विभागीय आयुक्त कार्यालयात महसुल दिन साजरा
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा विभागीय आयुक्तांच्या
हस्ते गौरव
अमरावती
दि. 1 (विमाका) :- विभागीय आयुक्त कार्यालयात आज महसुल दिन साजरा करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रशस्तिपत्र
व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हाधिकारी पवनीत कौर व उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले
व सर्व सहकाऱ्यांना निवडणुक प्रक्रिया उत्कृष्टरित्या पार पाडल्याबद्दल विभागीय आयुक्तांच्या
हस्ते सन्मानीत करण्यात आले. त्याचप्रमाणे उपायुक्त संजय पवार, अपर आयुक्त निलेश सागर,
सहायक आयुक्त श्यामकांत म्हस्के, विवेकानंद काळकर (मागासवर्ग कक्ष), तहसिलदार वैशाली
पाथरे, नायब तहसिलदार मधुकर धुळे, तलाठी वैभव देशमुख, मंडळ अधिकारी सुनिल उगले यांचा उत्कृष्ट अधिकारी
म्हणुन त्यांच्या उत्कृष्ट प्रशासनिक कार्याबद्दल प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन
सन्मानित करण्यात आले.
000000
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा