इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या
मार्गदर्शनासाठी समुदेशकांची नियुक्ती
अमरावती, दि. 16 : इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा माहे फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार आहे. परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी शिक्षण मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समुपदेशकांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन समुदेशन करण्यात येईल. त्यासाठी संबंधितांचे भ्रमणध्वनी क्रमांक मंडळाव्दारे जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) दि. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान या विषयांची ऑनलाईन परीक्षा दि. 20 ते 23 मार्च 2024 दरम्यान होणार आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) दि. 1 ते 26 मार्च 2024 या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे दिलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क करुन परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन प्राप्त करावे, असे आवाहन शिक्षण मंडळाव्दारे करण्यात आले आहे.
7387400970, 9011184242, 8421150528, 8263876896, 8369021944, 8828426722, 9881418236, 9359978315, 7387647902, 9011302997 याप्रमाणे समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले असून विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत सकाळी 8 वाजतापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीतच भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुदेशन करण्यात येईल. मात्र, विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिका इत्यादीबाबत प्रश्न समुपदेशकांना विचारू नये, याची कृपया नोंद घ्यावी, असे राज्य मंडळ पुणेच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा