वृत्त क्र.80 दिनांक : 5 एप्रिल 2019
अनुसूचति जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी
प्रमाणपत्र
पडताळणी विशेष मोहिम व तपासणी
अमरावती, दि. 5 : सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर व्यवसायिक
अभ्यासक्रमासाठी वैद्यकीय, अभियांत्रिकी, पशुवैद्यकीय, कृषी,डी.टी.एड, बी.एड,व
अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम जेथे आयुक्त, समावेश सामाईक प्रवेश परीक्षा मुंबई (CET)
यांचेद्वारे प्रवेश पात्रता ठरविण्यात येत असलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ
इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मेहिम राबवून तपासणी करण्यात येत आहे.
सन 2019-20 शैक्षणिक
वर्षांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इ.10 वी 12 वी नंतर वैद्यकीय
अभियांत्रिकी, पशुवैद्यकीय, कृषी, डी.टी.एड, बी.एड, अन्य व्यावसायिक पदविका /पदवी
अभ्यासक्रमाकरिता तसेच इतर अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतांना अनुसूचित जमाती
वैद्यता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर अनुसूचित
जमातीच्या विद्यार्थ्यांना सवलती मिळू शकतात. राज्यात नुकत्याच झालेल्या इ. 10 वी
व 12 वी परीक्षेचा निकाल यथाशिघ्र लागणार आहे. निकाल लागल्यानंतर अनुसूचित
जमातीच्या विद्यार्थ्यांची विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धावपळ सुरु होईल.
परिणामी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत अनुसूचित जमाती प्रमाणपत्र
पडताळणी समित्यांकडे ( पूणे, नाशिक, नागपूर, ठाणे, औरंगाबाद, अमरावती, नंदूरबार व
गडचिरोली) मोठ्या प्रमाणात शैक्षणिक प्रयोजनासाठी अर्ज प्राप्त होत आहेत.
या मोहिमेंतर्गत अनुसूचित
जमातीच्या विद्यार्थ्यांना e-tribe पोर्टलवर https:www.etribevalidity. mahaonline.gov.in ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्राधान्याने गुणवत्तेच्या
आधारे वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या संदर्भात अमरावती समितीच्या पोलीस दक्षता पथकाला देखील गृह व शालेय चौकशीची कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या
सूचना देण्यात आलेल्या आहेत. सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र
तपासणी समिती, अमरावती
येथे Helpline No. 0721-2550991 सुरु करण्यात आलेली असून सकाळी 10.00 ते सांय
7.00 या कालावधीत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दूरध्वनीवरुन वैधता
प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. समितीमार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी
विशेष कक्षामार्फत आवश्यक ती माहिती पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र
पडताळणी समितीचे ठिकाण अमरावती असून पत्ता
शासकीय विश्रामगृहाजवळ, राज्य माहिती आयुक्त यांचे कार्यालयासमोर, सना बिल्डींग,
जूना बायपास रोड चपराशीपुरा, अमरावती -444602,असून दुरध्वनी क्रमांक 0721-2550991
व ई मेल आयडी tcscamr.mah@ nic.in आहे त्याच
प्रमाणे कार्यक्षेत्र अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम हे आहे.
असे उपसंचालक तथा सदस्य सचिव, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती
अमरावती यांनी कळविले आहे.
*****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा