सोमवार, ३१ मार्च, २०२५

ईद-उल-फित्र निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

ईद-उल-फित्र निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा मुंबई, दि.३१ : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. उपवास, प्रार्थना व दानधर्माच्या माध्यमातून साजरा होत असलेला रमजान ईद हा अतिशय पवित्र सण आहे. हा मंगल दिवस आनंद, समाधान व संपन्नता घेऊन येवो, या प्रार्थनेसह सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद उल फित्रच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

नागपूर येथे वैदिक गणित गुणवत्ता केंद्र सुरू व्हावे; शासन सर्वतोपरी मदत करेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · वैदिक गणिताच्या खंडांचे प्रकाशन

नागपूर येथे वैदिक गणित गुणवत्ता केंद्र सुरू व्हावे; शासन सर्वतोपरी मदत करेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · वैदिक गणिताच्या खंडांचे प्रकाशन नागपूर, दि. ३१ : भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. वैदिक गणिताची महती व उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्याकरिता भारती कृष्ण विद्या विहार येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करत यास शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विश्व पुनर्निर्माण संघ संचालित भारती कृष्ण विद्या विहार शाळेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आद्य शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज लिखित वैदिक गणिताच्या दोन खंडांचे प्रकाशन झाले. विश्व पुनर्निर्माण संघाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार काळे, सरचिटणीस शैलेश जोगळेकर, संचालक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्राचीन भारतीय संस्कृतीत अनेक महत्वाची शास्त्र विकसित झाली. मात्र, परकीय आक्रमण आदींमुळे या शास्त्रांतील ज्ञान सर्वांपर्यंत पोहचू शकले नाही. आद्य शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज यांनी वेद ऋचांचा अभ्यास करून सोप्या पद्धतीने संपूर्ण गणिताची मांडणी वैदिक गणित खंडांमध्ये केली आहे. केंद्रीय माध्यमिक मंडळाच्या इयत्ता पाचवी ते सातवी च्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. या खंडांच्या माध्यमातून वेदांमधील ज्ञानाचा साठा शंकराचार्यांनी शोधला आहे. वैदिक गणित ही भारताची महत्वाची, मोठी ज्ञानसंपदा आहे. त्यासंदर्भात संशोधन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने भारती कृष्ण विद्या विहारामध्ये गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशी अपेक्षा श्री.फडणवीस यांनी व्यक्त केली. शिक्षण विभागाद्वारे वैदिक गणित विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, मानवी जीवनात अनेक प्रसंगांमध्ये गणना, आकडेवारीचे अनन्यसाधारण महत्व आहे. प्राचीन भारतीय परंपरेतून आलेल्या वैदिक गणिताचा विचार हा विश्व कल्याणासाठी आहे. जगात अध्यात्मावर आधारित घडत असलेल्या विविध परिवर्तन आणि पुनर्रचनेमध्ये वैदिक गणितही महत्वाची भूमिका निभावू शकते आणि जगाला सुखी व समृद्ध बनविण्यातही मोलाचे योगदान देवू शकते असे त्यांनी सांगतिले. सांख्यदर्शन, वक्ररचना निर्देशांक यांच्यासह नल-दमयंती आख्यान, महाभारत आदींमधील उदाहरणे देवून त्यांनी गणिताचे महत्व विषद केले. विश्व पुनर्निर्माण संघाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार काळे यांनी प्रास्ताविक केले तर सरचिटणीस शैलेश जोगळेकर यांनी आभार मानले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दीक्षाभूमीला भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दीक्षाभूमीला भेट नागपूर, दि. 30: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाला अभिवादन केले. तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करून बुद्धवंदना घेतली. दीक्षाभुमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, स्मारक समितीचे सचिव राजेंद्र गवई उपस्थित होते. विकसित, सर्वसमावेशक भारत घडवणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली अभिप्राय नोंदवहीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांपैकी एक असलेल्या नागपूर स्थित दीक्षाभूमीला भेट देण्याचे सौभाग्य लाभल्याने मी भारावून गेलो आहे. या पवित्र स्थळाच्या वातावरणात बाबासाहेबांच्या सामाजिक समता, समानता आणि न्यायाच्या तत्त्वांचा अनुभव येतो. दीक्षाभूमी आपल्याला वंचित आणि गरजूंसाठी समान हक्क आणि न्यायाच्या व्यवस्थेसह पुढे जाण्याची ऊर्जा प्रदान करते. मला पूर्ण विश्वास आहे की या अमृत काळात आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणी आणि मूल्यांचा मार्ग अनुसरून देशाला प्रगतीच्या नव शिखरावर नेऊ. एक विकसित आणि सर्वसमावेशक भारत घडवणे हीच बाबासाहेबांना आपली खरी श्रद्धांजली ठरेल’, असा संदेश यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी नोंदविला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्मृती मंदिराला भेट स्मृती मंदिर राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देणारे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्मृती मंदिराला भेट स्मृती मंदिर राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देणारे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नागपूर, दि. 30: स्मृती मंदिर भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटनशक्ती या मूल्यांना समर्पित आहे. ते आपल्याला सतत राष्ट्रसेवेसाठी पुढे जाण्याची प्रेरणा देते, असा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूर, रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर परिसराला भेट देऊन आद्य सरसंघचालक पू. केशव बळीराम हेडगेवार यांचे समाधी स्थळ, तसेच द्वितीय सरसंघचालक पू. माधव सदाशिव गोळवलकर यांच्या यज्ञवेदीस्वरूप स्मृतिचिन्हाचे दर्शन घेतले. या दोन महापुरूषांची स्मृती जागविणारे हे स्थळ देशसेवेला समर्पित लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जा केंद्र आहे असाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. यावेळी प्रधानमंत्री यांनी महर्षी व्यास सभागृह, दत्तोपंत ठेंगडी सभागृह व परिसराची पाहणी केली, तसेच उपस्थितांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी उपस्थित होते.

संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी देशाला पुढे घेऊन जाणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी देशाला पुढे घेऊन जाणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माधव नेत्रालयाने जनतेच्या जीवनात प्रकाश आणण्याचे महत्तम कार्य केले माधव नेत्रालय मध्य भारतातील आरोग्य क्षेत्रात महत्वाची नेत्र संस्था ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती नागपूर, दि. 30 : संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचे सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी याचा अवलंब करावा, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी केंद्र शासन कसोशीने कार्य करीत आहे. माधव नेत्रालयानेही या कार्यात योगदान देत गेल्या तीन दशकांपासून लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे मोलाचे कार्य केल्याचे गौरवोद्गार, त्यांनी काढले. नागपूर येथील हिंगणा रोडवरील माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, स्वामी अवधेशानंद गिरी, स्वामी गोविंद देव गिरी, माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे सरचिटणीस डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, गेल्या दशकात ग्रामीण भागात लाखो आयुष्मान भारत केंद्रे उभारण्यात आली. कोट्यवधी लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. टेलिमेडिसिनद्वारे उपचार व आरोग्य सेवा सशक्त करण्यात आल्या. एम्ससारख्या संस्थांची संख्या तिपटीने वाढविण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच देशात वैद्यकीय शिक्षण मातृभाषेत उपलब्ध करून दिले. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. योग आणि आयुर्वेदालाही जगात मानाचे स्थान मिळाले आहे. आरोग्य सेवेपासून कुणी वंचित राहू नये असे शासनाचे धोरण असून त्यानुसार सक्षमपणे कार्य सुरू असल्याने त्यांनी सांगितले. आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यात आले. आरोग्य क्षेत्रातील सुधारणांचा हाच वसा माधव नेत्रालय पुढे घेऊन जात आहे. द्वितीय सरसंघचालक माधवराव गोळवलकर गुरुजी यांच्या आदर्शावर मार्गक्रमण करत नेत्रालयाने अंध:कार दूर करीत लोकांच्या जीवनात प्रकाश आणला आहे. प्रीमियम सेंटरमुळे या नेत्रालयाच्या कार्याचा विस्तार होऊन त्यास गती मिळेल. तसेच देशातील आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीतही या संस्थेचे भरीव योगदान राहील. विदर्भातील थोर संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज हे जन्मतः अंध होते. मात्र अंधत्वावर मात करीत त्यांनी ज्ञानाची दृष्टी विकसित केली. दृष्टी बोधातून येते व विवेकातून प्रगट होते याचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ अशा देशातील संतांनी भारताला एकसंध ठेवत उत्तम शिकवण दिली. माधव नेत्रालयानेही त्यांच्या विचारांची कास धरत कार्य केले आहे. समाजसेवेचे हे कार्य अव्याहत पुढे जावे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. माधव नेत्रालय मध्य भारतातील आरोग्य क्षेत्रात महत्वाची नेत्र संस्था ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दृष्टी ही ईश्वराने मानवाला दिलेला मौल्यवान ठेवा आहे. ज्यांच्याकडे दुर्देवाने ही दृष्टी नाही त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य माधव नेत्रालय गत तीन दशकांपासून करीत आहे. देशात व राज्यात नेत्र आरोग्य क्षेत्रात भरीव सेवा देण्याची आवश्यकता आहे. माधव नेत्रालयासारख्या संस्था सातत्यपूर्ण सेवा कार्य करीत या क्षेत्रामध्ये भरीव योगदान देत आहेत. नेत्रालयाचे प्रीमियम सेंटर अस्तित्वात आल्याने मध्य भारतातील नेत्र आरोग्य क्षेत्रात सेवा देणारी माधव नेत्रालय ही महत्वाची संस्था ठरणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. लोककल्याणाच्या प्रेरणेतून माधव नेत्रालयाचे जीवनदृष्टी देण्याचे कार्य -सरसंघचालक डॉ मोहन भागवत नि:स्वार्थ भावनेतून लोककल्याणाच्या प्रेरणेने माधव नेत्रालय अव्याहतपणे कार्यरत असून दृष्टीबाधितांना जीवनदृष्टी देण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत असल्याचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यावेळी म्हणाले. चैत्र प्रतिपदेचा दिवस आणि माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे भूमीपूजन हा एक शुभ योग असल्याचे सांगत शुभ योगासाठी तप:श्चर्येची आवश्यकता असते. तप:श्चर्येतून पुण्य लाभते व पुण्यातून फळ मिळते या मागची प्रेरणा लोककल्याण आहे. चांगल्या कर्मातून प्राप्त फळाचा उपयोग विश्व कल्याणासाठी करण्याची प्रत्येक माणसाची भूमिका असल्यास सर्वांचे जीवन निरामय होईल, असे ते म्हणाले. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या माधव नेत्रालयाचा आतापर्यंतचा प्रवास दर्शविणाऱ्या स्मरणिकेचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. माधव नेत्रालयाचे सचिव डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शांतीमंत्राने कार्यक्रमांची सांगता झाली. महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष शेलार, गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. माधव नेत्रालयाविषयी... द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागपुरात माधव नेत्रालयाची स्थापना १९९५ मध्ये झाली. वासुदेवनगर येथील माधव नेत्रालय सिटी सेंटर २०१८ पासून सेवेत आहे. या नेत्र चिकित्सालयातून आधुनिक तंत्रज्ञानाने गरीब रुग्णांवर कमी खर्चात उपचार होतात. अशी असेल नवीन वास्तू माधव नेत्रालयाची नवीन वास्तू हिंगणा रोडजवळील वासुदेवनगर येथे ५.८३ एकर जागेत बांधण्यात येणार आहे. येथे आधुनिक उपकरणांनी सुसज्ज २५० खाटा, १४ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि १४ अत्याधुनिक शस्त्रक्रिया केंद्र, नेत्रपेढी, संशोधन केंद्र असेल. सर्वत्र हिरवळ, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा अशी व्यवस्था या परिसरात राहणार आहे 0000

प्रधानमंत्री यांच्या हस्ते सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्टे रेंज व रनवेचे उद्घाटन

प्रधानमंत्री यांच्या हस्ते सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्टे रेंज व रनवेचे उद्घाटन नागपूर, दि. 30 : नागपूर – अमरावती रोडवरील बाजारगाव स्थित सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्ट रेंज आणि रनवे सुविधेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलर कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, कंपनीचे व्यवस्थापकीस संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष नुवाल, सोलर डिफेंस ॲन्ड एरोस्पेस लिमिटेडचे कार्यकारी संचालक वासुदेव आर्या उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोटेरिंग म्युनिशन टेस्ट सुविधेचे तसेच भारतातील पहिली अनमॅन एरियल सिस्टीम (युएसए), 1.27 कि.मी. चे रनवे, हँगर्स आणि रिपेअर लेनचे रिमोटद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी सोलर ग्रुपद्वारा निर्मित अत्याधुनिक सुरक्षा यंत्राचे अवलोकन केले. कार्यक्रमाला कंपनीचे उपमहाव्यवस्थापक श्याम मुंदडा व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रेशीम उद्योगातून विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल विदर्भातील शेतकरी हितासाठी रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ

रेशीम उद्योगातून विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल विदर्भातील शेतकरी हितासाठी रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ मुंबई, दि. 31: सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरते. अशावेळी कमी पाण्यावर होणारी तुती लागवड ही शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर, आणि आर्थिक पाठबळ देणारी शाश्वत शेती म्हणून उत्तम पर्याय समोर येत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून समृद्ध करण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या सहकार्याने विविध योजनांची अंमलबाजवणी करीत आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल होत आहे. त्यामुळे रेशीम शेतीला चालना देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत . केंद्र शासनकडून यासाठी जो निधी मिळतो त्याचा प्रस्तवा तातडीने तयार करून केंद्र शासनाकडे पाठपुराव करावा अशा सूचनाही विभागाला मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत केंद्र सरकार आणि राज्यशासन तसेच खाजगी कंपन्या, सामाजिक संस्था यांच्या सामाजिक दायित्व निधीतून तुती व टसर उद्योगाचा एकात्मिक विकास करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार तातडीने बैठक घेऊन रेशीम शेती संचालनालयाचे कार्यालय नसलेल्या जिल्ह्यांमध्ये तुती व टसर रेशीम उद्योगाच्या विकासासाठी पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन येथील बाएफ या संस्थेची मदत होत आहे. या संस्थेच्या मदतीने रेशीम उद्योग कार्यालय कार्यान्वित करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे . बाएफ संस्थेने तुती लागवड ते कापड निर्मितीतील मूल्यवर्धित साखळी निर्माण करण्यासाठी रेशीम संचालनालयास मदत करण्याबाबतचे सादरीकरण केले. तुती लागवड, अंडीपुंज ते कोष निर्मिती, कोषोत्तर प्रक्रीया उद्योगास चालना देवून समूह पध्दतीने विकास, त्याद्वारे मुल्यवर्धीत साखळी निर्माण करणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे याबाबत बाएफ व रेशीम संचालनालय यांनी क्षेत्रे निश्चित करावी. ज्या क्षेत्राच्या साखळी विकासामध्ये तुट अशा क्षेत्रातील तज्ज्ञ, कार्यरत व्यक्तींनी त्यासाठी बाएफ संस्थेने मुल्यवर्धीत साखळी निर्माण करुन स्थानिकांना रोजगार निर्मिती आणि रेशीम उद्योगाला चालना दिली आहे, अशा उरळी कांचन, जि. पुणे येथे प्रत्यक्ष भेट देवून पुढील दिशा व कार्यकक्षा निश्चित करण्यात येत आहे. रेशीम शेती आणि वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून रेशीम उद्योगासाठी आवश्यक निधी संदर्भात पाठपुरावा आणि राज्यातील रेशीम संदर्भातील संबंधित विभागाचा समनव्य करून याला अधिक गती देण्यात येत आहे. तुती लागवड, ऐन व अर्जुन वृक्ष लागवडीसाठी वन विभागाची मदत आणि. झोमॅटो व झेप्टो या कंपनीच्या सामाजिक दायीत्व निधीतून आदिवासी जिल्हयामध्ये तुती, ऐन व अर्जुन वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येत अजून याबाबतच कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. टसर क्षेत्रामध्ये रेशीम अळीचे संगोपन करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीसंदर्भात संबधित जिल्हयातील वनविभागाचे अधिकारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना तातडीने सहकार्य करण्याचे नियोजन करावे. निधीची आवश्यकता असल्यास किंवा प्रस्ताव प्रलंबीत असल्यास त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयामार्फत पाठपुरावा करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. तुती व टसर क्षेत्रातील विकासाकरिता विशेषतः महीला व अदिवासी घटकांना उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी पुढील 5 वर्षामध्ये 10 हजार लाभार्थ्यांसाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून रेशीम शेतीला प्रोत्साहन राज्यातील तुती व तसर रेशीम शेतकऱ्यांना जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत 75 टक्के इतक्या सवलतीच्या दरात अंडीपुंज पुरवठा करण्यात येत आहे. तसेच राज्यांतर्गत रेशीम शेती नवनवीन प्रयोग पाहण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात येतो. रेशीम शेतकऱ्यांना विद्या वेतनासह 15 दिवसांचे तांत्रिक प्रशिक्षणही देण्यात येत आहे. रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या रेशीम कोषांना उत्पादनावर आधारित प्रोत्साहन पर अनुदान, सूत उत्पादन अनुदान योजना, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती रेशीम सुत उत्पादनासाठी आर्थिक साह्य आधुनिक यंत्रसामुग्रीसाठी अनुदान, मल्टी अँड रेलिंग युनिट 100 प्रति किलो अनुदान, ऑटोमॅटिक रेलिंग युनिट 150 रुपये प्रति किलो, अनुदान टसर रीलींग युनिट 100 रुपये प्रति किलो अनुदान देण्यात येत आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा उपयोग करून,योग्य तंत्रज्ञान,शेकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देऊन ग्रामीण,दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी त्यांना आर्थिक सक्षमता मिळू देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच बरोबर आदिवासी,ग्रामीण भागात तुतीची लागवड आणि रेशीम उत्पादनामुळे स्थानिक पातळीवर मोठया प्रमाणत रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

अमरावती, 30 मार्च 2025: आज अमरावतीने इतिहास रचला! प्रथमच एटीआर-७२ चाचणी विमान यशस्वीरीत्या उतरले आणि यामुळे प्रादेशिक हवाई संपर्काच्या नव्या युगाची सुरुवात झाली . महाराष्ट्राच्या विमानतळ विकासाच्या दिशेने हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. अलाईन्स एअरच्या चाचणी विमानाने दिला नव्या युगाचा संदेश

अमरावती, 30 मार्च 2025: आज अमरावतीने इतिहास रचला! प्रथमच एटीआर-७२ चाचणी विमान यशस्वीरीत्या उतरले आणि यामुळे प्रादेशिक हवाई संपर्काच्या नव्या युगाची सुरुवात झाली . महाराष्ट्राच्या विमानतळ विकासाच्या दिशेने हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. अलाईन्स एअरच्या चाचणी विमानाने दिला नव्या युगाचा संदेश प्रादेशिक संपर्क योजना (आरसीएस) – उडान अंतर्गत व्यावसायिक विमान सेवेसाठी या विमानतळाची पूर्ण तयारी असल्याचे दाखवणारे हे विशेष चाचणी विमान इंदौरहून अमरावतीला आले. हे केवळ एक विमान नव्हते, तर दीर्घ प्रतीक्षेनंतर हवाई प्रवासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होती. यशस्वी लँडिंग आणि सहज टेकऑफ! नेमक्या १५:५६ वाजता, एटीआर-७२ विमानाने अमरावती विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, नेव्हिगेशन प्रणाली आणि ग्राउंड हँडलिंग क्षमतांचा हा पहिला यशस्वी कसोटीसारखा क्षण होता. यानंतर अवघ्या काही मिनिटांत, १६:१७ वाजता, विमानाने पुन्हा इंदौरसाठी उड्डाण घेतले, आणि या ऐतिहासिक क्षणाची यशस्वी पूर्णता झाली. विदर्भाच्या संधींना नवे पंख! अमरावती विमानतळाचे भव्य उद्घाटन आता जवळ आले आहे, आणि हा विमानतळ विदर्भाच्या अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यटन आणि हवाई संपर्कासाठी गेम-चेंजर ठरणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) तर्फे उडान योजनेअंतर्गत विकसित हे विमानतळ केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर उद्योग, व्यवसाय आणि प्रवाशांसाठी सुवर्णद्वार ठरणार आहे. नेतृत्व जे स्वप्नांना वास्तवात उतरवते या ऐतिहासिक क्षणी एमएडीसीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती पांडे यांनी आपला आनंद आणि अभिमान व्यक्त केला: "आपल्या माननीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिशील नेतृत्वाखाली, एमएडीसीने पुन्हा एकदा अशक्य शक्य करून दाखवले आहे! हा मैलाचा दगड म्हणजे महाराष्ट्रातील विमानतळ पायाभूत सुविधांमधील आमच्या अपराजित उत्कृष्टतेचा पुरावा आहे. हे यश केवळ एक लँडिंग नाही, तर प्रादेशिक हवाई संपर्काच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे, जी अमरावती आणि संपूर्ण प्रदेशासाठी प्रगतीची नवी दारं उघडेल!" प्रादेशिक हवाई प्रवासाचा नवा अध्याय सुरू! हे यशस्वी चाचणी विमान हा केवळ प्रारंभ आहे. येत्या भव्य उद्घाटन सोहळ्यासह, अमरावती भारताच्या हवाई नेटवर्कमध्ये एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल. टियर-२ आणि टियर-३ शहरांना विमानसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक पावलागणिक, अमरावती विमानतळ महाराष्ट्रातील प्रमुख विमानतळ हब होण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे—अंतर कमी करणे, संधी निर्माण करणे आणि उज्वल भविष्यासाठी झेप घेणे! अमरावती आता उड्डाण घेत आहे! पहिल्या यशस्वी विमान सेवेसह, अमरावतीने आता हवाई नकाशावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे—आणि ही तर फक्त सुरुवात आहे! आकाश हे मर्यादा नाही, तर नव्या संधींचा प्रारंभ आहे. भव्य उद्घाटनाच्या प्रतीक्षेत रहा आणि महाराष्ट्राच्या प्रादेशिक हवाई संपर्काच्या नव्या युगाच्या साक्षीदार बना

शुक्रवार, २८ मार्च, २०२५

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेत व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रीय कार्यालयास प्रथम पुरस्कार सर्वांच्या सांघिक प्रयत्नामुळे प्रथम पारितोषिकाची प्राप्ती -व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक प्रदीप घुले यांचे मनोगत

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेत व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रीय कार्यालयास प्रथम पुरस्कार सर्वांच्या सांघिक प्रयत्नामुळे प्रथम पारितोषिकाची प्राप्ती -व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक प्रदीप घुले यांचे मनोगत अमरावती, दि. 28 : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2024-25 अंतर्गत राज्यस्तरीय पारितोषिक विजेत्यांची नावे राज्य शासनाव्दारे बुधवारी (ता.26 मार्च) जाहीर करण्यात आली आहे. त्यात विभागीय स्तरावर उत्कृष्ट आय.टी.आय.,रोजगार मेळावे, संवाद फोरम या बाबींतर्गत सहसंचालक, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयास 10 लक्ष रुपयाचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रधान सचिव मनीषा वर्मा, संचालक माधवी सरदेशमुख यांच्या मार्गदर्शन आणि विभागातील सर्व प्राचार्य, शिल्प निदेशक, अधिकारी-कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नामुळे प्रथम पारितोषिक प्राप्त झाला, असे मनोगत सहसंचालक प्रदीप घुले यांनी व्यक्त केले. पुरस्कारासाठी सादर केलेल्या प्रस्तावात विविध घटकांतर्गत केलेल्या विकासकामांचा श्री. घुले आलेख मांडला. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेकरीता विभागातील कार्यरत 63 शासकीय आयटीआय व 25 तांत्रिक उच्च माध्यमिक शाळांच्या संसाधनांचा विविध योजनांच्या माध्यमातून विकास करण्यात आला असून 20 ऑगस्ट ते 24 ऑक्टोंबर 2024 दरम्यान हे अभियान उत्तमरित्या राबविण्यात आले आहे. राज्यातील 25 उत्कृष्ट आयटीआय निवडल्यास त्यापैकी 24 आयटीआय हे एकट्या अमरावती विभागात कार्यरत आहेत, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत प्रशासकीय कामांमध्ये सुधारणा, प्रशासन लोकाभिमूख, ई गर्व्हनन्स, वैशिष्ट्यपूर्ण व नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे, महसूल गोळा करणे, विद्यार्थी हिताच्या दृष्टीने कौशल्याधारित अभ्यासक्रम राबविणे, रोजगार मेळावे आदी घटकांतर्गत विविध विकासकामांचा समावेश असून त्याचे छायाचित्रण स्वरुपात सादरीकरण राज्य शासनास करण्यात आले आहे, असे श्री. घुले यांनी सांगितले. विभागातील 63 शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थीहिताच्या दृष्टीने डिजीटल लायब्ररी, स्मार्ट क्लासरुम, ओपन जीम, रेनवॉटर हारवेस्टींग, लॅन्डस्केपिंग, खेळाचे मैदान निर्माण केले असून सर्व संसाधनयुक्त लॅब्स् -कार्यशाळा विकसित केल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट खेळाडू घडावे यासाठी 16 आयटीआय मध्ये इनडोअऱ बॅडमिंटन हॉल्स विकसित केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना तसेच तांत्रिक कलागुणांना वाव मिळावा म्हणून विभागस्तरीय तंत्र प्रदर्शनी, क्रीडा स्पर्धा, रोजगार मेळावे, संवाद वारी यासारखे विविध उपक्रम राबविले आहेत. कौशल्यपूर्ण विद्यार्थी-विद्यार्थीनी घडावेत यासाठी सहसंचालक कार्यालय येथे कार्यान्वित असलेल्या राज्यातील एकमेव निवासी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विभागातील 350 कार्यरत व नवनियुक्त शिल्प निदेशकांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिलेले आहे. अभियान कालावधीत विभागाव्दारे जवळपास 100 रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून यामाध्यमातून सुमारे 5 हजार मुला-मुलींना चांगल्या, नामांकित आस्थांपनांमध्ये नोकरी मिळाली आहे, असे श्री. घुले यांनी सांगितले. आयटीआय प्रशिक्षण करणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. विद्यार्थी हा केद्रबिंदू ठेवून त्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देवून रोजगार व स्वयंरोजगार उभारण्यासाठी विभागाकडून नियमितपणे मार्गदर्शन व सहाय्य केले जाते. आगामी काळात विभागातील सर्व आयटीआयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पीपीई योजनेंतर्गत इलेक्ट्रीकल व्हेईकल, सोलर टेक्नॉलॉजी, आयओटी, एआय टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, टेक्निशीयन मॅकॅट्रोनिक्स यासारखे नवीनतम अधिक मागणी असणारे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात येणार आहे. तालुका स्तरावरील आयटीआयच्या प्राचार्य, गटनिदेशकांनी आयटी क्षेत्रातील संस्थांच्या धर्तीवर त्यांच्या संस्था विकसित केल्या आहेत. विभागातील सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अभियान कालावधीत उत्तम विकास कार्य केल्याने अमरावती विभागीय कार्यालयास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. राज्यातील सर्व विभागातून अमरावती विभागाने सर्वोत्कृष्ट काम केले आहे, त्याचीच ही फलश्रुती आहे, असेही ते म्हणाले. त्यांच्या कारकिर्दीत यापूर्वी सन 2010 मध्ये घाटंजी आयटीआयला प्राचार्य असताना राज्यातून तृतीय क्रमांकाचा 4 लक्ष रुपयाचा पुरस्कार मिळाला होता. आता हा दुसऱ्यांदा विभागस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल विभागप्रमुख या नात्याने राज्य शासनाचा आभारी असल्याचे त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले.

जनसंवाद कार्यक्रमात 700 च्यावर निवेदने सादर नागरिकाच्या विविध समस्या तात्काळ निकाली काढण्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

जनसंवाद कार्यक्रमात 700 च्यावर निवेदने सादर नागरिकाच्या विविध समस्या तात्काळ निकाली काढण्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश अमरावती, दि. 28 :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील स्थानिक समस्याबाबत नागरिकांनी 700च्या वर निवेदने सादर केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या, त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचे समाधान केले. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी आज नियोजन भवन येथे नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधला. जनसंवाद कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पालकमंत्री यांना निवेदन देण्यासाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. पालकमंत्री यांनी तक्रारी, निवेदने आणि समस्या घेऊन आलेल्या नागरिकांशी व्यक्तीशः संवाद साधला त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या तक्रारीवर येत्या आठ दिवसात कार्यवाही करण्यात येणार असून त्यासंबंधीची पोहोच पालकमंत्री कार्यालयातून येत्या आठ दिवसात देण्यात येणार आहे. वीज बिल, मालकी पट्टे, रस्ते, नोकरी, कृषी, शेतकरी आत्महत्या, घरकुल, रस्ते, पाणी, क्रीडा या विषयावर सुमारे चार तास पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सुमारे सातशेच्या वर तक्रारी पालकमंत्री यांनी स्वतः स्वीकारल्या. पालकमंत्री यांनी नागरिकांशी चर्चा केली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. अनेक लोक वैयक्तिक समस्यांची निवेदने घेऊन जनसवांद कार्यक्रमात आले होते. श्री. बावनकुळे यांनी नागरिकांच्या संबंधित निवेदनावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३० मार्च २०२५ रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून, नागपुरातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि अभिवादन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सविस्तर वृत्त - https://mahasamvad.in/160702/

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३० मार्च २०२५ रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून, नागपुरातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि अभिवादन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सविस्तर वृत्त - https://mahasamvad.in/160702/

अमरावती उपविभागीय कार्यालयाचे संकेतस्थळ सुरू

अमरावती उपविभागीय कार्यालयाचे संकेतस्थळ सुरू अमरावती, दि. 28 : मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमांतर्गत सुलभ, लोकाभिमुख व गतिमान प्रशासनाचा एक भाग म्हणून सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्याच्या उद्देशाने उपविभागीय अधिकारी, अमरावती यांनी त्यांच्या कार्यालयाचे www.sdoamravati.com हे संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे करण्यात आले. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे आदी यावेळी उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी संकेतस्थळाची आवश्यकता आणि त्याची वैशिष्ट्ये विशद केली. संकेतस्थळामध्ये अमरावती उपविभागाचा इतिहास, अमरावती विभागातील सर्व गावांचे नकाशे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्याला त्याच्या शेताच्या नकाशासाठी कोठेही फिरण्याची आवश्यकता नाही. तो संकेतस्थळावरून नकाशा डाउनलोड करून आपले काम करू शकतो. या संकेतस्थळामध्ये प्रशासकीय सेटअपमध्ये अधिकारी ते कर्मचारी अशी सर्वांची नावे आणि त्यांच्याकडे नेमून दिलेली कामे यांची माहिती उपलब्ध असल्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या कामासाठी नेमके कोणाकडे जावे याची अडचण येणार नाही. संकेतस्थळावर रोजगार हमी योजना, अन्न व नागरी पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना, माहितीचा अधिकार कायदा, लोकसेवा हक्क कायदा यांसारख्या योजना आणि कायद्यांविषयी माहिती, संबंधित शासन निर्णय आणि योजनांचा लाभ घेण्यासाठीच्या अटी व अर्ज उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांना आवश्यक असणारे अर्जाचे नमुने संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील आणि त्यांना अर्जासाठी कोठेही जाण्याची आवश्यकता भासणार नाही. संकेतस्थळाच्या मीडिया गॅलरीमध्ये कार्यालयामार्फत आयोजित विविध शिबिरे आणि कार्यक्रमांचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत. तसेच, संकेतस्थळावर कार्यालयाचा हेल्पलाईन क्रमांक आणि ई-मेलही दिलेला आहे. या संकेतस्थळावर प्रवेश करण्यासाठी QR कोडची निर्मिती करण्यात आल्यामुळे नागरिक सहजपणे संकेतस्थळावर पोहोचू शकतात. हा QR कोड सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. राज्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे हे दुसरे संकेतस्थळ आहे. ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.

क्षयरोगमुक्त जिल्हा करण्यासाठी लोकाभिमुख चळवळ राबवावी -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

क्षयरोगमुक्त जिल्हा करण्यासाठी लोकाभिमुख चळवळ राबवावी -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती, दि. 28 :संपूर्ण जिल्हा लवकरच क्षयरोगमुक्त करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही पुढाकार घ्यावा. जनजागृतीसाठी समाजमाध्यमांचा सुयोग्य वापर करावा. 'टीबीमुक्त ग्रामपंचायत' ही लोकाभिमुख मोहीम चळवळ म्हणून राबवावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली टीबीमुक्त ग्रामपंचायत उपक्रमांतर्गत 'रौप्य महोत्सव गौरव सोहळा -2024'चे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. आमदार सर्वश्री प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, प्रवीण पोटे - पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च 2023 रोजी वाराणसी येथे 'क्षयरोगमुक्त भारत' करण्याची घोषणा केली. त्याअनुषंगाने सर्व देश टीबीमुक्त होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा टीबीमुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तम प्रयत्न करीत आहेत. टीबीमुक्त ग्रामपंचायतींचा रौप्य महोत्सव गौरव सोहळ्यात संबंधित ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात आले आहे. अन्य ग्रामपंचायतींनेही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन टीबीमुक्त ग्रामपंचायत व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे. टीबीमुक्त झालेल्या रुग्णांच्या मुलाखती समाज माध्यमांवर प्रसारित कराव्यात. जेणेकरून अन्य रुग्णांनाही यातून आशेचा किरण मिळेल. यातून ते योग्य औषध उपचार करण्यासाठी प्राधान्य देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी वासनी खु. सरपंच - अवंतिका वाटाणे, हयापूर -अवधूत हिगांटे, खिरगव्हाण - सुजाता सरदार, आंचलवाडी- वैशाली काळमेघ, हरताळा - नूतन काळे, सायत - अन्नपूर्णा मानकर, सावंगी संगम - पंकज शिंदे, कोरडा - सोनाजी सावळकर, कळमगव्हाण नलिनी वानखडे, रामगाव -छाया घरडे, टोंगलाबाद - वैशाली पांझाडे, अडगाव बु. - मंगला खडसे, बोर्डा - अतुल राऊत, डेहणी - शीतल राठोड, दिवानखेड -बाळासाहेब उईके, बेसखेडा- दुर्गा यावले, इसापुर - मनोज धोटे यांना प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानित करण्यात आले. डॉ. सुरेश असोले यांनी प्रास्ताविक केले. श्रीकृष्ण पखाले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रमेश बनसोड यांनी आभार मानले.

गुरुवार, २७ मार्च, २०२५

जिंदाल स्टेनलेस महाराष्ट्रात ४२ हजार ८८६ कोटींची गुंतवणूक करणार उद्योजक रतन जिंदाल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव

जिंदाल स्टेनलेस महाराष्ट्रात ४२ हजार ८८६ कोटींची गुंतवणूक करणार उद्योजक रतन जिंदाल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव मुंबई, दि. २७ :- जिंदाल स्टेनलेस लिमिटेड महाराष्ट्रात ४२ हजार ८८६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रकल्प उभा करणार आहे. यातून सुमारे साडे पंधरा हजार रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याने, या प्रकल्पाचे महाराष्ट्रात स्वागत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिंदाल स्टेनलेस लिमिटेडचे अध्यक्ष रतन जिंदाल यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत श्री. जिंदाल यांनी या प्रकल्पाच्या उभारणीचा प्रस्ताव सादर केला. या प्रकल्पाची उत्पादन क्षमता वार्षिक चार दशलक्ष टन इतकी असणार आहे. या उद्योग समुहाने आणि श्री. जिंदाल यांनी महाराष्ट्राच्या क्षमतेवर दाखविलेला विश्वास महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाकरिता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेत नमूद केले. याप्रसंगी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, जिंदाल समुहाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

सोमवार, २४ मार्च, २०२५

मध्यरात्री राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे धडक दौरा

मध्यरात्री राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे धडक दौरा अमरावती, दि. 24 :स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे रात्री 12.30 ला रुग्णालयात अचानक भेट देऊन रुग्णालयातील वॉर्डमध्ये राऊंड घेऊन सखोल आढावा घेतला. अधिकाऱ्यांची चौकशी करून आतापर्यंत झालेल्या एकूण शस्त्रक्रिया याविषयी माहिती घेतली. बाह्यरुग्ण विभाग तसेच आंतररुग्ण विभागामध्ये सद्यस्थितीत 321 भरती असलेल्या रुग्णांची स्थिती जाणून घेतली. आतापर्यंत झालेले 51 यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबत अधिकारी, डॉक्टर्स व त्यांच्या चमूचे कौतुक केले. तसेच किडनी प्रत्यारोपण ICU व NICU ला प्रत्यक्ष भेट दिली. त्याचप्रमाणे अपुऱ्या असलेल्या यंत्रसामुग्री विषयीची दखल घेतली. यावेळी आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांच्या समक्ष रुग्णालयातील टप्पा 3 बद्दल प्रस्ताव मांडण्यात आला. ज्यामध्ये लिव्हर प्रत्यारोपण, गुडघे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट इत्यादी आजारांवर उपचार करण्यात येतील. आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच तांत्रिक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, नोडल ऑफिसर डॉ. निलेश पाचबुद्धे, डॉ. श्याम गावंडे, डॉ. माधव ढोपरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार, डॉ. अरुण सोळंके आदी उपस्थित होते.

कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प लवकरात लवकर सुरू करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प लवकरात लवकर सुरू करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई, दि. २४ : कोराडी येथील २×६६० मेगावॅट क्षमतेचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र प्रकल्पात सुपर क्रिटीकल टेक्नॉलॉजीचा वापर करावा. जास्तीत जास्त क्षमतेच्या हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कोराडी विद्युत प्रकल्पासंदर्भात विधानभवनातील समिती सभागृहात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोराडी विद्युत प्रकल्पासाठी वेस्टर्न कोल इंडियाचा कोळसा वापरावा. जास्तीत जास्त क्षमतेने हा प्रकल्प चालविताना कमीत कमी प्रदुषण होईल याकडे लक्ष द्यावे. हा संपूर्ण प्रकल्प पर्यावरणपूरक होईल, याकडे लक्ष द्यावे. तसेच या प्रकल्पातून उत्पादित होणारी वीज कमीत कमी दरात मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी वापण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. गारेपालमा येथील कोळशाच्या वापरासाठी त्याच्या जवळच आणखी एक विद्युत प्रकल्प उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी. यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. १४३३७ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्यात एफजीडी व एससीआर संयंत्र वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमिन उपलब्ध असून आणखी भूसंपादनाची आवश्यकता भासणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

महापारेषणच्या विविध मंजूर प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करावीत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापारेषणच्या विविध मंजूर प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करावीत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. २४ : राज्यात विविध क्षेत्रांसाठीच्या वीजेची मागणी लक्षात घेऊन आवश्यक वीज पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी महापारेषणच्या विविध मंजूर प्रकल्पाची काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्दैश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित महापारेषण प्रकल्पांबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे निर्देश दिले. बैठकीस राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, आमदार दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, अप्पर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, महापारेषण अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ संजीव कुमार, यांच्यासह इतर संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच संबंधित जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापारेषणच्या विविध जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व ठिकाणची कामे तातडीने विनाविलंब पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पालघरमध्ये जास्त प्रमाणात कामे प्रलंबित असून त्या कामांची तातडीने पूर्तता करावी. वाढवणच्या दृष्टीने विचार करुन टीबीसीबी प्लॅनिंग अतंर्गत गतीशक्ती प्लॅटफॉर्मवर त्याच्या नियोजनाचा विचार करावा. तसेच नवी मुंबई डेटा सेंटर हबला ग्रीन पॉवर देण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्याचे सूचित करुन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्थानिक राजकीय वा इतर कुठल्याही हस्तक्षेपाला न जुमानता सर्व संबंधित यंत्रणांनी ट्रान्समिशन टॉवरच्या उभारणीच्या कामांना गती द्यावी. यासाठी आवश्यक त्या जिल्ह्यांमध्ये पोलिस अधिक्षकांनी पोलिस संरक्षण उपलब्ध करुन द्यावे. सर्व यंत्रणांनी परस्पर सहकार्याने पारेषण प्रकल्पांचे काम गतीने पुढे नेण्याची खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सूचित केले. राज्याच्या वाढीव वीजेची मागणी लक्षात घेता सर्व क्षेत्रांना आवश्यक वीज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प पूर्ण होणे महत्वाचे आहे, त्यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी कामांची अंमलबजावणी अधिक गतीमान करुन सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. बैठकीत बभालेश्वर-कुडुस, शिक्रापुर- रांजणगाव, जेजुरी-हिंजवडी, पडघे-वाडा आणि कोलशेत-वाडा, विशविंद-भेंडा, बभालेश्वर-राजूरी-अहिल्यानगर एमआयडीसी, बोईसर(एमआयडीसी)-डहाणू, पडघे वाडा, नागेवाडी-भोकरदन, डहाणू सुर्यानगर एमएमआरडीए आणि कावदास जव्हार,धानोरा यावल ते चोपडा, उमरेड-नागभीड, या वीज वाहिन्यांच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. ट्रान्समिशन नेटवर्क विस्तार योजना २०२४-३४ अतंर्गत १,५४,५२२ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून ८६,६५६ नवीन कॉरीडॉरचे काम करण्यात येणार आहे. या संदर्भातील कामांच्या नियोजनाबाबत विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी सविस्तर माहिती दिली.

शनिवार, २२ मार्च, २०२५

100 दिवस कृती विकास आराखड्यांतर्गत मेळघाटातील दूर्गम गावांना भेट व पाहणी ; नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी प्रत्येक विभागांनी समन्वयाने कामे करा -विभागीय आयुक्त श्वेता सिंघल

नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी प्रत्येक विभागांनी समन्वयाने कामे करा -विभागीय आयुक्त श्वेता सिंघल विभागीय आयुक्तांची शंकरबाबा पापडकरांच्या बालसुधारगृहास भेट अमरावती,दि. 22 : राज्य शासनाने 100 दिवसांसाठी सात कलमी कृती आराखडा ‍निश्चित केला असून त्यात जनतेच्या तक्रारींचे निवारण, सुकर जीवनमान तसेच क्षेत्रीय कार्यालयांना भेटी हे घटक अंतर्भूत आहेत. मेळघाटसारख्या दूर्गम, आदिवासी बहुल भागातील नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी प्रत्येक विभागांनी समन्वयाने कामे करुन त्यांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना दिले. सेमाडोह पर्यटन संकुल येथे 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत मेळघाट क्षेत्रातील गावांना भेट व ग्रामस्थांच्या प्रश्नांचे निराकरण या कार्यक्रमांतर्गत श्रीमती सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे शुक्रवारी (ता.21 मार्च) आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. ‍जिल्हाधिकारी सौरभ कटियार, ‍ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, अपर आयुक्त अजय लहाने, रामदास सिध्दभट्टी, सुरज वाघमारे, उपवनसंरक्षक सुमीत सोळंके, दिव्यभारती एम., प्रकल्प अधिकारी प्रियवंदा म्हाळदळकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत महसूल विभागाच्या दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मेळघाट ‍परिसरातील दहा गावांना भेट देऊन तेथील ग्राम पंचायत, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, रेशन दुकान, गावातील सोयी-सुविधा आदींची पाहणी करुन ग्रामस्थांचे प्रश्न व समस्या जाणून घेतल्या. तसेच उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मेळघाटातील गावांना प्रत्यक्ष भेटी व तेथील ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनस्तरावर करावयाच्या उपाययोजनाबाबत विभागीय आयुक्तांनी आढावा घेतला. त्या म्हणाल्या की, मेळघाटातील नागरिकांचे जीवनमान हे प्रामुख्याने जंगल व जंगलातील उत्पादनांवर आधारित आहे. येथील क्षेत्राचा विकास होण्यासाठी याठिकाणी पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य, वीज, रस्ते, रोजगार आदी मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. टंचाईग्रस्त गावांना नियमितपणे पाणी पुरवठा होण्यासाठी विहिर खोलीकरण, गाव तलावातील गाळ काढून तेथे पाणी संचयनासाठी प्रभावी उपाययोजना होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने संबंधित विभागांनी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. प्रत्येक गावांत वीज पुरवठा अखंडीतपणे सुरु राहण्यासाठी विद्युत विभागाने सब स्टेशनची निर्मितीसाठी नियोजन करावे तसेच सोलर योजना प्रभावीपणे राबवावी. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून भेटी दिलेल्या गावांतील प्रश्नांबाबत आढावा घेवून त्यापुढे म्हणाल्या की, पिढ्यांपिढ्यापासून वन जमीनीवर शेती करणाऱ्या आदिवासी बांधवांना वनहक्क पट्ट्यांचा ताबा देण्यासाठी वन विभागाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. यासाठी विशेष मोहीम राबवावी. वन विभागाच्या अखत्यारित असलेली कामे स्थानिक गावकऱ्यांना प्राधान्याने देण्यात यावी. त्यांचे मजूरीचे मस्टर अद्ययावत ठेवून वेळेत मजूरीचे चुकारे करण्यात यावे. वन्य प्रान्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या वारसांना तत्काळ सानुग्रह मदत तसेच जखमींना तत्काळ उपचारासाठी वन विभागाने सहाय्य करावे. जंगल परिक्षेत्रात शेत असणाऱ्यांना शेतीपीकांसाठी विहिर तसेच बोअर करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. 100 दिवस कृती विकास आराखड्यांतर्गत मेळघाट क्षेत्रातील वझ्झर, घटांग, सलोना, भवई, सेमाडोह, माखला, ‍चिखली, तारुबांधा, बोरी, केशरपूर, कारा या गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्यात. विभागीय आयुक्तांची शंकरबाबा पापडकरांच्या बालसुधारगृहास भेट मेळघाट क्षेत्रातील गावांना भेट व पाहणी या कार्यक्रमांतर्गत प्रारंभी विभागीय आयुक्तांनी अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील ग्राम पंचायत, जिल्हा परिषदेच्या शाळेला आणि पद्मश्री शंकरबाबा पापडकर यांच्या स्व.अंबादासपंत वैद्य मंतिमंद, मुकबधीर बेवारस बालसुधारगृहास भेट दिली व मतीमंद मुला-मुलींशी संवाद साधून आस्थेवाईपणे विचारपूस केली. यावेळी शंकरबाबा पापळकर यांनी बालसुधारगृहातील 18 वर्षावरील अनाथ मुलांना कायमचे पालकत्व व पूनवर्सन होण्याचा कायदा होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली. यासंबंधी राजभवन येथे बैठक लावून सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिली. 00000