सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024;
जिल्ह्यातील मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन
अमरावती, दि. 23 (विमाका) : जिल्हा नियोजन विभागातर्फे, सन 2024 च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुररस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दि. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित मस्के यांनी केले आहे.
गणेशोत्सवास दिनांक 7 सप्टेंबर रोजी सुरुवात होत आहे. नोंदणीकृत अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेची माहिती आणि अर्ज http://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. जिल्हा नियोजन विभागाच्या दि. 31 जुलै 2024 च्या शासन निर्णयामध्ये स्पर्धा निवडीचे निकष, अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अर्जाच्या नमुन्यानुसार स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या Mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर अर्ज सादर करावा.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा