शुक्रवार, ५ एप्रिल, २०१९

आचारसंहितेच्या कालावधीमध्ये विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही


वृत्त क्र.81                                                                                                         दिनांक : 5  एप्रिल 2019


आचारसंहितेच्या कालावधीमध्ये विभागीय लोकशाही दिनाचे
आयोजन करण्यात येणार नाही

अमरावती, दि. 5  :  सार्वत्रिक लोकसभा निवडणूक -2019 साठी आदर्श आचार संहिता लागू करण्यात आलेली असून निवडणूकीच्या कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. ज्या ज्या क्षेत्रामध्ये निवडणूकीकरीता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येवू नये. असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 साठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे एप्रिल - 2019 व मे- 2019 चे होणारे विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन होणार नसून जुन- 2019 मध्येच विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. असे उपआयुक्त (सा.प्र) अमरावती विभाग, अमरावती यांनी कळविले आहे.
****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा