वृत्त क्र.82 दिनांक : 8 एप्रिल 2019
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना
सुटी
अमरावती, दि. 8 : अमरावती लोकसभा मतदार संघात 18 एप्रिल रोजी मतदान होत
असून या दिवशी खाजगी आस्थापनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुटी द्यावी असे सहाय्यक
कामगार आयुक्तांनी कळवले आहे.
या बाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की अमरावती लोकसभा
क्षेत्रातील दुकाने व आस्थापना , निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार,
औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग
सेंन्टर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापना मध्ये कार्यरत मतदारांना मतदानाचा हक्क
बजावण्यासाठी (अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकाने व आस्थापना वगळून) सर्व आस्थापना
सकाळी 7.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळेत बंद ठेवण्यात येतील, तसेच त्यादिवशी बंद
राहिलेल्या दुकाने, आस्थापनेमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोणत्याही प्रकारे कपात
करण्यात येणार नाही.
अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर, कामगारांना
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटी ऐवजी केवळ 2 ते 3 तासाची सवलत देता येईल. असे
सहाय्यक कामगार आयुक्त, अमरावती यांनी कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा