नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभागातील
‘शिपाई’ पदाचा निकाल जाहीर
निकाल पाहण्यासाठी dtp.maharashtra.gov.in संकेतस्थळ उपलब्ध
अमरावती, दि. 27 : नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील शिपाई (गट ड) संवर्गातील रिक्त पदांवर भरतीसाठी परिक्षा टाटा कंन्सलटन्सी सर्व्हीसेस (टिसीएस) या कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने दि. 25 नोंव्हेबर, 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या पद भरतीचा निकाल, गुणवत्ता यादी व अनुषंगीक सूचना विभागाच्या dtp.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे.
सदर परिक्षेची गुणवत्ता यादी, शिफारसपात्र उमेदवारांची यादी तसेच अनुषंगिक सुचना नगर रचना विभागाच्या सर्व विभागीय कार्यालयास देखील उमेदवारांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. शिफारसपात्र उमेदवारांनी त्यांना नियुक्तीची शिफारस केलेल्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून कागदपत्रे पडताळणीची कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना अमरावती विभागाचे नगर रचना सहसंचालक किं. सा. राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे जाहीर केल्या आहेत.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा