शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०२५
इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन
मुंबई, दि. 31 : दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आणि भारताचे पहिले उप पंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी जयंती यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच भारतीय एकात्मतेसाठी निश्चियपूर्वक धोरण आखून त्यासाठी पावले उचलणाऱ्या सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एकता दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘ईज ऑफ डुईंग बिझिनेस’ संदर्भात उद्योग विभागाचा आढावा
मुंबई, दि. 31 : राज्यात ‘जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती योजना 2025’ राबविण्यात येत आहे. 154 सुधारणांचा समावेश असलेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी 14 ऑगस्ट 2026 पर्यंत केली जाणार आहे. यात राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसाठी ‘चिंतन शिबिर’ आणि विभागीय बैठकांचे आयोजन करण्यात येणार असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याधिकाऱ्यांना अधिक अधिकार प्रदान करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे ‘इज ऑफ डुईंग बिझिनेस’ संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस मुख्य सचिव राजेशकुमार तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तर दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी 6 विभागीय समित्या स्थापन करण्यात आल्या असून, त्या 31 डिसेंबर 2025 पूर्वी आपले अहवाल सादर करतील. यातील नाशिक विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ सुधारणा समिती कार्यरत आहे, तर विजय सूर्यवंशी (कोकण विभाग) आणि जितेंद्र पापळकर (छत्रपती संभाजीनगर विभाग) अनुक्रमे औद्योगिक संसाधन वापर आणि भू-बँक प्रोत्साहन या विषयांवर लक्ष केंद्रित करत आहेत.
बैठकीदरम्यान राज्यातील ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ प्रगती, अंमलबजावणी केलेल्या सुधारणा तसेच आगामी उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्राने ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस 2024’ मूल्यांकनात लक्षणीय प्रगती साधली असून 402 पैकी 399 सुधारणा पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे राज्याचा अंमलबजावणी स्कोअर 99.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. महाराष्ट्राला यापूर्वी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ 2020-21’ मध्ये अचिव्हर आणि ‘ईओडीबी 2022’ मध्ये टॉप अचिर्व्हर म्हणून गौरविण्यात आले होते. ‘ईज ऑफ डुईंग बिझिनेस 2024’ चा अंतिम निकाल 11 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर होणार आहे.
‘ईज ऑफ डुईंग बिझिनेस’ अंतर्गत भूखंड आणि बांधकाम परवाने, कामगार सुधारणा, उपयुक्तता आणि तपासणी प्रणाली तसेच नियामक सुलभीकरण ही प्रमुख लक्ष्यकेंद्रीत क्षेत्रे आहेत. त्याचबरोबर मैत्री 2.0 द्वारे संपूर्ण एकल-खिडकी परिसंस्था कार्यान्वित करण्याची योजना आहे. त्याचबरोबर सिंगल साइन-ऑन, परवान्यांची स्थिती, सामान्य अर्ज फॉर्म, एकत्रित पेमेंट, डॅशबोर्ड्स, तपासणी, तक्रार निवारण आणि वापरकर्ता अभिप्राय यासारखे आवश्यक मॉड्यूल्स मैत्री 2.0 मध्ये समाविष्ट असणार आहेत.
महाराष्ट्रात व्यवसाय सुलभता, नियमनमुक्ती आणि क्षेत्रीय मंजुरी सुलभीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊले उचलली जात आहेत. उद्योगांना अधिक अनुकूल आणि पारदर्शक वातावरण मिळावे यासाठी प्रमुख सुधारणा करण्यात येत आहेत.
केंद्र सरकारच्या औद्योगिक आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) च्या 'बिझनेस रिफॉर्म अॅक्शन प्लॅन' (बीआरएपी) नुसार, २०१५ पासून महाराष्ट्र सातत्याने देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांपैकी एक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राजधानीत सरदार वल्लभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन
नवी दिल्ली, 31 : देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्तआणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त निवासी आुयक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांनी कोपर्निकस मार्ग येथील महाराष्ट्र सदनात त्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनिषा पिंगळे यांच्यासह महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी करण्यात येते. या निमित्ताने निवासी आुयक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.
महाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक प्रमोद कोलपत्ते यांनी इंदिरा गांधी व वल्लभ भाई पटेल यांच्या कार्याचा व जीवनप्रवासाचा परिचय उपस्थितांना करुन दिला.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्तालयात राष्ट्रीय एकता दिनाची शपथ माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन
अमरावती, दि. 31 : भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्तालयात आज विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून अभिवादन केले. तसेच दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राष्ट्रीय संकल्प दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतीय एकात्मतेसाठी निश्चियपूर्वक धोरण आखून त्यासाठी पावले उचलणाऱ्या सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विभागीय आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी यांना विभागीय आयुक्त डॉ. सिंघल यांनी राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.
यावेळी उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे, नायब तहसीलदार श्याम देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी वर्षानिमित्त केवडिया (गुजरात) येथे महाराष्ट्राचा चित्ररथ 1 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान केवडिया गुजरात येथे होणाऱ्या भारत पर्व महोत्सवात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग
मुंबई, दि २८ : 31 ऑक्टोबर 2025 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी (150
व्या) जयंती वर्षानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत केवडिया, गुजरात येथे आयोजित करण्यात येणाऱ्या
राष्ट्रीय संचलन कार्यक्रमात यंदा प्रथमच महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ सहभागी होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे या वर्षी “स्वराज्य: एकतेचा धागा” या
संकल्पनेवर हा चित्ररथ साकारण्यात आला आहे. या चित्ररथात अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराज
सिंहासनावर विराजमान असल्याचे दर्शन घडते. त्यांच्या मागे वारकरी संप्रदायातील वारकरी यांची मूर्ती
तर पार्श्वभूमीवर मराठा आरमारातील प्रसिद्ध गुराब नौका दर्शविण्यात आली आहे. या माध्यमातून
राज्याच्या वैभवशाली इतिहासाची आणि एकतेची झलक दर्शविण्यात आली आहे.
या चित्ररथासोबत 14 कलाकारांचा चमू सांस्कृतिक सादरीकरण करणार असून, महाराष्ट्राच्या
विविधतेतून एकतेचा संदेश देणारे हे सादरीकरण राष्ट्रीय स्तरावर राज्याची सांस्कृतिक ओळख अधोरेखित
करेल.
तसेच, 1 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत भारत पर्व अंतर्गत महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या
सांस्कृतिक कार्य विभागांद्वारे संयुक्त सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा
मुख्य कार्यक्रम 7 -8 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडेल.
महाराष्ट्र राज्याकडून या कार्यक्रमात राज्यातील समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडविण्यासाठी गोंधळ
नृत्य, कोळी नृत्य, लावणी, तसेच वारी परंपरेवर आधारित सादरीकरणे यांचा समावेश असलेले सुमारे 15
ते 20 कलाकारांचे पथक सहभागी होणार आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची
असून यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आहे
या उपक्रमांद्वारे महाराष्ट्र राज्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकपरंपरेचे वैभव राष्ट्रीय तसेच
आंतरराज्यीय पातळीवर प्रभावीपणे सादर होणार आहे.
००००
संजय ओरके/विसंअ
सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ विशेष स्वरूपात साजरा होणार !
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३१ ऑक्टोबर राष्ट्रीय
एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षी त्यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने हा दिवस भव्य
स्वरूपात साजरा केला जाणार आहे. हा दिवस भारताच्या एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकजुटतेचे प्रतीक
असून, ५६२ संस्थान एकत्रित येऊन आधुनिक भारताची पायाभरणी करणाऱ्या सरदार पटेलांच्या अद्वितीय
कार्याला अभिवादन करणार आहे.
एकतानगर येथे भव्य परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम
या वर्षीचा उत्सव नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धीचा संगम असणाऱ्या गुजरातमधील
नर्मदा जिल्ह्यातील एकतानगर येथे आयोजित केला जाणार आहे. हे ठिकाण “विविधतेत एकता” या
भारताच्या संकल्पनेचे प्रतीक म्हणून निवडले गेले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे केंद्रीय सशस्त्र
पोलीस दल राज्य पोलीस दल आणि राष्ट्रीय कॅडेट कोर यांच्या सहभागाने भव्य परेड आणि सांस्कृतिक
उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय कॅडेट्स कोर आणि शालेय बँड यांचे सादरीकरण
या परेडमध्ये सीमा सुरक्षा बल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, भारत-
तिबेट सीमा पोलीस, सशस्त्र सीमा बल तसेच आसाम, त्रिपुरा, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र,
पंजाब, जम्मू आणि काश्मीर, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या पोलीस दलांचा सहभाग असेल.
घोडदळ आणि उंटदळाचे संच, स्वदेशी जातींच्या श्वानांचे कौशल्य प्रदर्शन, मार्शल आर्ट सादरीकरणे आणि
शस्त्रविरहित युद्धकौशल्याची प्रात्यक्षिके या परेडची शोभा वाढवतील.
महिला सक्षमीकरणावर विशेष भर देत, प्रधानमंत्री यांना दिल्या जाणाऱ्या गार्ड ऑफ ऑनरचे
नेतृत्व एक महिला अधिकारी करतील. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव बल च्या महिला
कर्मचाऱ्यांकडून मार्शल आर्ट आणि युद्धकौशल्याचे प्रभावी प्रदर्शन सादर केले जाईल. याद्वारे त्यांचे शौर्य,
शिस्त आणि आत्मविश्वास प्रकट होईल. राष्ट्रीय सुरक्षेत विशेष योगदान दिले आहे असे रामपूर हाउंड आणि
मुधोल हाउंड हे स्वदेशी श्वान आपली कौशल्ये सादर करतील. विशेष म्हणजे, अखिल भारतीय पोलीस
श्वान स्पर्धेत विजेती ठरलेली ‘मुधोल हाउंड रिया’ या वर्षीच्या परेडमध्ये डॉग स्क्वाडचे नेतृत्व करेल.
याशिवाय, गुजरात पोलिसांचे घोडदळ, आसाम पोलिसांचा मोटरसायकल डेअरडेव्हिल शो, सीमा सुरक्षा
बल चे उंटदळ आणि उंट बँड, तसेच एनसीसी कॅडेट्स आणि शालेय बँड “एकतेतच शक्ती आहे” हा संदेश देत
परेडमध्ये सहभाग घेतील. भारतीय वायुदलाच्या सूर्यकिरण पथकाकडून सादर होणारा भव्य एअर शो या
परेडच्या भव्यतेत आणखी भर घालेल.
"विविधतेत एकता" संदेश देणारे संचलन
राष्ट्रीय एकता दिनी परेडमध्ये विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांचे संचालन ‘विविधतेत
एकता’ या विषयाचे दर्शन घडवतील.
या संचालनात राष्ट्रीय सुरक्षा गार्ड, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, गुजरात, जम्मू आणि काश्मीर,
अंदमान-निकोबार बेटे, मणिपूर, महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तराखंड आणि पुद्दुचेरी यांच्या संचालनाचा
समावेश असेल.
यासह सीमा सुरक्षा बल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, सशस्त्र सीमा
बल, दिल्ली पोलीस आणि विविध राज्य पोलीस दलांचे ब्रास बँड कार्यक्रमाच्या उत्सवी वातावरणात अधिक
रंग भरतील.
या परेडमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल चे पाच शौर्यचक्र विजेते आणि सीमा सुरक्षा बल चे १६
वीरता पदक विजेते सन्मानित केले जातील. या शूर जवानांनी नक्षलविरोधी आणि दहशतवादविरोधी
मोहिमांमध्ये, तसेच पश्चिम सीमेवरील ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान, अद्वितीय धैर्य आणि पराक्रमाचे प्रदर्शन
घडविले आहे. परेडसोबतच भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाद्वारे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात
९०० कलाकार भारतीय शास्त्रीय नृत्यांचे सादरीकरण करतील, ज्यातून भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा
आणि विविधतेतील सौंदर्य अधोरेखित होईल.
राष्ट्रीय एकता दिनाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता, सौहार्द आणि देशभक्तीची भावना दृढ
करणे हे आहे. हा उत्सव प्रत्येक भारतीयाला या मूल्यांचा स्वीकार करण्यासाठी आणि देशाच्या ऐक्याच्या
भावनेला बळ देण्यासाठी प्रेरित करतो. १ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एकतानगर येथे ‘भारत
पर्व’ आयोजित करण्यात येईल. या पर्वात संपूर्ण भारतातील सांस्कृतिक सादरीकरणे आणि खाद्य महोत्सव
आयोजित केला जाईल, ज्यामध्ये देशाच्या विविध परंपरांचा संगम पाहायला मिळेल. या पर्वाचा समारोप
१५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करून केला
जाईल.
- वर्षा फडके-आंधळे
उपसंचालक (वृत्त)
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’ राष्ट्रीय एकात्मता वाढवून विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारा सोहळा
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून या
दिवसाकडे पाहिले जाते. यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे ३० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान
आयोजन करण्यात आले असून ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’ हे या कार्यक्रमाचा भाग
आहे.
भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी
स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे विलिनीकरण करून देशाची भौगोलिक आणि राजकीय एकता साध्य केली. कणखर निर्णयक्षमता, मुत्सद्देगिरी, नैतिक धैर्य आणि देशप्रेम, राष्ट्रीय एक्य ही त्यांची गुणात्मक वैशिष्ट्ये होती. त्यांच्या धैर्यवान नेतृत्वाने आणि मुत्सद्दी दृष्टिकोनाने भारताच्या अखंडतेचा पाया रचला. त्यांच्या
स्मृतीप्रित्यर्थ गुजरातमध्ये उभारलेला १८२ मीटर उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आज जगातील सर्वाधिक उंच पुतळा असून, २०२४-२५ या वर्षात तब्बल ६०.५९ लाख पर्यटकांनी येथे भेट दिली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय उत्सव
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश देशातील
युवक, स्वयंसेवक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये राष्ट्रनिर्माणाची भावना जागृत करणे हा आहे. जनभागीदारीद्वारे राष्ट्रनिर्माण करण्यासाठी या उपक्रमाद्वारे युवक, स्वयंसेवक, नागरिक आणि
समाजातील सर्व घटकांना राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री यांच्या प्रोत्साहनातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोहपुरूष सरदार पटेल यांच्या कार्याची ओळख युवकांपर्यंत पोहोचावी यासाठी राष्ट्रीय पातळीवर
तसेच राज्य पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत राष्ट्रीय पदयात्रेचा
शुभारंभ २६ नोव्हेंबर रोजी करमसाड, अहमदाबाद (सरदार पटेल यांचे जन्मस्थान) येथून सुरू होऊन
स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया येथे संपन्न होणार आहे. या प्रवासात युवक, माय भारत स्वयंसेवक,
एनएसएस व यंग लीडर्स विविध सामाजिक विकास उपक्रमांमध्ये सहभागी होतील. या मार्गातील गावे,
जिल्ह्यांच्या १५० ठिकाणी लोहपुरूष सरदार पटेल यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शने, सांस्कृतिक
कार्यक्रम आणि सरदार गाथा सत्रांचे आयोजन करण्यात येईल. ज्यामध्ये सरदार पटेल यांच्या प्रेरणादायी
कार्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी माय भारत
पोर्टलवर https://mybharat.gov.in/pages/unity_march ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या https://mybharat.gov.in या
संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध असून, देशातील सर्व युवकांना या ऐतिहासिक आणि
प्रेरणादायी ‘सरदार@150 एकता मोहिमे’त सहभागी होण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.
भारत पर्व अंतर्गत राज्यात विविध उपक्रम
महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
आहे. युवकांना लोहपुरुषांच्या विचारांची प्रेरणा मिळून सामाजिक बांधिलकी अधिक बळकट होईल, या
विचारातून क्रीडा मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, माय भारत, एनएसएस, एनसीसी तसेच स्थानिक प्रशासन संयुक्तिकरित्या जिल्हास्तरीय पदयात्रा काढणार असून प्रत्येक जिल्ह्यात ८ ते १० कि.मी. अंतराच्या जिल्हास्तरीय पदयात्रा, निबंध आणि वादविवाद स्पर्धा, सरदार पटेल यांच्या जीवनावर चर्चासत्रे आणि पथनाट्ये, नशा मुक्ती भारत प्रतिज्ञा, योग आणि आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम, संस्था स्वदेशी मेळावे, आत्मनिर्भर भारत प्रतिज्ञा, सांस्कृतिक सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक राज्याद्वारे अशा अभिनव स्पर्धा आणि कार्यक्रमांतून देशभर सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
स्वराज्य : एकतेचा धागा
गुजरात येथे राष्ट्रीय संचलनात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यावर्षी स्वराज्य :
एकतेचा धागा या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्याच्या
वैभवशाली इतिहासाची आणि एकतेची झलक दर्शविण्यात येणार आहे. या चित्ररथासोबत १४
कलाकारांचा चमू सांस्कृतिक सादरीकरण करणार आहे. या महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम ७ आणि ८ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडेल. या सांस्कृतिक कार्यक्रमात राज्यातील समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन
घडविण्साठी गोंधळ, नृत्य, कोळी नृत्य, लावणी तसेच वारी परंपरेवर आधारित सादरीकरणे यांचा समावेश
असलेले १५ ते २० कलाकारांचे पथक सहभागी होणार आहे. या उपक्रमांद्वारे राज्याचे ऐतिहासिक,
सांस्कृतिक आणि लोकपरंपरेचे वैभव राष्ट्रीय तसेच आंतरराज्यीय पातळीवर प्रभावीपणे सादर होणार आहे.
गुजरातमध्ये भव्य भारत पर्व सोहळा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय एकता दिनाचा मुख्य भव्य सोहळा गुजरातमधील
एकता नगर (जिल्हा नर्मदा) येथे करण्यात येणार आहे. यावेळी भव्य संचलन आणि सांस्कृतिक महोत्सव
आयोजित करण्यात येणार आहे. संचलनादरम्यान सीएपीएफ आणि विविध राज्यांच्या पोलिस तुकड्या
त्यांच्या शौर्य, शिस्त आणि कौशल्याचे प्रदर्शन करतील. या संचलनात बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, तसेच महाराष्ट्र, पंजाब, केरळ,
जम्मू-काश्मीर, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, ओडिशा, आसाम, त्रिपुरा आणि छत्तीसगड राज्यांच्या पोलीस तुकड्या सहभागी होतील. घोडदळ, उंटदळ, भारतीय श्वानांच्या प्रजाती, तसेच विविध मार्शल आर्ट्स आणि नि:शस्त्र लढाऊ कवायतींचे सादरीकरण होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ९०० कलाकार भारतीय शास्त्रीय नृत्याद्वारे देशाच्या सांस्कृतिक वैविध्याचा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणार आहेत.
‘भारत पर्व’ मधून विविधतेत एकतेचे दर्शन
1 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या या भव्य सोहळ्यात विविध राज्यांतील
सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि खाद्य महोत्सवाचा समावेश करण्यात आला
आहे. 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करून या महोत्सवाचा समारोप करण्यात
येणार आहे. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात, आपल्या संस्कृतीची समृद्ध विविधता आणि राष्ट्रीय एकतेला उजाळा देणारे 900 कलाकार भारतीय शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत.
गुजरात येथे १८०० चौरस मीटर अशा भव्य परिसरात गुजरात शासनाच्या पर्यटन विभागामार्फत
सिंगल डोम (जर्मन हँगर स्ट्रक्चर) उभारण्यात येणार आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून
प्रदर्शनासाठी राज्ये व केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालयांसाठी थीम पॅव्हेलियनसाठी स्वतंत्र जागा
निश्चित करण्यात येणार आहे. थीम पॅव्हेलियन्साठी हँगर स्ट्रक्चरची उभारणी करण्यात येणार असून प्रत्येक पॅव्हेलियनचे परिमाण पाच मीटर x पाच मीटर इतके असणार आहे.
विविध खाद्यपदार्थांचे ४५ तसेच हस्तकला वस्तू प्रदर्शनाचे ५५ असे १०० स्टॉल्स असणार आहेत.
हस्तकला वस्तूंचे स्टॉल केंद्र शासनाच्या हस्ततंत्र व हस्तकला विकास आयुक्तालयामार्फत तर पाच स्टॉल हस्तकला आदिवासी विकास विभागामार्फत उभारण्यात येणार आहेत. १०.८ चौरस मीटर परिसरात हे स्टॉल असतील याचे व्यवस्थापन गुजरात सरकारच्या पर्यटन विभागामार्फत केले जाणार आहे.
४५ स्टॉल्स खाद्यपदार्थांसाठी असणार आहेत. यापैकी पाच दालने ही आदिवासी विकास
विभागामार्फत उभारण्यात येणार आहेत.
तर ३० स्टॉल हे नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट वेंडर ऑफ इंडिया यांच्यामार्फत उभारण्यात
येणार असून, उर्वरित पर्यटन विकास विभागामार्फत उभारण्यात येणार आहेत.
स्टुडिओ किचनची उभारणी आयएचएम गांधीनगरतर्फे भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या
समन्वयाने १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येईल. पर्यटन विभागामार्फत येथे येणाऱ्या वस्तू व
खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी राहण्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. पर्यटक आणि सहभागी युवकांना
विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, खाद्य पदार्थांचे स्टॉल, विविध राज्यांची संस्कृती दर्शविणारे केंद्र उभारून
विविधतेत एकतेचे दर्शन या सोहळ्याच्या माध्यमातून घडणार आहे.
एक भारत, श्रेष्ठ भारताच्या संकल्पनेला नवा उत्साह
३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे एकावेळी दोन राज्ये अशा
पद्धतीने भारत पर्व अंतर्गत एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.
श्रद्धा मेश्राम
विभागीय संपर्क अधिकारी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
मंत्रालय, मुंबई -32
गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस * दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारकाचे उद्घाटन
स्मारक, संदर्भग्रंथाने रा. सू. गवईंच्या कार्याचा गौरव
अमरावती, दि. 30 : रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे कार्य मार्गदर्शक ठरावेत, तसेच त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, यासाठी स्मारक आणि सर्वंकष वाटचालीचा दस्तावेज तयार करण्यासाठी संदर्भग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही प्रकल्पातून त्यांच्या कार्याचा गौरव राज्य शासनाने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
अमरावती येथे राज्य शासनाने उभारलेल्या दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या स्मारकाचा उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. सरन्यायाधिश न्यायमुर्ती भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, ॲड. आशिष जयस्वाल, न्या. भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई, खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे, आमदार किरण सरनाईक, संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, गजानन लवटे, चरणसिंग ठाकूर, चैनसूख संचेती, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, रा. सू. गवई यांच्या कार्यकर्तृत्वाचा सार्थ गौरव करणारे स्मारक उभे राहिले आहे. स्मारक उभे करताना याचा उपयोग विद्यापिठातील विद्यार्थ्यांना व्हावा, तसेच नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, असा दृष्टीकोन ठेवण्यात आला आहे. येत्या काळात याच परिसरात मोठे प्रेक्षागृह साकारल्या जाणार आहे. त्यामुळे हे स्मारक युवकांच्या जडणघडणीत निर्णायक भूमिका निभावेल. स्मारकामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेच्या उपयोगाने रा. सू. गवई यांची दृकश्राव्य भाषणे ऐकण्यास मिळणार आहेत. किऑक्स, डिजीटल वॉल, अशा अत्याधुनिक सोयीने स्मारक उभे राहिले आहे.
रा. सू. गवई यांचे जीवन हे अजातशत्रू होते. त्यांनी समाजाच्या समस्या सोडवून आपली एक विशिष्ट ओळख निर्माण केली. त्यामुळे त्यांची दीर्घ राजकीय वाटचाल महत्वाची ठरली आहे. राज्यपाल पद भूषविताना त्यांनी जैन आणि बौद्ध तिर्थस्थळे विकसित करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. तसेच शैक्षणिक सुधारणांवर भर दिला. भारतीय संविधानाप्रति त्यांना नितांत आदर होता. त्यांनी संविधान बदलाबाबत केलेले ‘नख आणि दाताने विरोध करतो’ हे वाक्य अजरामर आहे. प्रत्येक प्रश्न हा संविधानाच्या माध्यमातून सोडविला जावू शकतो, अशी त्यांची धारणा होती, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
न्यायमुर्ती गवई म्हणाले, रा. सू. गवई यांचे स्मारक पूर्ण होणे ही एक स्वप्नपूर्ती आहे. स्मारकाची पायाभरणी ते उद्घाटन ही कामे गतीने करण्यात आली आहे. या वास्तूचा लाभ नागरिकांना होणार आहे. विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील, हा दृष्टीकोन ठेवून स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारकात जीवनपट दर्शविताना कल्पकता ठेवली आहे. त्यामुळे स्मारक हे सर्वांग सुंदर झाले आहे. समाजाने दिलेल्या आशिर्वादाने वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्य घटकांचे प्रश्न सोडवून न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नुकताच झुडपी जंगलाचा प्रश्न सोडविण्यात आला असून याचा असंख्य शाळा, महाविद्यालय, तसेच नागरिकांचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलतांना म्हणाले, रा. सू. गवई यांचे व्यक्तिमत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून घडले आहे. त्यांच्या अंगी विनयशिलता, नम्रता आणि शालिनता होती. त्यांना भेटल्यानंतर ऊर्जा जाणवायची. त्यांनी चळवळ जीवंत ठेवण्याचे काम केले. त्याचमुळे त्यांची तळागाळातील नागरिकांशी नाळ जुळली. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर त्यांनी सभागृहात आवाज उठविलेला पाहिले आहे. दिक्षाभूमीसोबतच त्यांनी राज्यपाल म्हणून भूषविलेल्या राज्यातील तिर्थस्थळांचा विकास केला. तसेच शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल केला. सामाजिक न्यायाची योजना राबविण्यास सरकारला सूचना केल्यात. त्यामुळे त्यांचे स्मारक हे मानवतेच्या विचारांनी उभे राहिले असल्याचे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, येत्या कालावधीत रा. सू. गवई यांचे जन्मशताब्दी वर्ष येणार आहे. यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी केली. स्मारकाचे काम दर्जेदार झाले आहे. येत्या काळात स्मारकाच्या विस्तारासाठी निधी देण्यात येईल. पूर्णाकृती पुतळाही हुबेहुब साकारला गेला आहे. दादासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत सर्वांशी उत्तम समन्वय साधला. आमदार, खासदार, राज्यपाल म्हणून त्यांची राजकीय वाटचाल दीर्घकाळ राहिली. उत्कृष्ट वक्तृवाने त्यांनी नेतृत्व आणि कर्तृत्व घडविले असल्याचे श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.
स्मारकाच्या कामात विशेष लक्ष देऊन बांधकाम उत्कृष्टरित्या केल्याबद्दल जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याची सरन्यायाधिश भूषण गवई यांनी स्तुती केली. स्मारकाचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच यावेळी कंत्राटदार नितीन गभने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी, वास्तूविषारद प्रशांत सातपुते, मुर्तीकार प्रज्ञानंद मूर्ती, पुरूषोत्तम पाटणकर, उमेश रोडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी स्मारकाच्या दर्शनी भागावरील दादासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी स्मारकाची पाहणी केली. कार्यक्रमात दादासाहेब गवई यांच्या जीवनावरील चित्रफित दाखविण्यात आली. तसेच स्मारकाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रास्ताविक केले. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले.
स्मारकाविषयी…
केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल तसेच रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सू. (दादासाहेब) गवई यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या भव्य स्मारकामध्ये ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सू. (दादासाहेब) गवई यांचे जीवन कार्य दर्शवणारे स्मृतीसभागृह (म्युझियम) आणि अत्याधुनिक श्रोतगृह (ऑडिटोरियम) यांचा समावेश आहे. स्मारकाच्या दर्शनी भागावर दादासाहेबांचा १५ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच दादासाहेब गवई यांच्या जीवनाचा आणि कार्याचा प्रवास दर्शविणारे सभागृह तयार करण्यात आले आहे. या स्मारकासाठी 35 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
स्मारकाच्या दर्शनी भागात दादासाहेबांचा २.५ फूट उंचीचा ब्राँझचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांचा जीवनपट, दुर्मिळ छायाचित्रांसह, भिंतीवरील १६ डिजिटल पोस्टर्सच्या माध्यमातून प्रदर्शित केला जाणार आहे. अभ्यागतांना त्यांच्या कार्याबद्दल सखोल माहिती मिळावी यासाठी दृकश्राव्य कियॉस्क आणि व्हीडीओ वॉलची सोय उपलब्ध आहे. यासोबतच स्मारकात स्मरणिका दालन देखील उभारण्यात आले आहे. तसेच स्मारकाच्या पहिल्या माळ्यावर २०० आसनी क्षमतेचे अद्ययावत श्रोतगृह तयार करण्यात आले आहे. याशिवाय श्रोतगृहाच्या तळ मजल्यावर अभ्यागतांसाठी आणि कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या सुविधा म्हणून एक सुसज्ज किचन आणि उपहारगृहाचा समावेश आहे.
भारताची स्टील फ्रेम – अखिल भारतीय सेवा आणि राष्ट्रनिर्माण
एखाद्या राष्ट्राचे मूल्यमापन केवळ त्याच्या भूगोलाने नव्हे तर त्याच्या संस्थांची कार्यक्षमता, निष्पक्षता आणि लवचिकतेने केली जाते. स्वातंत्र्योत्तर भारतात, अखिल भारतीय सेवा (आयएएस, आयपीएस आणि आयएफओएस) या प्रशासनाच्या कण्याप्रमाणे कार्य करत आहेत, या सेवांनी केंद्र आणि राज्यांमधील सुसंवाद सुनिश्चित केला आणि शासन व नागरिक यांच्यातील दुवा साधला. या सेवांचे वेगवेगळ्या क्षेत्रात केलेले योगदान हे दर्शवते की सरदार वल्लभभाई पटेल यांची दृष्टी आजही एका मजबूत, एकसंघ आणि प्रतिसादक्षम राष्ट्राच्या कार्यपद्धतीस दिशा देणारी आहे.
स्टील फ्रेमचा जन्म
स्वातंत्र्यानंतरच्या राष्ट्राची स्थिती ओळखून, सरदार वल्लभभाई पटेल यांनी व्यावसायिक, निष्पक्ष आणि कार्यक्षम नागरी सेवांची आवश्यकता अधोरेखित केली. हीच “स्टील फ्रेम” केंद्राला विविध राज्यांशी जोडेल, धोरणांची समतोल अंमलबजावणी करेल आणि कायदा व सुव्यवस्था राखून आर्थिक व सामाजिक विकासाला चालना देईल. हे निक्षून सांगितले. सरदार वल्लभभाई पटेल यांना ठाऊक होते की केवळ राजकीय एकता पुरेशी नाही; मजबूत संस्था हाच तत्त्वांना व्यवहारात उतरवण्याचा आणि शांतता व प्रगती टिकवून ठेवण्याचा पाया आहे.
प्रशासकीय एकसंधता आणि स्थैर्य
अखिल भारतीय सेवांचे अधिकारी धोरणे आणि जनतेमधील कार्यक्षम दुवा म्हणून देशभरातील जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्ये कार्यरत असतात, निवडणुका पार पाडणे, सामाजिक कल्याण योजना राबविणे, कायद्याचे राज्य आणि राष्ट्रीय एकात्मता टिकवणे या सर्व कार्यांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. प्रत्येक जिल्ह्यात त्यांची उपस्थिती शासनाला केवळ शहरी केंद्रांपुरते मर्यादित ठेवत नाही, तर प्रत्येक नागरिकाला राष्ट्रनिर्माणाच्या प्रवासात सहभागी बनवते. अनेक भागांमध्ये अधिकारी आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक नियोजन आणि सामाजिक उपक्रमांमध्येही नेतृत्व करतात, ज्यातून या “स्टील फ्रेम”चा बहुआयामी प्रभाव दिसतो.
संकट व्यवस्थापन आणि राष्ट्रनिर्माण
नैसर्गिक आपत्ती असो, सामाजिक अशांतता असो किंवा महामारी, अखिल भारतीय सेवांचे अधिकारी धोरणे आणि योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीत सातत्य, समन्वय आणि नेतृत्व प्रदान करतात. केंद्राच्या धोरणांना स्थानिक वास्तवाशी सुसंगत ठेवण्याची त्यांची क्षमता भारताला अंतर्गत आव्हानांचा सामना करण्यास आणि विविधतेत एकता टिकवण्यास सक्षम करते. आसाममधील पुरापासून गुजरातमधील भूकंपापर्यंत, संकट काळातील त्यांचे नेतृत्व समुदायांना स्थिर ठेवते आणि आवश्यक सेवांची सातत्याने पूर्तता सुनिश्चित करते.
राष्ट्रीय मूल्यांची रुजवण
प्रशिक्षण, प्रशासन आणि नागरिकांशी दैनंदिन संवादाच्या माध्यमातून, अखिल भारतीय सेवा सामायिक जबाबदारीची आणि राष्ट्रीय ध्येयाची भावना वाढवतात. अधिकारी विविध गटांमध्ये मध्यस्थी करतात, वाद सोडवतात आणि सर्वसमावेशक धोरणे अंमलात आणतात, ज्यामुळे एकात्मता आणि शासनावर विश्वास दृढ होतो. या दैनंदिन कार्यातून सामाजिक सुसंवाद वाढतो, कायद्याचा आदर, न्याय आणि सामायिक उद्दिष्टांची भावना बळकट होते — जी एका एकसंध राष्ट्राची पायाभूत मूल्ये आहेत.
अखिल भारतीय सेवा या सरदार पटेल यांच्या या विश्वासाचे जिवंत उदाहरण आहे. मजबूत संस्था हे एकसंघ भारताचे अधिष्ठान आहेत. त्या दृष्टीला कृतीत, धोरणांना व्यवहारात आणि विचारसरणीला राष्ट्रीय एकात्मतेच्या ठोस रूपात परिवर्तित करतात.
राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने, राष्ट्रनिर्माणातील त्यांचे योगदान कोणत्याही राजकीय किंवा सांस्कृतिक प्रयत्नाइतकेच महत्त्वाचे आहे. एकात्मता, निष्पक्षता आणि राष्ट्रीय सेवांचे आदर्श देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात जिवंत राहतील, हे अखिल भारतीय सेवा सुनिश्चित करतात.
श्री.राजू धोत्रे, विभागीय संपर्क अधिकारी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
मंत्रालय, मुंबई -32
सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती व विकास साध्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरावती, दि. 30 : ज्या ठिकाणी चांगल्या बँक निर्माण होतात, त्या ठिकाणी आर्थिक सक्षमता वाढते. नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या बँक महत्त्वपूर्ण ठरतात. सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती व विकास साध्य होतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती येथील अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी 'अभिनंदन हाईट्स' या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या सुविधेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेवा-सुविधेबाबत त्यांनी बँकेचे अभिनंदन केले.
सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रवी राणा, आमदार उमेश उर्फ चंदु यावलकर, प्रवीण पोटे-पाटील, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथ्था, बँकेचे संस्थापक हुकुमचंद डागा, अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष ॲड. विजय बोथरा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री . फडणवीस म्हणाले,
सहकारी बँकेमुळे तळागाळातील नागरिकांचा विकास होतो. शेतकरी व लघु उद्योगांना कर्ज त्वरित कर्ज व बचत सुविधा मिळते. ज्यांना व्यवसाय, उद्योग धंदा स्थापन करावयाचा आहे, त्यांना सुरुवातीला कर्ज लागते. त्यावेळी या बँकेंचे प्रोत्साहन व सहकार्य महत्त्वपूर्ण ठरते. राज्यात सहकारी बँकांनी कालानुरुप बदल केले आहेत. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांच्या स्पर्धेत त्या उत्तम स्थान टिकवून आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकाराचे महत्त्व जाणून 'सहकारिता मंत्रालय ' स्थापन केले आहे. यामुळे सहकार क्षेत्रात मोठे बदल होत आहे .यातून 'सहकारातून समृद्धीकडे' हा मार्ग जात आहे. गुणवत्तापूर्ण कार्य करून 'अभिनंदन सहकारी बँक' सहकार क्षेत्रात चांगले योगदान देत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
सहकारी बँक नागरिकांना आपली बँक वाटते. यातील अभिनंदन बँक ही सर्व मानकांवर उत्तम कार्य करीत आहे. अभिनंदन बँकेला सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्य शासनामार्फत गौरविण्यात आले आहे. ग्राहकांनी या बँकेत ३७३.७७ कोटी जमा केले आहेत. बँकेने २५३.९७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. कर्जाची गुणवत्ता
नेट एन.पी.ए. हे शून्य टक्के आहे. नेट एनपीए हे बँकेच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे लक्षण आहे.
बँक योग्य आर्थिक नियोजन करून आपल्या ग्राहकांना तत्पर आणि अत्याधुनिक सेवा पुरवित असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक हुकुमचंद डागा यांना शाल -श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. कॅम्प परिसरामध्ये अत्याधुनिक सेवा-सुविधांसह अभिनंदन बँकेची पाच मजली इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ २२ हजार चौ. फुट आहे.
बँकेचे अध्यक्ष विजय बोथरा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन प्राजक्ता चौधरी यांनी तर आभार संचालक मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन गांग यांनी मानले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमरावती विमानतळावरुन प्रस्थान
अमरावती, दि. 30 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी 5. 45 वाजता अमरावती विमानतळावरुन मुंबईकडे प्रस्थान केले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार होते.
यावेळी आमदार संजय खोडके, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदी उपस्थित होते. यावेळी लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमरावती विमानतळावर आगमन व स्वागत
अमरावती, दि. 30 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी अमरावती विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. जिल्हा प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले.
यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, आमदार केवलराम काळे, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदी उपस्थित होते.
बुधवार, २९ ऑक्टोबर, २०२५
किमान आधारभूत किमतीने सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू - पणन मंत्री जयकुमार रावल ऑनलाइन ॲपद्वारे व खरेदी केंद्रावर नोंदणी राज्यस्तरीय तीन नोडल संस्थांची नियुक्ती
मुंबई, दि. २९ : सोयाबीन, मूग आणि उडीद या शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. या खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया 30 ऑक्टोबरपासून सुरू होत असून कापूस खरेदीसाठी ‘कपास किसान’ अॅपद्वारे नोंदणी १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू आहे. शेतकऱ्यांनी ॲपद्वारे अथवा खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. एमएसपीनुसार पूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल ," असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
या वर्षी मूग खरेदीचे ३.३० लाख क्विंटल, उडीद खरेदीचे ३२.५६ लाख क्विंटल आणि सोयाबीन खरेदीचे १८.५० लाख मेट्रिक टन असे मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट आहे. शेतकरी विक्रीस आणेल त्या सर्व सोयाबीन, मूग आणि उडीद या शेतमालाच्या मोठ्या प्रमाणात खरेदीचे नियोजन राज्य शासनाने केले असल्याचे पणनमंत्री रावल यांनी सांगितले.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल बोलत होते. यावेळी प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.
पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, "केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्राधान्यकृत बाबींनुसार गेल्या दहा वर्षांत किमान आधारभूत किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राने ११.२१ लाख मेट्रिक टन सोयाबीनची विक्रमी खरेदी केली होती. यावर्षी केंद्र शासनाने सोयाबीनच्या एमएसपी मध्ये ₹४३६ प्रती क्विंटल वाढ करुन रु.५,३२८ केली आहे. तसेच उडीद एमएसपी रु.७,८०० आणि मूगसाठी ८७६८ रुपये केली आहे".
खरेदी प्रक्रिया पारदर्शकतेसाठी प्रभावी उपाययोजना
पणन मंत्री रावल यांनी सांगितले की, राज्यातील सर्व शेतकरी उत्पादक संस्था यांनी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) अंतर्गत शेतमालाची ऑनलाईन प्रणालीद्वारे पारदर्शक खरेदी प्रक्रिया राबवावी, असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.
खरेदी नोंदणी प्रक्रिया ३० ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, शेतकऱ्यांनी केंद्रावर अथवा अॅपद्वारे नोंदणी करून आपल्या सोयीनुसार तारीख आणि वेळ निश्चित करून शेतमाल खरेदी केंद्रांवर आणावा. केंद्र सरकारच्या मानकानुसार खरेदी प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष तसेच तक्रार नोंदवण्याकरिता संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय, खरेदी प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, कृषी अधिकारी आणि पोलिस प्रशासन यांच्या दक्षता पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे.
खरेदी प्रक्रिया सुलभ व पारदर्शक ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई, विदर्भ सहकारी पणन महासंघ, नागपूर आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे या तीन राज्यस्तरीय नोडल संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती यांना देखील पहिल्यांदाच खरेदी केंद्र म्हणून नियुक्त केले आहे.
कापूस खरेदी हमीभाव योजनेअंतर्गत
राज्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसासाठी देखील एमएसपी खरेदी सुरू आहे. ‘कपास किसान’ अॅपद्वारे नोंदणी १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू असून, आतापर्यंत ३.७५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती पणन मंत्री रावल यांनी दिली.
मागील वर्षीचा कापूस दर ₹७५२१ होता, यावर्षी केंद्र शासनाने यात मोठी वाढ करून ₹८११० प्रती क्विंटल दर निश्चित केला आहे. म्हणजेच ₹५८९ रुपयांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी सहा लाख सत्तावीस हजार शेतकरी बांधवांकडून १०,७१४ कोटी रुपयांच्या १४४ लाख क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी करण्यात आली होती. यामुळे यावर्षी खरेदी केंद्रांची संख्या १२४ वरून १७० पर्यंत वाढवण्यात आली आहे.
आदिवासी भागात आरोग्याचे नवे मॉडेल मुख्यमंत्र्यांच्या पथदर्शी प्रकल्पामुळे आदिवासीनुरूप आरोग्य सेवा थेट जंगलात
मुंबई, दि. 29 : गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आरोग्यसेवेचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य आणि स्वयंसेवी संस्था ‘सर्च’ (सोसायटी फॉर एज्युकेशन, ॲक्शन अँड रिसर्च) यांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी व्यापक मोहीम राबवून आदिवासी भागात आरोग्याचे एक नवे मॉडेल तयार केले आहे. येथील दुर्गम भागात आता थेट मोबाईल मेडिकल युनिट पाठवले जाऊ लागले आहे.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही राज्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोलीत आरोग्यसेवा थेट जनतेच्या दारात पोहोचत आहे.
मोबाईल हॉस्पिटल थेट जंगलात
ज्या दुर्गम भागांत पारंपरिक आरोग्यसेवा पोहोचू शकली नव्हती, तिथे आता शासनाचे ‘मोबाईल मेडिकल युनिट’ धाव घेत आहे. एके काळचा धानोरा तालुका हा देशातील अतीमागास, नक्षलग्रस्त आणि आरोग्यसेवेपासून वंचित असा भाग मानला जातो. याच धानोरा तालुक्यातील 70 गावांतील आदिवासी नागरिकांना त्यांच्या दारातच डॉक्टरांकडून तपासणी, औषधे आणि उपचार मिळत आहेत. मोफत आरोग्यसेवेच्या या उपक्रमामुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि विश्वासाचे हास्य उमटले आहे. यातून आरोग्य विभाग आणि आशा सेविकांच्या सहकार्याने आदिवासी भागासाठी एक नवे आरोग्य मॉडेल तयार झाले असल्याचे दिसून येते.
‘आशा’ सेविकांना नवसंजीवनी
‘सर्च’ संस्थेच्या आशा सेविकांना आता नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळत आहे. धानोरा तालुक्यातील 181 आशा सेविकांना वर्षातून तीन वेळा सर्चच्या तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते.
अधिकारी ते आशा – सर्वांसाठी संयुक्त प्रशिक्षण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकताच एक अभिनव करार करण्यात आला असून, सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सर्च संस्थेत प्रत्यक्ष दोन दिवस प्रशिक्षण घेणार आहेत. उच्चपदस्थ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि आशा सेविका या सर्वांना एकत्र बसवून प्रशिक्षण देण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच क्रांतिकारी पद्धत ठरली आहे. याद्वारे खेड्यांमध्ये आरोग्याच्या त्रिस्तरीय सेवा राबविण्याचे हे पथदर्शी उदाहरण आहे.
भविष्यात या भागात आदिवासी संस्कृतीनुरूप आरोग्यसेवा विकसित करण्यावरही भर देण्यात येणार आहे.गडचिरोलीत सुरू झालेली ही आरोग्य चळवळ म्हणजे खऱ्या अर्थाने आरोग्य क्रांतीची नवी पहाट आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’ राष्ट्रीय एकात्मता वाढवून विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारा सोहळा
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे ३० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले असून ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’ हे या कार्यक्रमाचा भाग आहे.
भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे विलिनीकरण करून देशाची भौगोलिक आणि राजकीय एकता साध्य केली. कणखर निर्णयक्षमता, मुत्सद्देगिरी, नैतिक धैर्य आणि देशप्रेम, राष्ट्रीय एक्य ही त्यांची गुणात्मक वैशिष्ट्ये होती. त्यांच्या धैर्यवान नेतृत्वाने आणि मुत्सद्दी दृष्टिकोनाने भारताच्या अखंडतेचा पाया रचला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुजरातमध्ये उभारलेला १८२ मीटर उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आज जगातील सर्वाधिक उंच पुतळा असून, २०२४-२५ या वर्षात तब्बल ६०.५९ लाख पर्यटकांनी येथे भेट दिली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय उत्सव
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश देशातील युवक, स्वयंसेवक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये राष्ट्रनिर्माणाची भावना जागृत करणे हा आहे. जनभागीदारीद्वारे राष्ट्रनिर्माण करण्यासाठी या उपक्रमाद्वारे युवक, स्वयंसेवक, नागरिक आणि समाजातील सर्व घटकांना राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री यांच्या प्रोत्साहनातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोहपुरूष सरदार पटेल यांच्या कार्याची ओळख युवकांपर्यंत पोहोचावी यासाठी राष्ट्रीय पातळीवर तसेच राज्य पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत राष्ट्रीय पदयात्रेचा शुभारंभ २६ नोव्हेंबर रोजी करमसाड, अहमदाबाद (सरदार पटेल यांचे जन्मस्थान) येथून सुरू होऊन स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया येथे संपन्न होणार आहे. या प्रवासात युवक, माय भारत स्वयंसेवक, एनएसएस व यंग लीडर्स विविध सामाजिक विकास उपक्रमांमध्ये सहभागी होतील. या मार्गातील गावे, जिल्ह्यांच्या १५० ठिकाणी लोहपुरूष सरदार पटेल यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सरदार गाथा सत्रांचे आयोजन करण्यात येईल. ज्यामध्ये सरदार पटेल यांच्या प्रेरणादायी कार्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी माय भारत पोर्टलवर https://mybharat.gov.in/pages/unity_march ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या https://mybharat.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध असून, देशातील सर्व युवकांना या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ‘सरदार@150 एकता मोहिमे’त सहभागी होण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.
भारत पर्व अंतर्गत राज्यात विविध उपक्रम
महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांना लोहपुरुषांच्या विचारांची प्रेरणा मिळून सामाजिक बांधिलकी अधिक बळकट होईल, या विचारातून क्रीडा मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, माय भारत, एनएसएस, एनसीसी तसेच स्थानिक प्रशासन संयुक्तिकरित्या जिल्हास्तरीय पदयात्रा काढणार असून प्रत्येक जिल्ह्यात ८ ते १० कि.मी. अंतराच्या जिल्हास्तरीय पदयात्रा, निबंध आणि वादविवाद स्पर्धा, सरदार पटेल यांच्या जीवनावर चर्चासत्रे आणि पथनाट्ये, नशा मुक्ती भारत प्रतिज्ञा, योग आणि आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम, संस्था स्वदेशी मेळावे, आत्मनिर्भर भारत प्रतिज्ञा, सांस्कृतिक सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक राज्याद्वारे अशा अभिनव स्पर्धा आणि कार्यक्रमांतून देशभर सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
स्वराज्य : एकतेचा धागा
गुजरात येथे राष्ट्रीय संचलनात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यावर्षी स्वराज्य : एकतेचा धागा या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्याच्या वैभवशाली इतिहासाची आणि एकतेची झलक दर्शविण्यात येणार आहे. या चित्ररथासोबत १४ कलाकारांचा चमू सांस्कृतिक सादरीकरण करणार आहे. या महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम ७ आणि ८ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडेल. या सांस्कृतिक कार्यक्रमात राज्यातील समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडविण्साठी गोंधळ, नृत्य, कोळी नृत्य, लावणी तसेच वारी परंपरेवर आधारित सादरीकरणे यांचा समावेश असलेले १५ ते २० कलाकारांचे पथक सहभागी होणार आहे. या उपक्रमांद्वारे राज्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकपरंपरेचे वैभव राष्ट्रीय तसेच आंतरराज्यीय पातळीवर प्रभावीपणे सादर होणार आहे.
गुजरातमध्ये भव्य भारत पर्व सोहळा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय एकता दिनाचा मुख्य भव्य सोहळा गुजरातमधील एकता नगर (जिल्हा नर्मदा) येथे करण्यात येणार आहे. यावेळी भव्य संचलन आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. संचलनादरम्यान सीएपीएफ आणि विविध राज्यांच्या पोलिस तुकड्या त्यांच्या शौर्य, शिस्त आणि कौशल्याचे प्रदर्शन करतील. या संचलनात बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, तसेच महाराष्ट्र, पंजाब, केरळ, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, ओडिशा, आसाम, त्रिपुरा आणि छत्तीसगड राज्यांच्या पोलीस तुकड्या सहभागी होतील. घोडदळ, उंटदळ, भारतीय श्वानांच्या प्रजाती, तसेच विविध मार्शल आर्ट्स आणि नि:शस्त्र लढाऊ कवायतींचे सादरीकरण होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ९०० कलाकार भारतीय शास्त्रीय नृत्याद्वारे देशाच्या सांस्कृतिक वैविध्याचा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणार आहेत.
‘भारत पर्व’ मधून विविधतेत एकतेचे दर्शन
1 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या या भव्य सोहळ्यात विविध राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि खाद्य महोत्सवाचा समावेश करण्यात आला आहे. 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करून या महोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात, आपल्या संस्कृतीची समृद्ध विविधता आणि राष्ट्रीय एकतेला उजाळा देणारे 900 कलाकार भारतीय शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत.
गुजरात येथे १८०० चौरस मीटर अशा भव्य परिसरात गुजरात शासनाच्या पर्यटन विभागामार्फत सिंगल डोम (जर्मन हँगर स्ट्रक्चर) उभारण्यात येणार आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून प्रदर्शनासाठी राज्ये व केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालयांसाठी थीम पॅव्हेलियनसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात येणार आहे. थीम पॅव्हेलियन्साठी हँगर स्ट्रक्चरची उभारणी करण्यात येणार असून प्रत्येक पॅव्हेलियनचे परिमाण पाच मीटर x पाच मीटर इतके असणार आहे.
विविध खाद्यपदार्थांचे ४५ तसेच हस्तकला वस्तू प्रदर्शनाचे ५५ असे १०० स्टॉल्स असणार आहेत. हस्तकला वस्तूंचे स्टॉल केंद्र शासनाच्या हस्ततंत्र व हस्तकला विकास आयुक्तालयामार्फत तर पाच स्टॉल हस्तकला आदिवासी विकास विभागामार्फत उभारण्यात येणार आहेत. १०.८ चौरस मीटर परिसरात हे स्टॉल असतील याचे व्यवस्थापन गुजरात सरकारच्या पर्यटन विभागामार्फत केले जाणार आहे.
४५ स्टॉल्स खाद्यपदार्थांसाठी असणार आहेत. यापैकी पाच दालने ही आदिवासी विकास विभागामार्फत उभारण्यात येणार आहेत.
तर ३० स्टॉल हे नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट वेंडर ऑफ इंडिया यांच्यामार्फत उभारण्यात येणार असून, उर्वरित पर्यटन विकास विभागामार्फत उभारण्यात येणार आहेत.
स्टुडिओ किचनची उभारणी आयएचएम गांधीनगरतर्फे भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या समन्वयाने १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येईल. पर्यटन विभागामार्फत येथे येणाऱ्या वस्तू व खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी राहण्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. पर्यटक आणि सहभागी युवकांना विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, खाद्य पदार्थांचे स्टॉल, विविध राज्यांची संस्कृती दर्शविणारे केंद्र उभारून विविधतेत एकतेचे दर्शन या सोहळ्याच्या माध्यमातून घडणार आहे.
एक भारत, श्रेष्ठ भारताच्या संकल्पनेला नवा उत्साह
३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे एकावेळी दोन राज्ये अशा पद्धतीने भारत पर्व अंतर्गत एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.
श्रद्धा मेश्राम
विभागीय संपर्क अधिकारी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
मंत्रालय, मुंबई -32
पुणे ग्रँड टूरमुळे पुण्यातील पर्यटन वाढेल ; सायकलचे शहर ही जुनी ओळख पुन्हा प्रस्थापित होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’चे बोधचिन्ह आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
पुणे, दि. २९ : ‘बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’ या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या माध्यमातून पुण्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटनस्थळांचे महत्व अधोरेखित होईल आणि पर्यटकांची संख्या वाढेल. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच प्रदूषणावर मात करत पुण्याची “सायकलचे शहर” ही ओळख पुन्हा प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्य शासन, पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’ चे बोधचिन्ह व जर्सी अनावरण समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग, आशियाई सायकलिंग महासंघाचे माजी महासचिव ओंकारसिंग, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सायकलचे माहेरघर असलेल्या पुण्यात खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. प्रदूषण आणि जीवनशैलीतील बदलांमुळे उद्भवणाऱ्या आजारांचा विचार करता सायकल चालविण्याला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. जगभरात सायकलस्वारांचा आदराने गौरव केला जातो. या पार्श्वभूमीवर ‘पुणे ग्रॅण्ड टूर’ सायकलिंग संस्कृतीला नवा आयाम देईल.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ही स्पर्धा पुण्याला जगाच्या नकाशावर घेऊन जाणारी ठरेल. देशात सायकल श्रीमंताचे वाहन म्हणून दीडशे वर्षांपूर्वी आली होती. त्यावेळी सायकल वापरण्यासाठी परवाना लागायचा. पुण्यात १९४७ साली पहिली सायकल स्पर्धा झाली होती. त्यामुळे पुण्याची ओळख ‘सायकलचे शहर’ म्हणून होती, आणि ही सायकल संस्कृती आजही शहराच्या अभिमानाचा भाग आहे. जागतिक वेळापत्रकात या स्पर्धेचा समावेश झाल्याने तिचे आयोजन अत्यंत यशस्वी ठरेल आणि ही स्पर्धा देशासाठी महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्याच्या ७७ वर्षीय सायकलपटू निरुपमा भावे, प्रीती म्हस्के, अहिल्यानगरच्या प्रणिती सोमण, छत्रपती संभाजीनगरचे भारत सोनवणे, जळगावचे आकाश म्हेत्रे आणि सोलापूरच्या पूजा दानोळे यांच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांचे अभिनंदन केले.
सायकल स्पर्धा आरोग्य, रोजगार, पर्यटन आणि विकासाचा एकत्रित महोत्सव ठरेल-उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ऐतिहासिक वारसा असलेल्या पुण्यातून ग्रॅण्ड चॅलेंज टूर सुरू होत असल्याने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगातून जाणाऱ्या २०० हून अधिक गावांमधून ही खडतर स्पर्धा होणार आहे. ‘टूर द फ्रान्स’पासून प्रेरणा घेत आयोजित होणारी ही स्पर्धा म्हणजे केवळ क्रीडा नाही, तर पर्यावरण, आरोग्य आणि शाश्वत जीवनशैलीचे प्रतिक आहे.
या स्पर्धेसाठी भिमाशंकर,महाबळेश्वर आणि भंडारदरा परिसरातील ‘भारतीय शेकरू’ या दुर्मिळ प्रजातीवर आधारित बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. याद्वारे ग्रामीण पर्यटनाला चालना मिळून रोजगारनिर्मिती होईल व राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. ही स्पर्धा म्हणजे आरोग्य, रोजगार, पर्यटन आणि विकासाचा एकत्रित महोत्सव ठरेल, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन होत असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्र्यांनी अल्पावधीत केलेल्या तयारीबद्दल जिल्हा प्रशासन व सर्व शासकीय यंत्रणांचे अभिनंदन केले. तसेच स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री खडसे म्हणाल्या, देशात २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आहे. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताकडे वाटचाल करताना क्रीडा क्षेत्राचा वाटा मोठ्या प्रमाणावर राहणार आहे. रविवारी ५ ते ६ हजार ठिकाणी ‘सायकल ऑन संडे’ उपक्रम संपूर्ण देशभर राबविला जात आहे, ज्यामध्ये सुमारे ५ लाख सायकलपटू सहभागी होतात. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘फिट इंडिया’हे स्वप्न पूर्ण होणार आहे.
केंद्र सरकारचे क्रीडा धोरण हे क्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून देशभर पुढे नेण्यावर केंद्रित आहे. महाराष्ट्रात विविध पर्यटनस्थळे असल्याने ‘पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टूर’च्या माध्यमातून क्रीडा पर्यटनाचे उत्तम उदाहरण देशभर दिले जाईल. क्रीडा विज्ञान हे एक नवे क्षेत्र असून, त्याद्वारे राज्यातील खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणता येईल, असेही रक्षा खडसे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ‘पुणे ग्रॅण्ड टूर –२०२६’ची संकल्पना आणि तयारी विषयी माहिती दिली.
बोधचिन्ह, जर्सीचे अनावरण आणि शुभंकर प्रदर्शित
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री मंत्री रक्षा खडसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व अन्य मान्यवरांच्या हस्ते 'पुणे ग्रँड टूर -२०२६' च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर जंगलात आढळणाऱ्या शेकरूवर ( उडती खार ) आधारित स्पर्धेचे ' इंदू ' हे शुभंकर जारी करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, राहूल कुल, सिद्धार्थ शिरोळे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार, क्रीडा व युवक सेवा आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
'पुणे ग्रँड टूर -२०२६ चे मुख्य प्रायोजक बजाज, प्रायोजक सिरम इन्स्टिटयूट, चितळे बंधु आणि पंचशील ग्रुप असून यावेळी त्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)































