इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना
परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
अमरावती दि.02 (विमाका) : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या
विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील गुणवंत
मुला-मुलींना सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षाकरिता परदेशामध्ये उच्च शिक्षण
घेण्यासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणाकरिता
शिष्यवृत्ती निवडीसाठी दि. 5 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ
देण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी दि. 5 ऑगस्ट 2022
पर्यंत आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनिल
वारे यांनी केले आहे.
या योजनेच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांना विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पुर्ण रक्कम दिली
जाते. वैयक्तिक आरोग्य विमा खर्च, विद्यार्थ्यांस वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील
संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DOPT विभागाने
ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अथवा महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या
दराप्रमाण रक्कम निर्वाह भत्ता म्हणून अनुज्ञेय असेल. विद्यार्थ्यांस परदेशात
जातांना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर परत येतांना विमान प्रवासाचा
खर्च अनुज्ञेय असेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याांनी संबंधित कार्यालयाशी
संपर्क करावा असे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त यांनी कळविले आहे.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा