आकांक्षा
कौशल्य विकास प्रकल्पातंर्गत
महिलांसाठी
रोजगाराविषयक प्रशिक्षण
प्रवेश
परिक्षेसाठी नोंदणी करावी
अमरावती दि. 5
(विमाका) अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम येथील
रहिवासी महिलांना रोजगाराच्या माध्यमातुन आर्थिक सक्षमता निर्माण करण्यासाठी कौशल्य
प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आकांक्षा (कौशल्यातून
जिवनोन्नतीकडे) या कौशल्य विकास प्रकल्पातंर्गत “ॲडव्हांस डिप्लोमा इन सॉफ्टवेअर पा्रग्रामिंग” या कोर्सचे प्रशिक्षणाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख
विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात
संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकासावर भर देण्यात येणार असून प्रशिक्षित व तज्ञ
प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रवेश
परिक्षेसाठी नोंदणी 5 जुलै 2022 पासून सुरु होणार असून त्यामध्ये प्रशिक्षण
प्रवेशाकरिता ऑनलाईन, ऑफलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परिक्षा दि. 10 ते
23 जुलै 2022 या कालावधीत व ऑफलाईन परिक्षा दि. 24 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
प्रवेश परिक्षेमध्ये चाळणी परिक्षा, इंग्रजी, सामान्य गणित व मुलाखत आदी घटकांचा
समावेश असणार आहे.
नामांकित
कंपनी, स्टार्टअप मध्ये रोजगाराची संधी प्रशिक्षणार्थी महिलांना उपलब्ध करुन
देण्यात येणार असुन हे प्रशिक्षण महिलांकरिता निशुल्क व निवासी स्वरुपाचे आहे.
प्रशिक्षणाचा कालावधी 18 महिने पर्यत असणार आहे. प्रशिक्षणात प्रवेश घेण्यासाठी
महिलांचे वय 17 ते 28 वर्षे असावे व किमान शैक्षणिक पात्रता बरावी पास (विज्ञान,
कला, वाणिज्य) आयटी आय पास असणे आवश्यक आहे.
प्रवेशासाठी
महिलांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या अमरावती
येथील 9405102600,07212-566066, बुलडाणा-9757086603, 07262-242342, अकोला-8275369800,
07242-433849, यवतमाळ-837998798, 07232-244395, वाशिम-9096855798, 07252-231494 या
कायालयाशी संपर्क साधावा असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र कार्यालयाकडुन कळविण्यात आले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा