सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2021 योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा/श्रेणी सुधार योजनेअंतर्गत गुणपत्रिका बदलवून देण्याच्या कालावधीला 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत

रब्बी हंगाम 2021 योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

 

अमरावती, दि. 17 : विभागात बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम वर्ष 2021-22 हंगामापासून तीन वर्षाकरीता राबविण्याबाबत येत आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बॅकेकडे विमा हप्त्यासह प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत रब्बी हंगाम 2021 मधील रब्बी ज्वारीकरीता 30 नोव्हेंबर असून गहू बागायत, हरभरा व रब्बी कांदा पिके याकरिता 15 डिसेंबर 2021 आहे. या खरीप हंगामात गहु बागायत, हरभरा, रब्बी कांदा या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

 नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, शेतकऱ्यांना नाविण्यपुर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबधित राखणे, कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे हा योजनेचा उद्देश आहे.

या योजने अंतर्गत सन 2021-22 साठी जिल्हास्तरीय पिक कर्ज दर समितीने निश्चित केलेल्या पिक कर्ज दराप्रमाणे रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. खरीप हंगाम 2021 मध्ये योजना पूढील विमा कंपनीकडून संबंधित जिल्हा समुहामध्ये राबविण्यात येईल. वाशिम, बुलडाणा जिल्ह्याकरीता रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि. वेस्टेर्न एक्सप्रेस हायवे, 5 वा मजला, चिंतामणी अव्हेन्यू, विरानी औद्योगिक वसाहती जवळ, गोरेगाव (इ)मुंबई -400063 दुरध्वनी क्र.022-68623005, ई-मेल rgcl.pmfby@relinceda.com टोल फ्री क्र. 18001024088.

यवतमाळ, अमरावती जिल्ह्याकरीता इफ्फो टोकिओ जनरल इन्शुरन्स कं. लि. 10 वा मजला, सुनीत कॅपीटल सोसायटी, सेनापती बापट रस्ता, शिवाजी नगर पुणे – 411016 , ई-मेल supprtagri@iffcotokio.co.in टोल फ्री क्र. 18001035490, अकोला जिल्हाकरीता एचडीएफसी इर्गो इंन्शुरन्स कं. लि. डी-103 तीसरा मजला ईर्स्टन बिझनेस डिस्ट्रिक एल. एस. बी. मार्ग भांडूप (पश्चिम) मुंबई -400078, दुरध्वनी क्र.912266383600 ई – मेल pmfby.maharashtra@hdfcergo.com , टोल फ्री क्र.18002660700 हा आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारचे व्यतिरिक्त कुळांने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. योजने अंतर्गत रब्बी हंगाम सन 2020-21 ते 2022-23 या तीन वर्षाकरीता जोखिमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत जोखमीची व्याप्ती वाढविण्यात आली असून त्यामध्ये पूढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे. पिक पेरणीपासून काढणीपर्यतच्या कालावधीत नैसर्गिक आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड, व रोग इत्यादी बाबीमुळे पिकांच्या उत्पन्नास येणारी घट,  हवामान घटकांच्या व  पिकांच्या हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान. या योजनेअंतर्गत पिक कापणी प्रयोगाद्वारे मिळणारे उत्पन्नाचे अंदाज हे अचूक व दिलेल्या काल मर्यादेमध्ये प्राप्त करण्याकरिता उपग्रहाद्वारे प्राप्त प्रतिमाच्या साहाय्याने पिक कापणी प्रयोग आयोजित करणे तसे पिकांच्या उत्पन्नाच्या अंदाजासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करणेबाबत केंद्र शासनाने सूचित केले आहे.

या वर्षीच्या रब्बी हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासंबंधिच्या अधिक माहितीकरीता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा असे विभागीय कृषी सहसंचालक यांनी कळविले आहे.

 

000000

 

वृत्त क्र. 147                                                               दिनांक: 17 नोव्हेंबर 2021

 

                           श्रेणी सुधार योजनेअंतर्गत

        गुणपत्रिका बदलवून देण्याच्या कालावधीला 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

 

अमरावती, दि. 17 :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी श्रेणी सुधार योजनेतंर्गत प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांनी विकल्प सादर करुन सुधारित गुणपत्रिकेची मागणी केल्यास सुधारित गुणपत्रिका बदलून देण्याचा कालावधी एक महिन्याऐवजी सहा महिन्यापर्यत वाढविण्यात आलेला होता. परंतू फेब्रवारी, मार्च 2020 व नोव्हेंबर ,डिसेबर 2020 परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत प्रविष्ठ झालेल्या व विकल्प सादर करु न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी 15 डिसेंबर 2021 पर्यत मुदत वाढ देण्यात येत आहे.

तसेच फेब्रवारी, मार्च 2020 व नोव्हेंबर डिसेंबर 2020 परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत प्रविष्ठ झालेले विद्यार्थ्यी, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयांशी व विभागीय मंडळाशी संपर्क साधून याबाबत कार्यवाही करावी.असे विभागीय मंडळाचे सचिव यांनी कळविले आहे.

00000000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा