मतदार नोंदणीसाठी आधार क्रमांकाचा उपयोग करण्याचे आवाहन
अमरावती दि.02 (विमाका) : मतदार यादी शुध्द, अचूक व परिपूर्ण
होण्याचे अनुषंगाने सर्व मतदारांनी दि. 1 ऑगस्ट 2022 ते दि. 1 एप्रिल 2023 पर्यत
आपले आधार संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी
यांचेकडे दाखल करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाचे
विधी व न्याय मंत्रालयाद्वारे निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम, 2021 अन्वेय
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 आणि लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 मध्ये सुधारणा
करण्यात आलेल्या असून त्याअंतर्गत मतदार नोंदणी व मतदार यादी संबंधित नमुना अर्ज
क्र. 1,2,2 अ, 3,6,7,8,11,11अ, 11 ब,18 आणि 19 अर्जांमध्ये बदल करण्यात आलेले
आहेत. नमुना अर्जांमध्ये करण्यात आलेले सदर बदल हे दि. 1 ऑगस्ट 2022 पासून अंमलात
येत आहेत.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 मधील कलम 23 मधील
दुरुस्तीनुसार निद्यमान मतदारांकडून त्यांची ओळख प्रस्थापीत करण्याकरीता तसेच
मतदार यादीतील त्यांचे नोंदीचे प्रमाणीकरण करणे तसेच एकापेक्षा जास्त मतदार संघात
किंवा त्याच मतदार संघात त्याचे नाव एकापेक्षा जास्त नोंदविले गेले आहे किंवा कसे
याची पडताळणी करता यावी या करीता विद्यमान मतदारांनी नमुना अर्ज क्र. 6 ब मध्ये
त्यांचा आधार क्रमांक मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी
यांचेकडे दाखल करावयाचा आहे. मतदारांना आधार क्रमांक भरण्यासाठी ऑनलाईन (सुविधा
पोर्टल व ॲप) या सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार असून त्याद्वारेही मतदार आपला
क्रमांक नोंदवू शकतील. सदर कार्यक्रमाची सुरुवात 1 ऑगस्ट पासुन झाली आहे.
मतदारांना आधार क्रमांक भरण्यासाठी विशेष शिबीराचे
आयोजन ही करण्यात येत आहे. पहिले विशेष शिबीर दि. 4 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित
करण्यात येणार आहे. व नंतर आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष शिबीराच्या तारखा
वेळोवेळी जाहीर करण्यात येतील.
मतदारांनी नमुना अर्ज क्र. 6 ब चे किंवा अन्य मार्गाने
त्यांचा आधार क्रमांक मतदार यादीतील नोंदीशी जोडणे हे संपूर्ण ऐच्छिक आहे. मतदार
केवळ आधार क्रमांक सादर करण्यास असमर्थ आहे म्हणून त्यांचे नाव मतदार यादीतून
काढून टाकले जाणार नाही.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा