
कार्यक्रमांचे आयोजन करुन राज्यमंत्र्यांनी त्यांच्या आईच्या तेरवीचे वेगळेपण
जपले.
काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री
बच्चू कडू यांच्या मातोश्रींचे निधन झाले. तेरा दिवसांमध्ये अनेकांनी त्यांची
सांत्वनपर भेट घेतली. तेव्हापासुन त्यांनी त्यांच्या आईंच्या आठवणींना उजाळा देत
विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.
दररोजच्या किर्तनासह दिनांक 21 ते 26 मार्च
पर्यंत ग्रामस्थांकरीता रोगनिदान व उपचार शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या
दरम्यान राज्यमंत्री श्री. कडू यांनी गावातील भिंती, वृक्ष, खांब व परिसराचे
सुशोभिकरण केले. या उपक्रमात लहान मोठे सर्वजण सहभागी झाले. त्यामुळे गावाच्या
स्वच्छता व सौंदर्यात भर पडली. तेरविच्या दिवशी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात
आले. पाचशेपेक्षा अधिकांनी या शिबीरात रक्तदान केले. याकरीता डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति वैद्यकिय
महाविद्यालय आणि गाडगे महाराज रक्तपेढीने सहकार्य केले. महिलांच्या कर्करोगाच्या
निदान शिबिराचा लाभ येथिल महिलांनी घेतला.
शित शव पेटीचे वाटप
नोकरी किंवा कामानिमित्त दुर
गावी असणारे आप्त पार्थिवाच्या दर्शनापासुन वंचित राहु नये, शित शव पेटीच्या अभावी
अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तिच्या अंतिम दर्शनाला मुकावे लागु नये यासाठी कै.
इंदिराबाई यांच्या स्मृति प्रित्यर्थ शिरजगाव कसबा, कुऱ्हा, घाटलाडकी,
ब्राम्हणवाडा थडी, आसेगाव पूर्णा, चमक गावांमध्ये शव पेटीचे वाटप श्री. कडू यांनी
केले.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा