दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
अमरावती, दि. 20 : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
उपायुक्त गजेंद्र बावणे, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा