मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२

कृषी मंत्र्यांचा साद्राबाडी येथे आज शेतकऱ्याच्या घरी मुक्काम, प्रत्यक्ष शेतात जाऊन करणार शेतकऱ्यांशी चर्चा

 

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’चा होणार मेळघाटात शुभारंभ

कृषी मंत्र्यांचा साद्राबाडी येथे आज शेतकऱ्याच्या घरी मुक्काम

Ø 


प्रत्यक्ष शेतात जाऊन करणार शेतकऱ्यांशी चर्चा

अमरावती, दि. 30 : शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणे, प्रत्येक अडचणी समजून घेणे यासाठी  कृषी विभागातर्फे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम दि. 1 सप्टेंबरपासून दि. 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यात राबविण्यात येत आहे. त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळघाटातील धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे गुरुवारी सकाळी 9 वाजता होईल. 

उपक्रमात श्री. सत्तार यांचे बुधवार दि. 31 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता साद्राबाडी येथे आगमन होईल. यावेळी मंत्री महोदय हे साद्राबाडी येथील शेतकरी दत्तात्रय चुनीलाल पटेल यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. त्यानंतर साद्राबाडी येथे दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता माझ्या एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमात मंत्री श्री. सत्तार हे श्री. पटेल यांच्या शेतावर उपस्थित राहून शेतीविषयक समस्या, अडचणी, प्रश्न जाणून घेतील. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता धारणी येथील पंचायत समिती समोरील परिसरात 10 हजार शेतकरी उत्पादक केंद्र स्थापन करण्याच्या योजनेचा, तसेच ताप्तीपुत्र जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनी कार्यालयाचे शुभारंभ होईल. त्यानंतर त्यांचे सायंकाळी 7 वाजता धारणी येथून सिल्लोड जिल्हा औरंगाबादकडे प्रयाण होईल.  

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्यांमुळे निर्माण होणारा ताणतणाव, नैराश्य, शेतकरी आत्महत्या याची कारणमीमांसा करुन सुलभ व प्रभावी कृषी धोरण तयार करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. 

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमात प्रधान सचिव, कृषी आयुक्त, कृषी विद्यापीठाचे कुलगुरु, शास्त्रज्ञ, विभागीय आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक व इतर उपविभागीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी भेट देण्याच्या सूचना आहेत. त्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून तीन दिवस तसेच महसूल, ग्रामविकास व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस भेट द्यावी अशी सूचना करण्यात आली आहे.

या उपक्रमांत सन्माननीय लोकप्रतिनीधी देखील सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास शेतकरी बंधूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे यांनी केले आहे. 

00000

 

विभागात आजपर्यत 677.5 पावसाची नोंद

 

विभागात आजपर्यत 677.5 पावसाची नोंद

 

अमरावती, दि. 30 (विमाका) : अमरावती विभागातील काही तालुक्यांत तुरळक पावसाची नोंद करण्यात आली.

विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत अमरावती विभागात सरासरी 7.8 मिमी पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 677.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

              विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बारा वाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)

 

अमरावती जिल्हा : धारणी 9.6 (692.9), चिखलदरा 3.4 (1096.9), अमरावती 5.7 (598.0), भातकूली 5.7 (471.6), नांदगाव खडेश्वर 7.1 (705.5), चांदूर रेल्वे 16.6 (629.5), तिवसा 12.3 (821.2),  मोर्शी 10.8 (721.9) वरुड 15.9 (979.6), दर्यापूर 4.7 (463.5), अंजनगाव 11.5 (541.6), अचलपूर 23.6 (579.4), चांदूरबाजार 4.8 (774.0), धामणगाव रेल्वे 2.7 (815.0) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 9.3 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 693.2 मि.मि. पाऊस झाला.

 

अकोला जिल्हा :- अकोट 2.0 (407.2), तेल्हारा 2.6 (519.9), बाळापूर 8.8 (599.4), पातूर 1.1 (527.2),  अकोला 6.4 (562.8), बार्शी टाकळी 1.2 (510.2), मुर्तीजापूर 1.2 (468.1), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 3.7 मि.मि. तर आजवर 514.7 मि.मि पाऊस झाला आहे.

 

बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 1.9 (376.1), संग्रामपूर 3.6 (489.1), चिखली 0.1 (526.3), बुलडाणा 0.1 (646.2), देऊळगाव राजा 3.9 (515.3), मेहकर 0.8 (586.3), सिंदखेड राजा 11.8 (593.6), लोणार 1.4 (492.0), खामगाव 4.6 (428.6), शेगाव 3.4 (483.2), मलकापूर 8.9 (389.5), मोताळा 0.1 (412.7), नांदूरा 3.0 (431.1), जिल्ह्यात दिवसभरात 3.1 तर यंदाच्या हंगामात आजवर 497.4 मि.मि. पाऊस झाला.

 

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 5.1 (817.0), बाभूळगाव 4.3 (836.4), कळंब 16.6 (919.0), दारव्हा 2.6 (656.8), दिग्रस 20.8 (838.7), आर्णी 28.5 (1059.0), नेर 3.4 (719.7), पुसद 3.7 (633.2), उमरखेड 3.6 (749.0), महागाव 15.6 (844.3), वणी 6.9 (1078.5), मारेगाव 26.2 (1068.1), झरीजामणी 6.5 (1017.4), केळापूर 26.7 (1022.0), घाटंजी 33.4 (922.7), राळेगाव 31.9 (1068.2), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 13.9 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 880.9 मि.मि पाऊस झालाआहे.

 

वाशिम जिल्हा : - वाशिम 9.0 (716.7), रिसोड 1.3 (667.1), मालेगाव 1.9 (758.5), मंगरुळपिर 2.5 (750.9), मानोरा 6.2 (787.7), कारंजा 3.0 (535.4),  जिल्ह्यात 24 तासात 4.0 तर 1 जूनपासून आजवर 698.3  मि.मि. पाऊस झाला.

000000

 

सोमवार, २९ ऑगस्ट, २०२२

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

                 विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.30 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 30 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (342.17), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.28), बेंबळा (266.80), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.53), वान (407.12), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (291.38), पेनटाकळी (557.25), खडकपूर्णा (520.23).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (447.45), चंद्रभागा (504.80), पूर्णा (450.15), सपन (510.70), पंढरी (426.70), गर्गा (344.40), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (305.11), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (391.40), मोर्णा (366.97), उमा (344.00), घुंगशीबॅरेज (254.10), वाशिम जिल्ह्यातील अडाण (381.07), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (403.00), पलढग (403.20), मस (324.50), कोराडी (545.25), मन (374.00), तोरणा (405.40), उतावळी (370.50) आहे.   

000000

 

मेळघाटात आरोग्य सुविधांबरोबरच जनजागृतीही करा -खासदार डॉ. अनिल बोंडे

 






मेळघाटात आरोग्य सुविधांबरोबरच जनजागृतीही करा

-खासदार डॉ. अनिल बोंडे

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची आढावा बैठक

अमरावती, दि.29 :  क्षयरोग तसेच इतर आजारांबाबत जनजागृतीसाठी मेळघाटात सर्वदुर शिबीरांचे आयोजन करावे. क्षयरोगाची तपासणी करतांना रुग्णांकडुन घेतलेले नमुने अचूकपणे तपासता यावे यासाठी आवश्यक यंत्रांची संख्या वाढवावी. खाजगी रुग्णालयांत क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांची व त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक करावे, अशा सुचना खासदार अनिल बोंडे यांनी यावेळी केल्या.  

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा आढावा खासदार डॉ. बोंडे यांनी घेतला. बैठकिला माजी आमदार रमेश बुंदिले, माजी महापालिका सभापती तुषार भारतीय,  जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे,  डॉ. कैलास घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप रणमले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड, बालविकास प्रकल्प अधिकारी मंगल पांचाळ, निवेदिता दिघडे चौधरी आदी उपस्थित होते.

दर्यापूर, धारणी, अचलपूर, चिखलदरा, तिवसा, मोर्शी, वरुड व चुरणी या सर्व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात क्षयरोग रुग्णांची तपासणी व निदान करणारी यंत्रे चालू आहेत किंवा कसे याची माहिती तात्काळ सादर करावी. मेळघाटातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव तात्काळ सादर करुन त्याबाबत पाठपुरावा करावा. जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे ग्रामीण रुग्णालये व आरोग्य केंद्रांनी ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम प्राधान्याने करावे. अशा सुचना श्री. बोंडे यांनी यावेळी दिल्या.

मेळघाटात प्रामुख्याने बालके, महिला व सामांन्यांमध्ये आढळणाऱ्या सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करण्यात यावी. या आजाराचे प्रमाण शोधून काढणे, चाचणी व उपचार करण्याबाबत जनजागृती करण्यात यावी. सिकलसेलचे निदान करणारी किट जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समिती किंवा आदीवासी उपयोजनेतुन निधी प्रस्तावित करण्याच्या सुचना डॉ. बोंडे यांनी दिल्या.

दृष्टीदोष असलेल्या बालकांना मोठ्या भिंगाचे चष्मे दिल्यास त्यांच्यात न्युनगंड निर्माण होऊ शकतो. त्यांच्यातील दृष्टीदोषावर आधुनिक शस्त्रक्रिया करता यावी याकरीता स्थानिक नेत्रतंज्ज्ञाचे सहकार्य घ्यावे. चिखलदरा, मेळघाट भागात सध्या त्वचेचे आजार उद्भवले असुन त्यावर उपचार होणे गरजेचे आहे असे सांगुन आशा सेविकांनी येणारे पंधरा दिवस मोहिम स्वरुपात राबवुन याबाबत सर्वेक्षण करावे, असे सांगितले.

महिला व बालविकास विभागाचा आढावा घेतांना श्री बोंडे म्हणाले, येणाऱ्या सप्टेंबरमध्ये जिल्हाभर पोषणमाह राबविण्याबाबत प्रभावी नियोजन करावे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातुन ग्रामीण भागात पोषण आहाराबाबत सर्व स्तरावर जनजागृती करण्‍याचे नियोजन करावे. सर्व विभागांनी  समाजमाध्यमांवरील आपली खाती अद्ययावत करावी. सर्वसामान्यांना माहिती मिळावी, त्यांच्यात आरोग्यविषयी जनजागृती व्हावी यासाठी या माध्यमांचा वापर करण्याच्या सुचना त्यांनी केल्या.

स्वच्छ भारत मिशनचा आढावा घेतांना ते म्हणाले, गावात वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात यावी. बचतगटांना मानधन तत्वावर ती स्वच्छतागृहे देखरेखीसाठी सोपविण्यात यावी. या स्वच्छता गृहाच्या निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना श्री बोंडे यांनी केल्या.

00000

विभागात आजपर्यत 669.6 पावसाची नोंद

 

 विभागात आजपर्यत 669.6 पावसाची नोंद

 

अमरावती, दि. 29 (विमाका) : अमरावती विभागातील काही तालुक्यांत तुरळक पावसाची नोंद करण्यात आली.

विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत अमरावती विभागात सरासरी 0.1 मिमी पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 669.6 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

              विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बारा वाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)

 

अमरावती जिल्हा : धारणी 0.0 (683.3), चिखलदरा 0.0 (1093.5), अमरावती 0.0 (592.3), भातकूली 0.0 (465.9), नांदगाव खडेश्वर 0.0 (698.4), चांदूर रेल्वे 0.0 (612.9), तिवसा 0.0 (808.5),  मोर्शी 0.0 (711.1) वरुड 0.0 (963.7), दर्यापूर 0.0 (458.8), अंजनगाव 0.0 (530.1), अचलपूर 0.0 (555.8), चांदूरबाजार 0.0 (769.2), धामणगाव रेल्वे 0.0 (812.4) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 0.0 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 683.9 मि.मि. पाऊस झाला.

 

अकोला जिल्हा :- अकोट 0.0 (405.2), तेल्हारा 0.0 (517.3), बाळापूर 0.6 (590.6), पातूर 0.0 (526.1),  अकोला 0.0 (556.4), बार्शी टाकळी 0.0 (509.0), मुर्तीजापूर 0.0 (466.9), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 0.1 मि.मि. तर आजवर 511.0 मि.मि पाऊस झाला आहे.

 

बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 0.0 (374.2), संग्रामपूर 0.0 (485.5), चिखली 0.0 (526.2), बुलडाणा 0.0 (646.1), देऊळगाव राजा 0.0 (511.4), मेहकर 0.0 (585.5), सिंदखेड राजा 0.0 (581.8), लोणार 0.0 (490.6), खामगाव 0.0 (424.0), शेगाव 0.0 (479.8), मलकापूर 0.0 (379.9), मोताळा 0.1 (412.6), नांदूरा 0.0 (428.1), जिल्ह्यात दिवसभरात 0.0 तर यंदाच्या हंगामात आजवर 494.3 मि.मि. पाऊस झाला.

 

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 0.0 (812.0), बाभूळगाव 0.0 (832.1), कळंब 2.4 (902.3), दारव्हा 0.0 (654.1), दिग्रस 0.0 (817.9), आर्णी 0.0 (1030.7), नेर 0.0 (716.3), पुसद 2.2 (629.5), उमरखेड 0.0 (745.4), महागाव 0.1 (828.7), वणी 0.0 (1071.6), मारेगाव 0.0 (1041.9), झरीजामणी 0.0 (1010.9), केळापूर 0.0 (995.3), घाटंजी 0.0 (889.2), राळेगाव 0.1 (1036.3), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 0.3 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 867.0 मि.मि पाऊस झालाआहे.

 

वाशिम जिल्हा : - वाशिम 0.0 (707.7), रिसोड 0.0 (665.8), मालेगाव 0.0 (756.6), मंगरुळपिर 0.0 (748.4), मानोरा 0.0 (781.5), कारंजा 0.0 (532.4), जिल्ह्यात 24 तासात 0.0 तर 1 जूनपासून आजवर 694.3     मि.मि. पाऊस झाला.

000000

 

रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

               विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.29 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (342.05), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.24), बेंबळा (266.75), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.50), वान (407.00), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (291.38), पेनटाकळी (557.25), खडकपूर्णा (520.21).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (447.44), चंद्रभागा (504.65), पूर्णा (450.32), सपन (510.60), पंढरी (426.70), गर्गा (344.40), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (305.10), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (391.40), मोर्णा (366.97), उमा (344.00), घुंगशीबॅरेज (253.90), वाशिम जिल्ह्यातील अडाण (381.05), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (403.00), पलढग (403.20), मस (324.50), कोराडी (545.25), मन (374.00), तोरणा (405.40), उतावळी (370.50) आहे.   

000000

 

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

विभागात आजपर्यत 668.3 पावसाची नोंद

 

विभागात आजपर्यत 668.3 पावसाची नोंद

 

अमरावती, दि. 26 (विमाका) : अमरावती विभागातील काही तालुक्यांत तुरळक पावसाची नोंद करण्यात आली.

विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत अमरावती विभागात सरासरी 0.0 मिमी पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 668.3 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

              विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बारा वाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)

 

अमरावती जिल्हा : धारणी 0.0 (683.3), चिखलदरा 0.0 (1088.7), अमरावती 0.0 (591.4), भातकूली 0.0 (465.7), नांदगाव खडेश्वर 0.0 (690.5), चांदूर रेल्वे 0.0 (597.2), तिवसा 0.0 (801.3),  मोर्शी 0.0 (708.8) वरुड 0.0 (961.3), दर्यापूर 0.0 (458.8), अंजनगाव 0.0 (530.1), अचलपूर 0.0 (555.8), चांदूरबाजार 0.0 (766.2), धामणगाव रेल्वे 0.0 (807.6) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 0.0 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 680.6 मि.मि. पाऊस झाला.

 

अकोला जिल्हा :- अकोट 0.0 (405.2), तेल्हारा 0.0 (517.3), बाळापूर 0.6 (590.1), पातूर 0.0 (526.1),  अकोला 0.0 (556.3), बार्शी टाकळी 0.0 (509.0), मुर्तीजापूर 0.0 (466.9), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 0.1 मि.मि. तर आजवर 510.9 मि.मि पाऊस झाला आहे.

 

बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 0.0 (374.3), संग्रामपूर 0.0 (485.5), चिखली 0.0 (526.0), बुलडाणा 0.0 (646.1), देऊळगाव राजा 0.0 (511.1), मेहकर 0.0 (585.5), सिंदखेड राजा 0.0 (581.8), लोणार 0.0 (490.6), खामगाव 0.0 (423.9), शेगाव 0.0 (479.7), मलकापूर 0.0 (380.2), मोताळा 0.0 (413.0), नांदूरा 0.0 (426.9), जिल्ह्यात दिवसभरात 0.0 तर यंदाच्या हंगामात आजवर 494.3 मि.मि. पाऊस झाला.

 

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 0.0 (808.6), बाभूळगाव 0.0 (829.9), कळंब 0.0 (899.5), दारव्हा 0.0 (654.0), दिग्रस 0.0 (817.8), आर्णी 0.0 (1030.4), नेर 0.0 (698.6), पुसद 0.0 (627.8), उमरखेड 0.0 (745.3), महागाव 0.0 (828.5), वणी 0.0 (1071.2), मारेगाव 0.0 (1041.9), झरीजामणी 0.0 (1010.7), केळापूर 0.0 (994.5), घाटंजी 0.0 (889.1), राळेगाव 0.0 (1036.2), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 0.0 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 865.1 मि.मि पाऊस झालाआहे.

 

वाशिम जिल्हा : - वाशिम 0.0 (707.4), रिसोड 0.0 (665.6), मालेगाव 0.0 (756.6), मंगरुळपिर 0.0 (748.8), मानोरा 0.0 (781.2), कारंजा 0.0 (532.2), जिल्ह्यात 24 तासात 0.0 तर 1 जूनपासून आजवर 694.2 मि.मि. पाऊस झाला.

000000

 

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

                 विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.26 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (342.00), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.24), बेंबळा (266.65), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.47), वान (406.56), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (291.34), पेनटाकळी (557.30), खडकपूर्णा (520.18).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (447.50), चंद्रभागा (504.40), पूर्णा (450.13), सपन (510.50), पंढरी (426.70), गर्गा (344.40), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (305.04), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (391.40), मोर्णा (366.97), उमा (344.00), घुंगशीबॅरेज (254.00), वाशिम जिल्ह्यातील अडाण (380.97), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (403.00), पलढग (403.20), मस (324.50), कोराडी (545.25), मन (373.95), तोरणा (405.40), उतावळी (370.50) आहे.   

000000

 

बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२

विभागात आजपर्यत 667.9 पावसाची नोंद

 

विभागात आजपर्यत 667.9 पावसाची नोंद

 

अमरावती, दि. 24 (विमाका) : अमरावती विभागातील काही तालुक्यांत तुरळक पावसाची नोंद करण्यात आली.

विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत अमरावती विभागात सरासरी 1.8 मिमी पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 667.9 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

              विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बारा वाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)

 

अमरावती जिल्हा : धारणी 2.6 (682.8), चिखलदरा 0.1 (1095.4), अमरावती 0.0 (591.4), भातकूली 0.0 (465.7), नांदगाव खडेश्वर 0.0 (690.5), चांदूर रेल्वे 0.1 (596.8), तिवसा 0.0 (801.3),  मोर्शी 1.5 (710.2) वरुड 1.0 (963.3), दर्यापूर 2.8 (458.8), अंजनगाव 1.4 (530.1), अचलपूर 0.2 (555.8), चांदूरबाजार 0.1 (765.6), धामणगाव रेल्वे 0.0 (807.4) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 0.7 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 681.1 मि.मि. पाऊस झाला.

 

अकोला जिल्हा :- अकोट 0.5 (405.2), तेल्हारा 0.0 (517.3), बाळापूर 4.9 (589.5), पातूर 3.9 (526.1),  अकोला 4.3 (556.3), बार्शी टाकळी 5.1 (508.7), मुर्तीजापूर 0.4 (466.9), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 2.8 मि.मि. तर आजवर 510.8 मि.मि पाऊस झाला आहे.

 

बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 0.0 (374.4), संग्रामपूर 0.0 (485.5), चिखली 13.1 (524.2), बुलडाणा 6.0 (642.1), देऊळगाव राजा 5.1 (511.1), मेहकर 1.8 (577.2), सिंदखेड राजा 0.8 (581.7), लोणार 0.3 (490.5), खामगाव 7.1 (421.2), शेगाव 0.0 (479.7), मलकापूर 0.7 (379.9), मोताळा 2.9 (412.1), नांदूरा 0.1 (426.8), जिल्ह्यात दिवसभरात 3.8 तर यंदाच्या हंगामात आजवर 492.4 मि.मि. पाऊस झाला.

 

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 0.0 (808.7), बाभूळगाव 0.4 (830.0), कळंब 0.0 (898.9), दारव्हा 0.4 (654.0), दिग्रस 0.9 (817.3), आर्णी 0.1 (1029.4), नेर 0.4 (698.6), पुसद 1.9 (627.5), उमरखेड 0.0 (745.3), महागाव 0.2 (828.4), वणी 0.0 (1071.2), मारेगाव 0.1 (1041.6), झरीजामणी 0.3 (1010.7), केळापूर 0.4 (993.8), घाटंजी 0.0 (886.4), राळेगाव 0.1 (1036.5), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 0.3 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 864.8 मि.मि पाऊस झालाआहे.

 

वाशिम जिल्हा : - वाशिम 3.1 (707.1), रिसोड 0.1 (664.0), मालेगाव 0.2 (755.2), मंगरुळपिर 7.0 (748.1), मानोरा 2.0 (780.9), कारंजा 2.4 (532.0), जिल्ह्यात 24 तासात 2.4 तर 1 जूनपासून आजवर 693.5 मि.मि. पाऊस झाला.

000000

 

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

                 विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.24 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 24 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.78), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.22), बेंबळा (266.60), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.52), वान (407.74), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (291.31), पेनटाकळी (557.40), खडकपूर्णा (520.10).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (447.52), चंद्रभागा (504.30), पूर्णा (449.78), सपन (510.60), पंढरी (426.70), गर्गा (344.40), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.97), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (391.40), मोर्णा (366.97), उमा (344.00), घुंगशीबॅरेज (254.00), वाशिम जिल्ह्यातील अडाण (380.91), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (403.00), पलढग (403.20), मस (324.50), कोराडी (545.25), मन (373.80), तोरणा (405.40), उतावळी (370.50) आहे.   

000000

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 31 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांनी बॅक खात्यासोबत आधार संलग्न करावे

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

 31 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांनी

बॅक खात्यासोबत आधार संलग्न करावे

 

अमरावती दि.23 (विमाका) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KASAN) योजनेअंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांची e-kyc व (NPCI seeded) बॅक खात्यासोबत आधार संलग्न करण्यासाठी दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बॅक खात्यासोबत आधार संलग्न करावे असे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी कळविले आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना e-kyc प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून सर्व पात्र लाभार्थ्यांना e-kyc करण्यासाठी OTP किंवा बायोमॅट्रिक हे पयार्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

पीएम प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील बॅक खाते सोबत आधार संलग्न करणेकरीता प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांच्या तालुकानिहाय गावनिहाय याद्या amravati.gov.in संकेतस्थळावर सुचना/घोषणा प्रसिध्द करण्यात येत आहे. amravati.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीतील ज्या लाभार्थ्यांनी बॅक खाते सोबत आधार संलग्न केले नसेल त्यांनी दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यत e-kyc करणेकरीता केंद्राशी संपर्क साधून किंवा pmkisan.gov.in या संकेतस्थळावर Farmers Cornere-kyc NEWS हा पयार्य निवडून तसेच संबंधीत बॅकेशी संपर्क साधावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी अशिष बिजवल यांनी कळविले आहे.

000000