इयत्ता
पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या
विद्यार्थ्यांच्या
ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्जाबाबत सूचना
ऑनलॉईन नावनोंदणी अर्ज सादर करण्यासाठी
http://msbos.mh-ssc.ac.in संकेतस्थळ उपलब्ध
अमरावती
दि. 1 : महाराष्ट्र
राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या
तसेच जानेवारी-फेब्रुवारी 2024 मध्ये होणाऱ्या मुल्यमापन सत्रासाठी विद्यार्थ्यांचे
ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी प्रवेश अर्ज दि. 1 ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीत
स्विकारण्यात येणार आहेत.
ऑनलाईन नावनोंदणी
प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
दि. 1 ते 15 सप्टेंबर
2023 या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत. दि. 2 ते 20 सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांनी
मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र
शाळेमध्ये जमा करावे. दि. 29 सप्टेंबर
2023 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे
व यादी विभागीय मंडळात जमा करावे.
इयत्ता पाचवी व
आठवीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in
या संकेतस्थळाचा वापर करावा तसेच अर्ज भरतेवेळी संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे
पालन करावे, असे अमरावती विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव निलिमा टाके यांनी
प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा