बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

नागरी संरक्षण पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांना पीएचडी

 

नागरी संरक्षण पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांना पीएचडी

                                                      अमरावती, दि. 21 : अमरावती परिक्षेत्राचे नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून नुकतेच पीएचडी/एमफिल प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली असून यापूर्वी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून आचार्य पदवी (पीएचडी) संपादीत केली. स्वत:चे कर्तव्य सांभाळून प्राप्त केलेल्या यशाबद्दल पोलीस विभागात त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

या दिमाखदार कामगिरीबद्दल मुंबईचे अपर पोलीस महासंचालक (नागरी हक्क संरक्षण) विनय कारगावकर, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक (अमरावती ग्रामीण) अविनाश बारगळ आदींनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

या यशासोबत डॉ. राठोड यांनी सप्टेंबर 2022 मध्ये गोंडवाना विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा (PET) तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा नोव्हेंबर 2022 मध्ये उत्तीर्ण केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा