मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी 20 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावे


दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी
20 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती, दि. 17  : शिक्षण मंडळामार्फत इयत्ता शिक्षण मंडळामार्फत 12 वी व इयत्ता 10 वी च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगिरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ठ होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. फेब्रुवारी-मार्च 2020 च्या इयत्ता 10 वी 12 वी परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याचा कालावधी दिनांक 14 ते 20 डिसेंबर 2019 निश्चित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यासाठी या वेबसाईडचा वापर करावा. http://form17.mh-ssc.ac.in  http://form 17.mh-hsc.ac.in  विद्यार्थ्यांने अर्ज या संकेतस्थळावरुन सादर करावे. अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मुळ प्रत), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो सादर करावा. अर्ज भरताना कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर करुन अपलोड करावी असे विभागीय सचिव, अमरावती विभागीय मंडळ, अमरावती यांनी कळविले आहे.
****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा