विभागीय आयुक्त कार्यालयात
माझी वसुंधरा अभियानांतर्गत शपथ
अमरावती, दि. 1 : निसर्गाशी संबंधित पंच तत्वावरर आधारीत
माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
याअनुषंगाने आज विभागीय आयुक्त कार्यालयात माझी वसुंधरा अभियानांतर्गत विभागीय
आयुकत पियूष सिंह यांनी अधिकारी-कर्मचारी यांना शपथ दिली.
प्रत्येक नागरिकाला सहभागी करून माझी वसुंधरा अभियानाला
गती देण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग म्हणून 1 ते 15
जानेवारी दरम्यान माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने हरित
शपथ घेण्यात येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात नविन वर्षाच्या सुरवातीला हरित
शपथ घेण्यात आली. विभागीय आयुक्त यांनी ही शपथ दिली. यावेळी अपर आयुक्त निलेश
सागर, उपायुक्त अजय लहाने, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, सहायक आयुक्त विकास
विलास जाधव, तहसिलदार वैशाली पाथरे, स्वीय सहायक अतुल बुटे आदी अधिकारी-कर्मचारी
उपस्थित होते.
यावेळी अधिकारी-कर्मचारी यांनी शासकीय कामकाजात कागदाचा
काटकसरीने उपयोग, ऊर्जा बचत करणाऱ्या साधनांची खरेदी, एकदाच उपयोगात येणाऱ्या
वस्तूंची खरेदी टाळणे, खानपाणाच्या ठिकाणी अन्नाचा दुरूपयोग टाळणे, हरित भेट वस्तूंचा
अंगीकार करण्याबाबत शपथ घेतली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा