बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना शेतावर प्रशिक्षण

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत

शेतकऱ्यांना शेतावर प्रशिक्षण

अमरावती दि. 24:- कृषी उपविभागांतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष शेतावरील प्रशिक्षण प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम उपविभागांतर्गत अचलपूर, अंजनगाव, दर्यापूर, चिखलदरा, धारणी  या पाच तालुक्यातून प्रत्येकी 12 शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणातंर्गत फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, आंबा, पेरु सधन लागवड, फळबाग व्यवस्थापन, काटेकोर शेती व्यवस्थापन, कांदाचाळ, संरक्षित शेती, एकात्मिक कीड, रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन, काढणी पश्चात व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, काजू प्रक्रिया, बेदाणा प्रक्रिया, सीताफळ, आवळा, डाळींब प्रक्रिया इत्यादी शितसाखळी, रायपनिंग इ., बाजारपेठ, निर्यात, कृषिपर्यटक इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात येईल,    

या प्रशिक्षणासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी राहूल एस. सातपुते यांनी  केले आहे.

000000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा