राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आज
राज्यपालांच्या
हस्ते उद्घाटन
अमरावती, दि. 19 : आदिवासी विकास विभागाच्यावतीने आयोजित शासकीय व
अनुदानीत आाश्रमशाळांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन राज्यपाल श्री.
भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.20 डिसेंबर) सकाळी 9.30 वाजता होणार
आहे. या स्पर्धांचे आयोजन येथील श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे करण्यात
आले असून उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य राहतील. या कार्यक्रमाला विविध लोकप्रतिनिधी
आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे
आवाहन आदिवासी विकास आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी आणि आदिवासी विकास विभागाचे अमरावती
येथील अपर आयुक्त विनोद पाटील यांनी केले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा