शुक्रवार, २० डिसेंबर, २०१९

राज्यपालांच्या हस्ते वसतिगृहाचे उद्घाटन







राज्यपालांच्या हस्ते वसतिगृहाचे उद्घाटन
अमरावती, दि. 20 : येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उभारण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले.
सुमारे दीड कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या वसतीगृहामुळे विद्यापीठात संशोधन करणाऱ्या 25 संशोधक छात्रांच्या निवासाची सोय होणार आहे.
यावेळी केंद्रीय मानव संसाधन विकास खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे, कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यास पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा