सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती महाडीबीटी प्रणालीवर कार्यान्वित ; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती महाडीबीटी प्रणालीवर कार्यान्वित ; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 12: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनूसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2023-24 पासुन ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीवर कार्यन्वीत करण्यात आलेली आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे यांनी केले आहे.

 

सैनिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, इयत्ता नववी व दहावीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती, इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क या योजना राबविण्यात येतात.

 

योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी प्रणालीच्या http://prematric.mahait.org/Login/ या वेब लिंकवर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावे. महाडीबीटी प्रणालीमध्ये प्री मॅट्रिक योजनांसाठी पात्र सर्व अनूसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची अर्जांची नोंदणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी करावी, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त श्री. वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.  

 

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा