माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची
विभागीय आयुक्तांनी घेतली सदिच्छा भेट
अमरावती, दि. 13 : विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.
येथील काँग्रेसनगर स्थित देवि सदनात डॉ. पाण्डेय यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी माजी आमदार रावसाहेब शेखावत, पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता रुपा गिरासे यावेळी उपस्थित होते.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे दोन दिवसाकरिता अमरावती येथे आगमन झाले असून उद्या (दि.14 फेब्रुवारीला) विद्याभारती महाविद्यालयात दिवंगत देवीसिंह शेखावत यांच्या वर्षश्राध्द निमित्त आयोजित पुण्यस्मरण कार्यक्रमाला त्या उपस्थित राहणार आहेत.
यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी अमरावती येथील मॉडेल रेल्वे स्टेशन, अमरावती-नागपूर चौपदरी रस्तेविकास, विविध विकासकामे व कार्यक्रम संबंधीच्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला. अधिक कालावधी लोटून आजही त्यांना अनेक बाबी आठवणीत असल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे कौतून केले. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून आम्हा सर्वांच्या त्या आदर्श आहेत, असे मनोगत विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी यावेळी व्यक्त केले. राष्ट्रपती असताना जळगाव येथील एका कार्यक्रमाची सुरक्षा जबाबदारी पोलीस आयुक्त श्री. रेड्डी यांनी पार पाडली असल्याची माहिती माजी राष्ट्रपती महोदयांना दिली.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा