मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक
जाहीर
दावे व हरकती दाखल करण्यासाठी १३ नोव्हेंबरपर्यंत मुदत
अमरावती, दि. २ : भारत निवडणूक
आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६
कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १३ नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. तसेच नोटीस टप्पा, दावे व
हरकती निकाली काढण्याची मुदत २५ नोव्हेंबर पर्यंत आहे. अंतिम मतदार यादी ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे
अवर सचिव तथा उप मुख्य निवडणूक अधिकारी प्रशांत नावगे यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा