बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३

महाकृषी ऊर्जा अभियान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना अर्जातील त्रृटी पूर्ण करण्याचे आवाहन


महाकृषी ऊर्जा अभियान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना

अर्जातील त्रृटी पूर्ण करण्याचे आवाहन

 

अमरावती दि. 13 : महाकृषी ऊर्जा अभियान (पी.एम.कुसुम योजना घटक-ब) योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये  अद्यापपर्यंत शेतक-यांचे परीपुर्ण एकुण 3 हजार 225 अर्ज ऑनलाईनरित्या महाऊर्जाच्या कुसुम पोर्टलवर प्राप्त झालेले आहेत, त्यापैकी 741 लाभार्थी शेतकऱ्यांनी सौर पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे. तसेच एकुण 3 हजार 225 लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 843 लाभार्थी शेतकऱ्यांच्या अर्जांमध्ये कागदपत्रांची त्रृटी आढळून आल्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित यादीमध्ये आहेत. सदर प्रकरणी महाऊर्जा, विभागीय कार्यालय, अमरावती यांच्याकडुन अशा सर्व लाभार्थ्यांना कागदपत्रांची त्रृटी पूर्ण करण्याकरीता भ्रमणध्वनीव्दारे/पत्राव्दारे कळविण्यात आले आहे. तरी सुध्दा अद्यापपर्यंत लाभार्थ्यांकडुन त्रृटींची पूर्तता करण्यात आलेली नाही.

या अनुषंगाने अशा सर्व लाभार्थी  शेतकऱ्यांना  सुचित करण्यात येते की, आपण महाऊर्जा, विभागीय कार्यालयाला भेट देऊन किंवा दुरध्वनीवर क्र.0721-2661610 संपर्क करुन आपल्या अर्जामध्ये असलेल्या कागदपत्रांच्या त्रृटींबाबत विचारणा करावी. तसेच https://kusum.mahaurja.com/benef_home या संकेतस्थळाला भेट देवुन आपल्या कुसूम लाभार्थी  लॉगीन मधुन  आवश्यक कागद‍पत्रे अपलोड करावीत, जेणे करुन आपल्याला सौर पंप योजनेचा लाभ घेता येईल, असे महाऊर्जा कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.    

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा