मंगळवार, २६ जुलै, २०२२

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

 

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

अमरावती, दि. 26 (विमाका) : जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार घडलेला गुन्हा आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आज आढावा घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.

            जुन महिन्यात शहरी ग्रामीण भागात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची 14 प्रकरणे घडली. जानेवारी ते जुन अखेर शहरी हद्दीत 17 तर ग्रामीण हद्दीत 24 अशी 41 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. अशी माहिती समाज कल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी दिली. अर्थसहायचा प्रलंबित निधी प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. जानेवारी 2022 ते 30 जुनअखेरपर्यंतची एकूण 29 प्रकरणांचा पोलिस तपास करीत आहेत. याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी दिले.

या बैठकीला समाज कल्याण निरिक्षक सुरेश ‍कोंडे, ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाचे तपन कोल्हे, पोलिस उपअधीक्षक कार्यालयाचे प्रशांत राजे, अशासकीय सदस्य राजेंद्र महल्ले, दिलीप काळबांडे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा