हातमाग विणकरांसाठी कौशल्य विकासाची योजना
अमरावती दि. 1
(विमाका) - केंद्र शासनामार्फत समर्थ योजनेअंतर्गत
दिलेल्या निर्देशाप्रमाणे हातमाग विणकर, वस्त्रोद्योग क्षेत्रातील हातमाग हस्तकला
व ज्युटपासुन वस्तु, वस्त्र निर्मिती करणे याबाबत कौशल्य विकास करण्याकरीता योजना
राबविण्यात येत आहे. या योजनेबाबतचे सर्व तपशिल व दिशा निर्देश Samarth-textiles.gov.in
या वेब साईटवर उपलब्ध आहेत.
या योजनेअंतर्गत समर्थ
प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्था/अशासकीय
संस्था/ट्रस्ट/कंपनी/इतर सेवाभावी संस्था व वस्त्रोद्योग विभागातील संस्था पात्र
असल्यास प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग विभागातील संस्था पात्र असल्यास
प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर नवीन प्रशासकीय इमारत क्र. 2, बी विंग, 8
वा मजला सिव्हील लाईन्स, नागपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे प्रादेशिक
उपायुक्त, वस्त्रोद्योग श्रीमती सीमा पांडे यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा