विभागात यवतमाळ, वाशिम वगळता इतरत्र पाऊस
अमरावती,
दि. 12 (विमाका) : अमरावती विभागात यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील काही तालुके,
तसेच धारणी व शेगांत तालुके वगळता इतरत्र पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ,
बाभुळगाव, दारव्हा, दिग्रस, महागाव, केळापुर, घाटंजी व राळेगाव या तालुक्यांमध्ये,
अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुका, वाशिम जिल्ह्यातील वाशिम, मालेगाव, व मंगरुळपीर
तालुक्यांत व बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पावसाची नोंद नाही. विभागीय आपत्ती
व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा
वाजेपर्यंत अमरावती विभागात सरासरी 1.5 मिमी पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 626.2
मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी
यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात. ही माहिती
‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बारा वाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार
त्यात बदल होऊ शकतात.)
अमरावती जिल्हा : धारणी 0.0 (623.5), चिखलदरा 0.3
(976.4), अमरावती 4.6 (553.1), भातकूली 2.2 (436.0), नांदगाव खडेश्वर 0.2 (650.4),
चांदूर रेल्वे 0.2 (564.8), तिवसा 9.7 (760.7), मोर्शी 2.1 (664.4), वरुड 2.1 (873.7),
दर्यापूर 4.7 (423.1), अंजनगाव 4.0 (491.5), अचलपूर 7.9 (514.3), चांदूरबाजार 5.2
(713.9), धामणगाव रेल्वे 0.8 (776.6) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 3.2
मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 633.5 मि.मि. पाऊस झाला.
अकोला जिल्हा :- अकोट 5.3 (380.4), तेल्हारा 5.8
(487.5), बाळापूर 1.6 (548.1), पातूर 0.5 (483.6), अकोला 3.2 (522.8), बार्शी टाकळी 1.2 (465.6),
मुर्तीजापूर 1.2 (442.8), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 2.8 मि.मि. तर आजवर 477.4
मि.मि पाऊस झाला आहे.
बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 1.5 (360.4),
संग्रामपूर 4.9 (462.0), चिखली 0.1 (497.5), बुलडाणा 0.4 (615.7), देऊळगाव राजा
0.1 (489.5), मेहकर 0.1 (554.7), सिंदखेड राजा 0.2 (561.1), लोणार 0.1 (472.9),
खामगाव 0.6 (376.2), शेगाव 0.0 (463.2), मलकापूर 6.2 (347.0), मोताळा 5.1 (377.5),
नांदूरा 3.1 (399.2), जिल्ह्यात दिवसभरात 1.5 तर यंदाच्या हंगामात आजवर 465.7
मि.मि. पाऊस झाला.
यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 0.0 (778.8), बाभूळगाव 0.0
(795.1), कळंब 0.1 (853.8), दारव्हा 0.0 (615.9), दिग्रस 0.0 (745.4), आर्णी 0.2 (940.5),
नेर 0.1 (666.9), पुसद 0.1 (593.4), उमरखेड 0.3 (722.8), महागाव 0.0 (775.6), वणी
0.2 (982.2), मारेगाव 0.1 (982.6), झरीजामणी 0.2 (923.5), केळापूर 0.0 (910.2),
घाटंजी 0.0 (817.8), राळेगाव 0.0 (997.5), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 0.1 तर
यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 811.8 मि.मि पाऊस झालाआहे.
वाशिम जिल्हा : - वाशिम 0.0 (664.2), रिसोड 0.1 (637.4),
मालेगाव 0.0 (713.2), मंगरुळपिर 0.0 (696.4), मानोरा 0.1 (726.1), कारंजा 0.2 (500.7),
जिल्ह्यात 24 तासात 0.1 तर 1 जूनपासून आजवर 652.7 मि.मि. पाऊस झाला.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा