सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

'आयटीआय'चा दीक्षांत समांरभ थाटात संपन्न आत्मसात केलेल्या कौशल्याचा उपयोग समाज हितासाठी करावा - सहसंचालक प्रदिप घुले

 'आयटीआय'चा दीक्षांत समांरभ थाटात संपन्न

 

आत्मसात केलेल्या कौशल्याचा उपयोग समाज हितासाठी करावा

                 - सहसंचालक प्रदिप घुले

 

अमरावती, दि. 18 : प्रत्येक विद्यार्थ्याच्या कौशल्याचे कौतुक होणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनीही आत्मसात केलेल्या तांत्रिक शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी करावा, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक प्रदिप घुले यांनी आज केले.

 माजी प्रशिक्षणार्थीनी एकत्र ऐवुन आपल्या संस्थेसाठी ॲल्युमिनी तयार क











रुन संस्थेचा विकास करायला हवा. त्यांचे हे कार्य येणाऱ्या पीढीसाठी नक्कीच प्रेरक व मार्गदर्शक ठरणार, असा आशावादही श्री. घुले यांनी व्यक्त केला.

रविवारी, (ता.17 सप्टेंबर) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित कौशल्य दीक्षांत समारंभ कार्यक्रमात अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये संस्था स्तरावर प्रथम व द्वितीय क्रमवारीत आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी व इतर ट्रेडच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी श्री. घुले अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

सर्वप्रथम 'गर्जा महाराष्ट्र' या राज्य गीताने दीक्षांत समारंभाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. या समारंभात मान्यवरांच्या हस्ते आयटीआय मधील प्राविण्यप्राप्त एकूण 55 प्रशिक्षणार्थींना पदवीदान करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासहीत सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्व प्रमुख अतिथींनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करुन त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या समारंभाच्या अध्यक्षपदी अमरावती विभागाचे सहसंचालक (व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण) श्री. प्रदिप घुले हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये तंत्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक डॉ. विजय आर. मानकर, शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महल्ले, सहायक संचालक रविंद्र लोखंडे, गुक्स इंडस्ट्रीलचे डॉ. संजय सुपे, श्री. इंगळे (अस्पा बंड संन्स) उद्योजिका सौ. रंजना बिडकर, अमरावती आयटीआयचे उपसंचालक संजय बोरकर, प्रभारी उपप्राचार्य संजय बोराडे या समारंभात उपस्थित होते.           

यावेळी गीत गायन समिक्षा थोरात यांनी केले. शिल्पनिदेशक सुरेंद्र भांडे यांनी सुत्रसंचालन केले तर संस्थेचे उपसंचालक संजय बोरकर आभर मानले. संजय बोराडे यांनी प्रास्ताविकातून आयटीआयमध्ये सुरु असलेल्या विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांविषयी माहिती दिली. यावेळी संस्थेतील गटनिदेशक, शिल्पनिदेशक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शुभम गेडाम, ओम कावलकर, कार्तीक अवसरमोल,  राम राऊत, कु. प्रिया, सागर आडे, साक्षी चावरे, पायल पंडित, प्रणय सावरकर, स्वप्निल कोळसकर आदींना मान्यवरांच्या हस्ते ड्राफ्टमन मेकॅनिक पदवी प्रदान करण्यात आली. तसेच इतर विद्यार्थी- विद्यार्थींनींना पदवी प्रमाणत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा