गुरुवार, ७ जुलै, २०२२

रोजगार भरती मेळावा 11 रोजी

 

रोजगार भरती मेळावा 11 रोजी

 

अमरावती दि.7 (विमाका): आयटीआय उत्तिर्ण विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तसेच मुलभुत तथा अनुषांगिक सुचना केंद्र, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने संस्थेच्या एन.एन.एस.सभागृहात दि. 11 जुलै 2022 रोजी सकाळी 9 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

            रोजगार मेळाव्यात औरंगाबाद, पुणे व अमरावती येथील नामांकित कंपन्यांचे प्रितिनिधी उपस्थित राहणार आहेत, नमुद व्यवसायातील आयटीआय उत्तीर्ण व परिक्षेला बसलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना व सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी आवश्यक मुळ कागदपत्रे व बायोडाटासह उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या अंशकालीन प्राचार्या सौ. एम. डी. देशमुख यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा