पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले
योजनेंतर्गत अर्ज स्विकृतीस मुदतवाढ
अमरावती, दि. 20 : शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षात पंडीत दिनदयाल दपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत अर्ज स्विकृतीस उच्च शिक्षणाच्या द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत तसेच प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 15 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक विजय साळवे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन मध्ये शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्याकरीता वसतिगृह योजनेपासुन वंचित असलेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहु नये यासाठी शासन निर्णयान्वये आदिवासी विकास विभागाच्या स्वतंत्र योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र वसतिगृह निर्वाह भत्ता लागू केलेला आहे.
उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षासाठी अर्ज स्विकारण्याची दि. 5 जुलै 2024 व अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दि. 30 सप्टेंबर 2024 तर निवड यादी जाहीर करण्याचा दि. 15 ऑक्टोबर 2024 राहील. तसेच उच्च शिक्षणाचे प्रथम वर्ष दि. 5 ऑगस्ट 2024 व अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दि. 15 आक्टोबर 2024 तर निवड यादी जाहीर करण्याचा दि. 30 ऑक्टोबर 2024 राहील.
तसेच संबंधित विद्यार्थ्यांनी शासन निर्णय दि. 6 सप्टेंबर 2019 मध्ये नमुद अटी व शर्तीची पूर्तता परीपूर्ण प्रस्ताव संबंधित जिल्ह्याचे सहायक संचालक व इतर मागास बहुजन कल्याण यांचेकडे सादर करण्यात यावे, असेही आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक विजय साळवे यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा