सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे एकदिवसीय जनजागृती कार्यशाळा; विधवा महिलांचे सक्षमीकरण, शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे हक्क यावर मान्यवरांचे मार्गदर्शन

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे एकदिवसीय जनजागृती कार्यशाळा; विधवा महिलांचे सक्षमीकरण, शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे हक्क यावर मान्यवरांचे मार्गदर्शन अमरावती, दि. 28 (जिमाका): महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे एकदिवसीय जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधवा महिलांचे सक्षमीकरण, शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे हक्क अशा विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी सौरभ कटियार मार्गदर्शन करताना म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्येला आळा घालणे आणि झाल्यास उपचार या दोन विषयावर मार्गदर्शन केले. आत्महत्यांमागील कारण समजून घेण्यावर त्यांनी भर दिला. न्यायमूर्ती के.के. टाटेड यांनी संघर्ष करणाऱ्या वर्गाला सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी भाषा हा कसा अडथळा आहे यावर प्रकाश टाकला आणि स्वयंसेवी संस्थांनी त्यांना या योजनांबद्दल जागरुक करणे आवश्यक असल्याने त्यानी सांगितले. आयोगामध्ये तक्रार कशी करावी, शेतकऱ्यांच्या समस्यांवरही त्यानी भाष्य केले. सदस्य एम.ए. सईद यांनी स्वयंसेवी संस्थांना विधवांचा संघटनात्मक कामकाजाच्या मुळाशी समावेश करण्याचा सल्ला दिला. अधिकारांसोबत कर्तव्ये येतात यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची भूमिका स्पष्ट केली, जेव्हा ही कर्तव्ये लोकसेवक पार पाडत नाहीत, तेव्हा आयोग त्यांना त्यासाठी निर्देश देतो. चांगल्या परिणामांसाठी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वयंसेवी संस्थांसोबत हातमिळवणी करून काम करावे, असे ही त्यांनी सांगितले. "लोकांना आपल्याकडे न बोलवता आपण त्यांच्या कडे जाऊ" असे सांगून त्यांनी शेवट केला. सचिव नितीन पाटील MSHRC यांनी उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे जारी करताना येणाऱ्या अडचणी काय असतात हे सांगितले. अशी कागदपत्रे देण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना कशी माहिती नाही, हे त्यांनी नमूद केले. समाजाच्या भल्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्राच्या पलीकडे जाऊन काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्यातील एकल महिला आणि स्वयंसेवी संस्था कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कार्यक्रमासाठी आपली नोंदणी केली. MSHRC सदस्य, YRA (युवा ग्रामीण असोसिएशन) सदस्य आणि भागधारक यांच्यात संवादात्मक सत्र झाले. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराज यांच्या गीताने व राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन सोहळा झाला. अनुभव शिक्षा केंद्राच्या विद्यार्थ्यांनी एका शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संघर्षावर डोळे उघडणारे पथनाट्य सादर केले. शेतकऱ्यांच्या विधवांना त्यांच्या पतीच्या मृत्यूसाठी कसे जबाबदार धरले जाते आणि समाजात महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल कशी माहिती नसते याचे चित्रणही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अँकरने डायसवरील सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला आणि त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालक देवराज पाटील यांनी युवा ग्रामीण असोसिएशन (2002) आणि त्यांच्या 70 लोकांच्या टीमबद्दल थोडक्यात माहिती दिली जे प्रामुख्याने ग्रामीण भागातील एकल महिला आणि शेतकऱ्यांसाठी काम करतात. त्यांचे ब्रीदवाक्य आहे “UNITE. AWARE. ACT”. शेतकऱ्यांच्या विधवांचा जीवन प्रवास वर्ध्यातील अरुणा बहादुरे, बांदीपोहरा येथील वैशाली शिंदे आणि कोकिळा राठोड आणि वर्ध्यातील वर्षा हटवाल यांनी त्यांच्या पतीच्या मृत्यूपूर्वी आणि नंतर त्यांचे जीवन कसे होते याचा प्रवास सांगितला. YRA चे मुख कार्यकारी अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रावर भाष्य केले. त्यांनी असेही नमूद केले की "एखाद्या व्यक्तीचा मानवी हक्क ज्यामध्ये दुसऱ्याचा मानवी हक्क डावलण्यात येत आहे तो मानवी हक्क नाही" कुलगुरू डॉ. मिलिंद बाराहाते यांनी उपेक्षित वर्गातील लोकांचे जीवन समजून घेण्याचा एकत्रित प्रयत्न कशाप्रकारे ग्राउंड रिॲलिटी देतो याचा उल्लेख केला. शिक्षण हाच संकटावर उपाय आहे आणि विद्यापीठ त्यांच्या संशोधनातून योगदान देईल यावर त्यांनी प्रकाश टाकला. डॉ. दिलीप काळे, स्टडी सेंटरचे प्रमुख यांनी नानी पालखीवाला यांच्या “आम्ही, लोक: भारत, सर्वात मोठी लोकशाही” चे महत्त्व स्पष्ट केले. "नाम" या संस्थेने 7 लाख रुपयांचे योगदान दिले जे 28 महिलांना वाटण्यात आले. प्रत्येकाला 25 हजार रुपये संस्थेने ग्राम लेखापरीक्षण कसे होत नाही यावर लक्ष केंद्रित करणारे विविध सामाजिक कार्यक्रमही आयोजित केले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा