ईद-उल-फित्र निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मुंबई, दि.३१ : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
उपवास, प्रार्थना व दानधर्माच्या माध्यमातून साजरा होत असलेला रमजान ईद हा अतिशय पवित्र सण आहे. हा मंगल दिवस आनंद, समाधान व संपन्नता घेऊन येवो, या प्रार्थनेसह सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद उल फित्रच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा