स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवानिमित्त
अभियांत्रिकी
महाविद्यालयात विविध कार्यक्रम
अमरावती दि.18 (विमाका) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवतंर्गत शासकीय
अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम
विभाग प्रमुख, अधिष्ठाता, अध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रा.
डॉ. ए. एम. महल्ले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध
कार्यक्रमांतर्गत सहायक प्राध्यापक, कॅप्टन डॉ. सुनील इंगळे यांचे राष्ट्रध्वजाचा
इतिहास व महत्व या विषयावर व्याख्यान, पालक शिक्षक सभा, देशभक्तीपर समुहगान
स्पर्धा, घरी व कार्यालयात केलेल्या ध्वजारोहणाच्या सेल्फींचे संकलन, प्रभात फेरी,
चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विविध कार्यक्रमांना प्राध्यापक, विद्यार्थी
व कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा