सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

विभागीय लोकशाहीदिनी 9 प्रकरणे सादर


विभागीय लोकशाहीदिनी 9 प्रकरणे सादर

अमरावती,दि.9- आज आयोजित विभागीय लोकशाही दिनात नऊ प्रकरणे सादर करण्यात आली. या प्रकरणांवर आणि एकूणच लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या प्रकरणांवर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी असे विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज विभागीय आयुक्त कर्यालयाच्या सभागृहात आयोजीत लोकशाही दिनात श्रीमती वैशाली पाथरे यांनी विभागातील विविध कार्यालयांशी निगडीत नऊ प्रकरणे सादर केली.
****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा