मंगळवार, ३० एप्रिल, २०१९

दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज सादर करावे


दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज सादर करावे

अमरावती, दि. 30 :  सन 2019- 20 या शैक्षणिक वर्षाकरिता शासकीय बहुउदेशिय समिश्र अपंग केंद्र वाशिम येथे अंध, मुकबधिर व अस्थीवंग या प्रवर्गातील 6 ते 16 वर्ष या वयोगटातील अपंग लाभार्थ्याना प्रवेश देणे सुरु आहे.
प्रवेशा साठी अर्ज वाटप सुरु झाले असून प्रवेश अर्जासोबत दिव्यांग बालकाचे तीन पासपोर्ट साईस फोटो, अपंगत्वाचा दाखला, जन्मतारखेचा दाखला अथवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत, पालकाच्या मागील वर्षाचे उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
संस्थेत भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश, वैद्यकीय उपचार इत्यादी मोफत पुरविल्या जातील तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वागीण  विकासाकरीता येथे तज्ञ शिक्षकवृंद असतील. प्रवेशाकरीता शासकीय बहुउदेशिय संमिश्र अपंग केंद्र जुनी जिल्हा परिषद इमारत अकोला नाका, वाशिम येथे 899062957 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे शासकीय बहुउदेशिय संमिश्र अपंग केंद्र वाशिम यांनी कळविले आहे.
****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा