समाज कल्याण विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी
वसतिगृहामध्ये प्रवेश देणे सुरु
विद्यार्थ्यांनी
26 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावे
अमरावती, दि. 12 : अमरावती विभागातील समाज कल्याण विभागाच्या मागासवर्गीय
विद्याथ्यांकरीता विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील
मागासवर्गीय विद्यार्थी व विद्यार्थीनीच्या पुढील शैक्षणिक सत्रा करीता वसतिगृह
प्रवेशाची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी दिनांक २२ नोव्हेंबर
२०२१ पर्यंत आपल्या जिल्ह्यातील संबंधित मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय
वसतिगृहातुन अर्ज प्राप्त करावे.
सन २०१९-२० व सन
२०२०-२१ या शैक्षणिक सत्रातील या दोनही शैक्षणिक वर्षाचे प्रवेश विद्यार्थ्यांना एकत्रीतरित्या
या वर्षा समाज कल्याण विभागामार्फत वसतीगृहाकरीता देण्यात येणार आहेत.
अमरावती जिल्हयातील
सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व
विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता १० वी व ११ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तसेच वरिष्ठ
महाविद्यालयातील इतर शैक्षणिक/व्यावसायीक अभ्यासक्रमातील प्रथम व व्दितीय
वर्षाच्या प्रवेशीत विद्यार्थ्यांना या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल. कनिष्ठ
व वरिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशाकरीता अमरावती विभागीय स्तरावरील निंभोरा येथील 1००० मुलांची क्षमता
असलेल्या वसतिगृहात युनिट क्र. १,२ व ३ गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह
तसेच संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह व मुलींसाठी गुणवंत मागासवर्गीय
मुलींचे शासकीय वसतिगृह, कॅम्प, अमरावती गुणवंत मागासवर्गीय मुलींचे शासकीय
वसतिगृह (जेल रोड अमरावती) तसेच विभागीय स्तरावरील २५० मुलींचे युनिट क्र. ४ व मागासवर्गीय
मुलीचे शासकीय वसतिगृह (नविन) किशोर नगर येथे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याचप्रमाणे
तालुका स्तरावर मला/मुलींचे शासकीय वसतिगृह येथे इयत्ता ८ वी पासून ते पुढील
अभ्यासक्रमांकरिता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे.
विद्यार्थ्यांना ज्या
वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल तेथुन दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज
प्राप्त करून इच्छुक विद्यार्थ्यांनी ११ वी व १२ वी तसेच प्रथम व द्वितीय वर्षा
करिता आपले अर्ज २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित
गृहप्रमुख/गृहपाल यांच्याकडे सादर करावेत. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे
प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे यांनी केले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा