गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

आयटीआयमध्ये सोमवार व मंगळवारी रोजगार भरती मेळावा

 


आयटीआयमध्ये सोमवार व मंगळवारी रोजगार भरती मेळावा

अमरावती, दि. 7 : मूलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्रातर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारातील एनएनएस सभागृहात दि. १२ व १३ डिसेंबर  रोजी सकाळी १० वाजता पुरूष उमेदवारांसाठी शिकाऊ रोजगार भरती मेळावा आयोजिण्यात आला आहे.

गुजरातेतील सुझुकी मोटर्समधील फिटर, डिझेल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टूल अँड डाय मेकर, पीपीओ, ऑटोमोबाईल सीओई, ट्रॅक्टर मेकॅनिक, पेंटर जनरल आदी पदे मेळाव्याद्वारे भरली जातील. दहावीत किमान 40 टक्के व आयटीआय पदविकेत 50 टक्के गुण आवश्यक आहेत. शिकाऊंना कंपनीतर्फे 16 हजार 900 रू. विद्यावेतन दिले जाईल. त्याशिवाय, गणवेश जोडी, सेफ्टी बूट मिळतील. कँटिन सुविधा आहे. त्याचप्रमाणे, एक हजार रूपये महिना दराने निवासाचीही सुविधा असेल.

इच्छूकांनी बायोडेटा, आधारपत्र, छायाचित्र, शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या अंशकालीन प्राचार्य एस. के. बोरकर यांनी केले आहे.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा