शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

 





विभागीय आयुक्त कार्यालयात

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

अमरावती, दि. 30 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, सामान्य प्रशासन उपायुक्त संजय पवार यांनीही तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

0000

 

 

गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दराने कृषि निवीष्ठा मिळण्याबाबत सनियंत्रण कक्षाची स्थापना

 

            शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दराने कृषि निवीष्ठा

मिळण्याबाबत सनियंत्रण कक्षाची स्थापना

अमरावती दिनांक 22 :- खरीप व रब्बी हंगाम 2021-2022 मध्ये शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात कृषि निविष्ठा मिळणेबाबत व कृषि निविष्ठांच्या तक्रारी बाबतचे संनियंत्रण करण्यासाठी तसेच कोव्हीड- 19 या संसर्गजन्य रोगाच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व अडचणीचे निराकरण करण्यासाठी राज्य स्तर, विभागीय स्तर, जिल्हा स्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावे असे शासनाने निर्देश आहेत. त्यानुसार विभागस्तरावर खरीप हंगामासाठी 15 मे 2021 ते 15 ऑगस्ट 2021 पर्यत व रब्बी हंगामासाठी 15 सप्टेंबर, 2021 ते 30 नोव्हेंबर, 2021 पर्यत खालीलप्रमाणे तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येत आहे. तक्रार निवारण कक्षाचे कामकाज सकाळी 10 ते रात्री 7 या कालावधीत सुरु राहील. ज्या कर्मचा-यांच्या शासकीय सुटीच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत सुचना करण्यात आलेल्या आहेत ते कर्मचारी दिलेल्या वेळेमध्ये तक्रार निवारण कक्षाचे काम सांभाळतील.

            कार्यालयातील. 0721-2552422 दुरध्वनी क्रमांकावर दिलेल्या वेळेप्रमाणे विभागस्तरीय गुणानियंत्रण कक्षाबाबत काम करावयाचे असुन दुरध्वनीद्वारे प्राप्त गुणनियंत्रणविषयक व निविष्ठाविषयक तक्रारींची नोंद घेवून त्वरीत संबंधीत अधिकाऱ्यांना त्याबाबतीत अवगत करावे. तंत्र अधिकारी एन.आर.बारापात्रे (9130301212),  विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक ए. एस. मस्करे (7588080633), कृषि अधिकारी व्हि. एस. जिरवणकर (8805474349), वरिष्ठ लिपिक एस. टी. नागे (9822012341), वरिष्ठ लिपिक यु. एस. बसले (9890462179) आहे.

            तक्रार निवारण कक्ष सकाळी 10 ते रात्री 7 या कालावधीत सुरु राहील. कृषि विभागाचा कर्मचारी/अधिकारी ह्या कालावधीत कक्षात उपलब्ध राहील. तक्रार निवारण कक्षातील अधिकाऱ्याकडे सर्व कृषि विकास अधिकारी, आयुक्तालयातील अधिकारी, त्यांच्या जिल्ह्यातील प्रमुख विक्रेते, यांचे दूरध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे. जेणेकरुन त्याला तात्काळ मार्गदर्शन करता येईल. सदर अधिकाऱ्यास आपल्या कार्यक्षेत्रात येणारे सर्व निविष्ठांची माहिती अद्यावत असणे आवश्यक आहे.

            विभागात बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके पुरवठ्याचे सनियंत्रण करुन मा. कृषि संचालक (नि व गुनि), कृषि आयुक्तालय, पुणे यांचेक सुचनेप्रमाणे शेतकऱ्यांना वेळेवर रास्त भावात व दर्जेदार निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे. तसेच शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारीची तात्काळ दखल घेऊन तक्रार वहीमध्ये तक्रार करणाऱ्याचे नाव, तक्रारीचे स्वरुप, तक्रार प्राप्त दिनांक, वेळ, त्याला केले मार्गदर्शन त्याचा संपर्क पत्ता, दुरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक यांची नोंद घ्यावी. ज्या तालुक्यातील, जिल्ह्यातील तक्रार आहे तेथील संबंधीत निरिक्षकास कळवून सदर तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करणास सूचित करावे.

0000000

युवकांनी रोजगाराच्या फसव्या जाहीरातींना बळी पडू नये

 

युवकांनी रोजगाराच्या फसव्या

जाहीरातींना बळी पडू नये

अमरावती, दि. 22 : आदिवासी विकास विभागार्माफत युवकांना रोजगार देण्याबाबत कोणत्याही प्रकारची जाहीरात प्रसिध्द करण्यात आली नसून यूवकांनी फसव्या जाहीरातींना व आमिषाला बळी पडू नये असे आवाहन आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त विनोद पाटील यांनी केले.

अपर आयुक्त आदिवासी विकास,अमरावती येथील कार्यालयाने कोणत्याही प्रकारच्या पद भरतीची जाहीरात  प्रसिध्द केलेली नाही. पी.बी. गावंडे नावाचे व्यक्ती स्वत:ला ह्या विभागाचे सहाय्यक आयुक्त सांगुन बेरोजगार उमेदवारांची फसवणुक करीत असल्याचे ह्या विभागाचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा फसवणुकीस कोणत्याही उमेदवारांनी बळी पडू नये. अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष कार्यालयाशी संपर्क साधून शहानिशा करावी.असे अपर आयुक्त आदिवासी विकास, विनोद पाटील अमरावती यांनी कळविले

00000

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला
पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे अभिवादन
अमरावती, दि १४ : पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी प्रवीण मनोहर, रामभाऊ पाटील, अनिल गोंडाने आदी उपस्थित होते.
विभागीय माहिती कार्यालयात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
अमरावती, दि १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय माहिती कार्यालयात सहायक संचालक गजानन कोटुरवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी छायाचित्रकार मनीष झिमटे, कोमल भगत, गणेश वानखेडे उपस्थित होते.
विभागीय आयुक्त कार्यालयात
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
अमरावती दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी उपायुक्त संजय पवार, तहसीलदार वैशाली पाथरे यांचेसह अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


पांदण रस्त्याची योजना प्राधान्य क्रमावर घेणार
-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
अचलपूर येथे ६०० किलोमीटरच्या पांदण रस्त्यांचे भूमीपूजन
अमरावती, दि. १४ : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पोहोचण्यासाठी पांदण रस्ता आवश्यक आहे. ज्याप्रमाणे महामार्ग महत्वाचा आहेत, त्याचप्रमाणे शेती विकासासाठी पांदण रस्ता महत्वाचा आहे. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन पांदण रस्ता ही योजना प्राधान्य क्रमावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेस निधी आणि निर्णय प्रक्रिया गतीने होण्यास मदत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
आज अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालय परिसरात अचलपूर आणि चांदूरबाजार या तालुक्यातील सहाशे किलोमीटर लांबीच्या पांदण रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दुरुस्थ पद्धतीने उपस्थिती दर्शवली. त्यावेळेस ते बोलत होते.
अचलपूर येथील कार्यक्रमाला राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह नगराध्यक्ष सुनीता फिसके, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध देशमुख, उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार आदी उपस्थित होते
दूरस्थपणे या कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल, किरण सरनाईक, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते.
श्री. ठाकरे म्हणाले, विदर्भाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या दुसऱ्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहत आहे. या कार्यक्रमाआधी नागपूर येथील विधी विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर अचलपूर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहत आहे. हे दोन्ही कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. 
शेतकऱ्यांना वीज, पाणी अत्यंत आवश्यक आहे. त्याप्रमाणे शेतामध्ये पोहोचण्यासाठी पांदण रस्ते महत्त्वाचे आहे. राज्याच्या विकासासाठी ज्याप्रमाणे महामार्ग आवश्यक आहेत, त्याप्रमाणे ग्रामीण भागाच्या विकासासाठी पांदण रस्त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करण्याची क्षमता या पाणंद रस्त्यामध्ये आहे. या रस्त्याचे खडीकरण झाल्यास शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर पोहोचणे सुलभ होईल.
शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे. त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे यास उशीर होत आहे. कोरोनाचे संकट हे अधिक आहे. परंतु शेतकऱ्यांच्या विकासासाठी जे काही शक्य आहे, त्या कामांना प्राधान्य दिले जाईल. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्याने विचार केला जाईल. ज्याप्रमाणे आज पांदण रस्त्याचा विषय मार्गी लागला आहे, अशाच पद्धतीने एकजुटीने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी सरकार सोबत असावे. आज पाणंद रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे, ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
श्री. थोरात यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. सुरुवातीला स्वर्णजयंती कार्यक्रमांमध्ये पाणंद रस्त्याचा कार्यक्रम समावेश केला होता. पाणंद रस्त्याचा हा विषय तहसीलदाराच्या स्तरावर मिटवू शकतो. परंतु त्यामध्ये असंख्य अडचणी येतात. पाणंद रस्त्याचा विषय मार्गी लागण्यासाठी ही एक चळवळ व्हावी. सर्वांच्या सहमती, सामंजस्याने वाद सुटावेत. यात श्रमदानाचाही उपयोग करून घेता येईल. शासनाने याकामी जागा मोजण्याची मदत केल्यास पाणंद रस्ते गतीने पूर्ण होण्यास मदत होईल. केंद्र आणि राज्याच्या रोजगार हमी योजनेमधून मोठ्या प्रमाणावर कामे झाल्यास याला शेतकऱ्यांचाही पाठिंबा मिळेल.
श्रीमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यात पानंद रस्त्याचा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. पांदण रस्ते हे शेतकऱ्यांचा कणा आहेत, ही बाब ओळखून जिल्हा नियोजन आणि इतर योजनामधून सोळाशे किलोमीटरचे पांदण रस्ते यावर्षी हाती घेतले आहे. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन मातोश्री पांदण योजना राबविल्यास शेतकऱ्यांच्या मदतीला हे सरकार धावून आले आहे, अशी शेतकऱ्यांमध्ये धारणा होईल. या रस्त्यांचे खडीकरण आणि डांबरीकरण व्हावे, यासाठी राज्य शासनाने पाठबळ द्यावे, अशी मागणी केली.
श्री. भुमरे यांनी रोजगार हमी योजनेतून ही कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतल्यास पांदण रस्त्यासोबतच पक्के रस्ते होण्यास मदत मिळेल. राज्य शासनाने मातोश्री पांदण योजना हाती घेऊन यास भरीव निधी दिल्यास हा विषय राज्यस्तरावर मार्ग निघू शकेल, असा विश्वास व्यक्त केला.
प्रास्ताविकातून श्री. कडू यांनी विविध स्तरावरील पाठपुरावा यातून बळीराजा पांदण विकास अभियान मार्गी लागले आहे. एक किलोमीटरच्या रस्त्याची किंमत आठ लाखांपर्यंत कमी करण्यात आली आहे. या कामासाठी स्थानिक निधीमधून तसेच उपलब्ध गौण खनिज यामधून रस्ते पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वांची मदत घेऊन दोन तालुक्‍यातील सुमारे 600 किलोमीटरचे रस्ते 25 मे पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रस्त्यांचे मजबुतीकरण केल्यास शेतकऱ्यांचा पाठिंबा राहील. पांदण रस्त्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी तातडीने दिल्यामुळे राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.
उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी सूत्रसंचालन केले. रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी आभार मानले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
00000

सोमवार, १२ एप्रिल, २०२१

विभागीय लोकशाही दिन नागरिकांनी तक्रारी पोस्टाव्दारे पाठवाव्या

 

विभागीय लोकशाही दिन

नागरिकांनी तक्रारी पोस्टाव्दारे पाठवाव्या

              अमरावती दि. 12 : दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 12 एप्रिल रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे लोकशाही दिनाचे आयोजन रद्द करण्यात आले.

            सामान्य नागरीकांनी त्यांच्या समस्या, विभागीय लोकशाही दिनामधील तक्रारी पोस्टाद्वारे तसेच dcgamravati@gmail.com/dcg_amravati@rediffmail.com  या ई-मेलद्वारे पाठवाव्या, असे संजय पवार, उपआयुक्त (सा.प्र), अमरावती यांनी कळविले आहे.

00000

 

 

जिल्ह्यासाठी 4600 कोटींचा पतपुरवठा आराखडा

 


जिल्ह्यासाठी 4600 कोटींचा पतपुरवठा आराखडा

Ø  गृहबांधणी, लघू उद्योगांसाठी भरीव तरतूद

Ø  पिक कर्जासाठी 1500 कोटींचा आराखडा

अमरावती, दि. 12 : अमरावती जिल्ह्याचा सन 2021-22 या वर्षासाठीचा पतपुरवठा आराखडा आज जाहिर करण्यात आला. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील कृषी, मध्यम-लघू उद्योग, शिक्षण, गृह आदी महत्वाच्या क्षेत्रासाठी 4600 कोटींचा पतपुरवठा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या पतपुरवठा आराखड्याचे धोरण जाहिर करण्यात आले. यावेळी जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक एल. के. झा आदी उपस्थित होते.

या 4600 कोटी रूपयांच्या पतपुरवठा आराखड्यात पिक कर्जासाठी 1500 कोटी, कृषी क्षेत्रासाठी 800 कोटी, मध्यम व लघू उद्योग क्षेत्रासाठी 1100 कोटी, शैक्षणिक कर्जासाठी 80 कोटी, गृह बांधणीसाठी 520 कोटी, तर इतर प्राधान्य क्षेत्रासाठी 600 कोटी रूपयांचा पतपुरवठा करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. याव्यतिरिक्त 400 कोटी रूपयांचा पतपुरवठा बिगर प्राधान्य क्षेत्रासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे.

जिल्ह्यात प्राधान्य क्षेत्रातील पिक कर्जासाठी सुमारे दोन लाख खातेदार असणार आहे. यात खरीपसाठी एक लाख 64 हजार 950 तर रब्बीसाठी 35 हजार 50 खातेदार आहेत. पिककर्जासाठी प्रस्तावित असणाऱ्या 1500 कोटीमधून 1200 कोटी खरीप तर 300 कोटी रब्बीसाठी प्रस्तावित आहे. कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रांसाठीचे 2 लाख 58 हजार 630 खातेदार असून यासाठी 2300 कोटींचा पतपुरवठा करण्यात येणार आहे. लघू उद्योगांसाठी 11 हजारर 524 खाते, शैक्षणिकसाठी 2 हजार 971 खाते, गृह बांधणीसाठी 6 हजार 440 खाते, इतर प्राधान्य क्षेत्रासाठी 252 हजार 932 खातेदार आहेत. तसेच बिगर प्राधान्य क्षेत्रांची 19 हजार 660 खातेदार आहेत.

00000