आजादी
का अमृत महोत्सव
भव्य तिरंगा कावड यात्रा
अमरावती, दि.4
(विमाका) : ‘तिरंगा माझा’ या सेवा भावी
संस्थेच्यावतीने ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत दि. 7 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा
कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘तिरंगा माझा’
गृपच्यावतीने आयोजित कावड यात्रेचे शहरात स्वागत होणार असून या यात्रेत भारत
मातेचे पूजन व सर्व थोर पुरुषांच्या स्मारकास जलाभिषेक करण्यात येणार आहे. कावड
यात्रेची सुरुवात चांदूरबाजार येथील कुरळपूर्णापासून सकाळी 7 वाजता होणार असून ही
यात्रा रिंगरोड, शेगांव नाका, पंचवटी चौक, इर्विन चौक, कॉटन मार्केट, चित्रा चौक,
जयंस्तभ मार्गे होणार असून नेहरु मैदानात या यात्रेचा समारोप करण्यात येईल. लोकप्रतिनिधी,
अधिकारी व मान्यवर उपस्थित राहतील.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा