बिरसा मुंडा यांच्या
जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन
अमरावती,
दि. 15 :
आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी विभागीय आयुक्त
कार्यालयातील सभागृहात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात
आले. तहसिलदार वैशाली पाथरे, नाझर पेठे, नायब तहसिलदार धुळे, अतुल बुटे यांनी
बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हारार्पण करून आदरांजली वाहीली. यावेळी विभागीय
आयुक्त कार्यालयातील कर्मचारी, आदी उपस्थित होते.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा