सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रभात फेरीचे आयोजन

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रभात फेरीचे आयोजन

 

 

अमरावती दि.08 (विमाका) : स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्या बाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी, राष्ट्रीय सेना योजना स्वयंसेवक, अध्यापक व कर्मचाऱ्यांनी दि. 6 रोजी प्रभात फेरीचे आयोजन केले.

 प्रभात फेरीत संस्थेचे प्राचार्य प्रा. डॉ. ए. एम. महल्ले, एनएसएसचे मुख्य समन्वयक प्रा. टि. सी. भगत. जिमखाना प्रभारी अधिकारी प्रा. आर. व्हि. मांटे यांच्यासह संस्थेतील विभाग प्रमुख, अधिष्ठाता, अध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेना तसेच विभागीय एन. एस. एस. समन्वयक आदी सहभागी झाले. ‘घरोघरी तिरंगा’ ह्या उपक्रमात नागरिंकांनी उत्सुर्फपणे सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

    प्रभात फेरी दरम्यान राष्ट्रभक्तीपर गीते लावण्यात आली. सर्वानी वंदे मातरम, घर घर तिरंगा च्या घोषणा दिल्यात, प्रभात फेरीची सांगता संस्थेच्या परिसरात करण्यात आली.

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा