प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी
३१ जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करावे
अमरावती दि.25 (विमाका) : सन 2022-23 मध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री
पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दि.31 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर
करावे.
शासनाच्या
ई- पिक मध्ये पिक पेऱ्याची नोंद 1 ऑगस्ट 2022 पासून करण्यात येत आहे. पिक विमा
योजनेत भाग घेत असतांना काही वेळेस विमा काढलेले पिक व प्रत्यक्ष शेतात असलेले पिक
यामध्ये तफावत आढळुन शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहु नये यासाठी
शेतकऱ्यांने पिक पाहणीमध्ये केलेली नोंद ही अंतीम गृहीत धरण्यात येईल. असा निर्णय
शासनाकडुन घेण्यात आला आहे. त्यामुळे पिक विमा योजनेत सहभाग घेतांना ई- पिक
पाहणीमध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही. शेतकरी पिक विमा
बाबत स्वयंघोषणा पत्राद्वारे पिक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो. मात्र दि. 1 ऑगस्ट
2022 नंतर त्यांनी ई-पिक पाहणीमध्ये आपल्या पिकांची नोंद करावी, असे आवाहन विभागीय
कृषि सहसंचालक के. एस मुळे यांनी केले
आहे.
0000000
वृत्तक्र. 192 दिनांक: 25 जुलै, 2022
परीक्षा
केंद्रासाठी मागणी प्रस्ताव
३१
ऑगस्ट पर्यंत सादर करावे
अमरावती दि.25
(विमाका) : इयत्ता दहावी व बारावीच्या शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या
परिक्षेसाठी नविन परीक्षा केंद्राचे मागणी प्रस्ताव दि. 1 ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत अर्ज विक्री व भरलेले अर्ज स्विकृत
करण्यात येणार आहे. नविन प्रस्ताव अर्जाची किंमत एक हजार रुपये असुन, दि. 31 ऑगस्ट 2021 नंतर नविन परीक्षा
केंद्रासाठी मागणी अर्ज स्विकारल्या जाणार नाही. असे अमरावती विभागीय मंडळाचे सचिव
उल्हास नरड यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा