गुरुवार, २० मार्च, २०२५

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी ग्रामविकास तसेच पर्यटन विभागाने सुधारित नियमावली करावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी आणि कारंजा शहरातील गुरूमंदिर तिर्थक्षेत्र विकासासाठी ८९३ कोटींच्या कामांना उच्च स्तरीय समितीची मान्यता

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी ग्रामविकास तसेच पर्यटन विभागाने सुधारित नियमावली करावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी आणि कारंजा शहरातील गुरूमंदिर तिर्थक्षेत्र विकासासाठी ८९३ कोटींच्या कामांना उच्च स्तरीय समितीची मान्यता मुंबई,दि.२० : वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील गुरूमंदिर तिर्थक्षेत्र प्रस्तावित १७० कोटी तर श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रकल्प १ व प्रकल्प २ अशी एकूण ७२३ कोटी रूपयांची मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीत देण्यात आली. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी ग्रामविकास व पर्यटन विभागाने सुधारित नियमावली करावी जेणेकरून राज्यातील भागनिहाय महत्व लक्षात घेवून सर्वसमावेशक प्रस्ताव जिल्ह्यांकडून सादर होतील अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ,खासदार संजय देशमुख,आमदार सईताई प्रकाश डहाके यासह हे विविध देवस्थान मंदिराचे कार्यवाहक उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील गुरूमंदिर तिर्थक्षेत्र विकास आणि श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रकल्प १ व प्रकल्प २ च्या कामांना आज मान्यता देण्यात आली आहे ही कामे गतीने करण्यासाठी संबधित विभागांनी कार्यवाही करावी.नागपूर,नंदनवन ले-आऊट येथील लक्ष्मीनारायण व शिव मंदिर परिसराचा सुशोभिकरण व पुर्नविकास करणे,नागपूर भांडेवाडी येथील श्री मुरलीधर मंदीत तिर्थक्षेत्राचा विकास करणे तसेच नागपूर शांतीनगर इतवारी रेल्वे स्टेशनजवळील कुत्तेवाला आश्रमाचे सुशोभिकरण आणि विकास करण्याबाबत कामांना उच्च स्तरीय समितीने मान्यता दिली असून ही कामे गतीने करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे सादर करताना कमीत कमी खर्चात चांगल्या दर्जाची कामे करण्यासाठी प्रशासनाने भर द्यावा.कोणताही प्रस्ताव सादर करताना भविष्यातील गरजा आणि त्या परिसरातील आवश्यकता लक्षात घेवून प्रस्ताव सादर केले जावेत.ग्रामविकास, पर्यटन विभाग त्याचप्रमाणे या विषयाशी संबधित इतर विभागांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा बनविताना नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करावीत अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. या बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के. एच.गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,मुख्यमंत्री यांचे प्रधानसचिव अश्विनी भिडे,सचिव डॉ.श्रीकर परदेशी, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी,दूरदृश्यप्रणालीव्दारे वाशिमच्या जिल्हाधिकारी एस.भुवनेश्वरी यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा