शासकीय कार्यालयाच्या
आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची 30 ऑगस्टला कार्यशाळा
अमरावती, दि. 29 : प्रधान महालेखाकार (लेखा व हकदारी-2), नागपूर आणि अमरावती वरिष्ठ कोषागार अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरिता 30 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही महत्वपूर्ण कार्यशाळा सकाळी 10.30 वाजता सुरु होणार असून जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
या कार्यशाळेत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना व्हीपीडीए प्रणाली, ई-पीपीओ, ई-जीपीओ, ई-सीपीओ, एनपीएस, ई-कुबेर, ई-बील या प्रणाली संदर्भात सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तसेच यानुषंगाने येणाऱ्या समस्या व त्याचे निराकरणाबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा