शिक्षक मतदारसंघाच्या तिवसा मतदान केंद्राची पाहणी
* विभागीय आयुक्त,
जिल्हाधिकारी यांच्याकडून सूचना
अमरावती, दि. 24 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती
विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दि. 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. अमरावती विभागातील
पाच जिल्ह्यात 77 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्यानुषंगाने विभागीय आयुक्त पियूष
सिंह आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज तिवसा येथील मतदानकेंद्राची पाहणी केली.
यावेळी तहसिलदार वैभव फरतारे, नायब तहसिलदार दत्तात्रय
पंधरे आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त पियूष सिंह आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी
तिवसा येथे मतदान होणाऱ्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय आणि तालुका क्रिडा
संकुल येथील सोयीसुविधांची भेट देऊन पाहणी केली. मतदान सुरळीत आणि योग्य पद्धतीने होण्यासाठी
त्यांनी संबंधित यंत्रणेला सूचना केल्या. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा आढावा त्यांनी
या भेटी दरम्यान घेतला. शिक्षक मतदारसंघाच्या मतदान कक्षातील प्रत्येक बाबींची त्यांनी
माहिती जाणून घेत मार्गदर्शन केले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा