शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

दहावी व बारावी च्या खाजगी परिक्षार्थ्यांना प्रवेश नोंदणीसाठी मुदतवाढ, फॉर्म नं. 17 भरण्यास 30 सप्टेंबरची मुदत

 दहावी व बारावी च्या खाजगी परिक्षार्थ्यांना प्रवेश नोंदणीसाठी  मुदतवाढ

फॉर्म नं. 17 भरण्यास 30 सप्टेंबरची मुदत

अमरावती, दि.15: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक ‍शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी व बारावीच्या माहे फेब्रुवारी-मार्च 2024 च्या परीक्षेस फॉर्म नं. 17 द्वारे खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ठ होण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाई पध्दतीने भरण्यासाठी दि. 20 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुतदवाढ देण्यात आली आहे. तसेच मुळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मुळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या माध्यमिक शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्यासाठी 22 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2023 हा कालावधी देण्यात आला आहे. माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावती एक छायाप्रत मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करण्यासाठी 5 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सूचना व अधिक माहितीसाठी इयता दहावीसाठी          http://form17.mh-ssc.ac.in तर बारावीसाठी  http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा, असे राज्य मंडळ, पुणेच्या सचिव, अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा