राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त
विभागीय आयुक्तांनी दिली सद्भावना दिवस
प्रतिज्ञा
अमरावती, दि. 18: माजी
प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त डॉ. दिलीप
पांढरपट्टे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘सद्भावना दिवस’ प्रतिज्ञा
दिली.
जात, वंश, धर्म, प्रदेश
किंवा भाषा विषयक भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच
सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची
प्रतिज्ञा विभागीय आयुक्तांनी उपस्थितांना दिली.
यावेळी
महसूल संजय पवार उपायुक्त (सा.प्रशासन,महसुल), उपायुक्त अजय लहाने (पुरवठा), उपायुक्त
गजेंद्र बावणे(पुनर्वसन), उपायुक्त किरण जोशी (नियोजन), उपायुक्त विजय भाकरे (करमणुक),
सहा. आयुक्त श्यामकांत म्हस्के (भुसूधार), सहा. आयुक्त विवेकानंद काळकर (मागासवर्ग
कक्ष), तहसिलदार रवि महाले, वैशाली पाथरे, नाझर प्रविण वैद्य, स्वीय सहायक अतुल
बुटे यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा